Photo Credit: Vivo
Vivo S30 मालिकेतील स्मार्टफोनमध्ये प्रत्येकी 6,500mAh बॅटरी असतील
Vivo S30 series या महिन्यात चीन मध्ये लॉन्च होण्याच्या तयारी मध्ये आहे. फोन कंपनी कडून लॉन्च डेट, डिझाईन आणि रंगांचे पर्याय जाहीर करण्यात आले आहेत. या फोनमधील काही महत्त्वाचे फीचर्स देखील समोर आले आहेत. फोनच्या लाईन अप मध्ये बेस Vivo S30 आणि Vivo S30 Pro Mini चा समावेश आहे. नवा स्मार्टफोन Vivo Pad 5 tablet, the Vivo TWS Air 3 earphones आणि नव्या पॉवर बॅंक सह लॉन्च केला जाणार आहे. या पॉअर बॅंक मध्ये इनबिल्ट केबल आहे.Vivo S30, S30 Pro Mini सह लॉन्च होणार Vivo Pad 5, Vivo TWS Air 3 आणि बरंच काही,Vivo S30 series मध्ये Vivo S30 आणि Vivo S30 Pro Mini व्हेरिएंट यांचा समावेश आहे. हा स्मार्टफोन चीन मध्ये 29 मे दिवशी स्थानिक वेळ संध्याकाळी 7 वाजता लॉन्च होणार आहे. याबाबतची माहिती कंपनीने Weibo post द्वारा दिली आहे. दोन्ही हॅन्डसेट सध्या चीन मध्ये प्री रिझर्व्हेशन साठी उपलब्ध आहेत. Vivo website आणि अन्य ई कॉमर्स साईट वर फोन उपलब्ध आहे.
Vivo S30 series handsets च्या अधिकृत लॅन्डिंग पेज वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, base Vivo S30 हा Coco Black, Lemon Yellow, Mint Green आणि Peach Powder रंगांमध्ये उपलब्ध आहे. तर या फोनमध्ये 50-megapixel Sony periscope telephoto shooter आणि Snapdragon 7 Gen 4 SoC चा समावेश आहे.
Vivo S30 Pro Mini देखील Coco Black, Lemon Yellow, आणि Mint Green रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. सोबत Coolberry Powder देखील असणार आहे. हा स्मार्टफोन 6.31-inch compact आणि फ्लॅट डिस्प्ले सह येणार आहे.
Vivo S30 smartphone मध्ये 6.67-inch flat display असणार असल्याची माहिती यापूर्वीच senior Vivo official ने दिली आहे. फोनमध्ये 6.67-inch flat display आहे. दोन्ही हॅन्डसेटमध्ये 6,500mAh बॅटरी असणार आहे. कंपनीच्या माहिती नुसार, दोन्ही मॉडेल्स मध्ये "aviation-grade aluminium metal middle frames." असणार आहे.
Vivo ने अशीही पुष्टी केली की MediaTek Dimensity 9300+ चिपसेटसह Vivo Pad 5 टॅबलेट, Vivo S30 मालिकेतील स्मार्टफोन्ससोबत 29 मे रोजी चीनमध्ये लाँच होईल. त्यांच्यासोबत Vivo TWS Air 3 इयरफोन्स असतील, जे एकूण 45 तासांपर्यंत बॅटरी लाइफ देण्याचा दावा केला जातो. प्रत्येक इयरबडचे वजन सुमारे 3.6 ग्रॅम असेल. कंपनी इनबिल्ट केबलसह 33W पॉवर बँक देखील सादर करेल.
जाहिरात
जाहिरात