Vivo चा नवा 5G स्मार्टफोन Y400 लॉन्च, विक्रीसाठी 7 ऑगस्टपासून उपलब्ध; पहा फीचर्स

Vivo Y400 5G चा 8GB RAM + 128GB व्हेरिएंट Rs 21,999 तर 8GB RAM + 256GB व्हेरिएंट Rs 23,999 मध्ये विकत घेता येणार आहे.

Vivo चा नवा 5G स्मार्टफोन Y400 लॉन्च, विक्रीसाठी 7 ऑगस्टपासून उपलब्ध; पहा फीचर्स

Photo Credit: Vivo

Vivo Y400 5G IP68+IP69 पाणी आणि धूळ प्रतिरोधक रेटिंग पूर्ण करतो असा दावा केला जातो

महत्वाचे मुद्दे
  • Vivo Y400 5G च्या प्री बुकिंग वर निवडक बॅंकेच्या ग्राहकांना कार्ड वापरल्य
  • Glam White आणि Olive Green या दोन रंगांमध्ये Vivo Y400 5G उपलब्ध असेल
  • 7 ऑगस्ट 2025 पासून Vivo Y400 5G ची विक्री सुरू होणार
जाहिरात

Vivo कडून आता अधिकृतपणे लेटेस्ट 5G smartphone, the Vivo Y400 5G हा भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत मिड रेंज सेगमेंट मध्ये आहे. हा नवा फोन फास्ट चार्जिंग, मोठी बॅटरी, AMOLED display आणि ड्युअल 5G support सपोर्ट सह आला आहे. जून महिन्यात विवो च्या Vivo Y400 Pro 5G नंतर आता हा नवा फोन बाजारात आला आहे. Vivo Y400 5G मुळे विवो च्या Y-series lineup मध्ये आता अजून एक फोन समाविष्ट झाला असून तो परफॉर्मन्स फोकस्ड असून 25,000 च्या सेगमेंट मधील आहे.मग जाणून घ्या Vivo Y400 5G मधील दमदार फीचर्स आणि किंमत काय?

Vivo Y400 5G ची भारतामधील किंमत काय?

Vivo Y400 5G हा भारतामध्ये 21,999 रूपयांपासून सुरू होत आहे. 8GB RAM + 128GB चा व्हेरिएंट 21,999 रूपयांमध्ये तर 8GB RAM + 256GB व्हेरिएंट हा 23,999 रूपयांमध्ये विकत घेता येणार आहे. हा स्मार्टफोन दोन रंगांमध्ये विकत घेता येणार आहे. Glam White आणि Olive Green या दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन विकत घेता येईल. 7 ऑगस्ट 2025 पासून Vivo Y400 5G ची विक्री सुरू होणार आहे. हा स्मार्टफोन भारतामध्ये Vivo India e-store, Flipkart, Amazon आणि काही निवडक ऑफलाईन रिटेलर्स कडे विकत घेता येणार आहे.

Vivo Y400 5G ची प्री बुकिंग करणार्‍यांना 10% कॅशबॅक ही मिळणार आहे. मात्र ही ऑफर SBI, DBS Bank, IDFC First Bank, Yes Bank, BOB Card,आणि Federal Bank च्या ग्राहकांना मिळणार आहे. Vivo कडून zero down payment EMI plan देखील मिळणार आहे. हा प्लॅन 10 महिन्यांसाठी असेल.

Vivo Y400 5G ची स्पेसिफिकेशन्स

Vivo Y400 5G हा स्मार्टफोन Funtouch OS 15 बेस्ड Android 15 वर चालतो. यामध्ये 6.67-inch full-HD+ AMOLED display आहे तर 120Hz refresh rate आणि 1,800 nits peak brightness आहे. स्मार्टफोन मध्ये in-display fingerprint sensor देखील आहे जो biometric authentication करतो. फोनमध्ये Qualcomm Snapdragon 4 Gen 2 चीपसेट असून ती 8GB LPDDR4X RAM आणि 256GB UFS 3.1 इंटर्नल स्टोरेज सह जोडलेली आहे.

Vivo Y400 5G मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. 50-megapixel Sony IMX852 primary sensor आणि 2-megapixel depth sensorआहे तर फोनच्या फ्रंट बाजूला 32-megapixel sensor, आहे.

Vivo Y400 5G मध्ये 6,000mAh battery आहे. ज्याला 90W wired fast charging सपोर्ट आहे. Vivo Y400 5G मध्ये IP68 आणि IP69 रेटिंग आहे. ज्यामुळे फोन धूळ, पाण्यापासून सुरक्षित आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Lava Agni 4 लवकरच लाँच होणार, सर्टिफिकेशन साइटवर बॅटरी स्पेसिफिकेशन्सची माहिती
  2. Lava Probuds N33 नेकबँड भारतात लॉन्च; IPX5 रेटिंग, फास्ट चार्जिंग आणि 30dB ANC फीचर्स सोबत येणार
  3. Galaxy S26 सीरिजचा कॅमेरा होणार आणखी पॉवरफूल; कॅमेरा स्पेसिफिकेशन्सनी वाढवली उत्सुकता
  4. OnePlus 15 सीरिजसाठी OP Gaming Core टेक्नॉलॉजी लाँच; पहा काय आहे खास?
  5. iQOO Neo 11 लवकरच होणार उपलब्ध; 35K मध्ये मिळणार फ्लॅगशिप फीचर्स?
  6. Flipkart वर दिसला Realme GT 8 Pro; भारतात लवकरच करता येणार खरेदी
  7. Vivo X300 आणि X300 Pro अधिकृतपणे आला ग्लोबल मार्केटमध्ये; भारतातील लॉन्च लवकरच
  8. iQOO 15 भारतात लवकरच लॉन्च होणार; Geekbench लिस्टिंगमधून समोर आले महत्त्वाची फीचर्स
  9. Realme GT 8 Pro भारतात 20 नोव्हेंबरला लॉन्च होणार; जाणून घ्या खास फीचर्स
  10. Amazon ने भारतात लॉन्च केला Fire TV Stick 4K Select, Vega OS सह येणार खास फीचर्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »