Vivo S50 मध्ये 1.5K रिझोल्यूशनसह 6.59-इंचाचा फ्लॅट डिस्प्ले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
Vivo कडून नुकताच X300 होम मार्केट मध्ये लॉन्च करण्यात आला आहे पण आता तो पुढील तयारीसाठी देखील सज्ज आहे. लोकप्रिय टीप्सस्टर tipster Digital Chat Station (DCS) च्या Weibo वरील माहितीनुसार विवो आता दोन मॉडेल्सच्या तयारी मध्ये आहे ज्यात Vivo S50 आणि Vivo S50 Pro Mini चा समावेश आहे. दोन्ही मॉडेल्स हे नोव्हेंबर महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज आहे. सध्या या फोनमधील महत्त्वाचे हार्डवेअर अपग्रेड्स समोर आले आहेत.Vivo S50 कॅमेरा मधील अपग्रेड्स,DCS ने दिलेल्या माहितीच्या आधारे, Vivo S50 मध्ये 6.59-inch flat display आणि 1.5K resolution चा समावेश आहे. या स्मार्टफोनमध्ये मोठ्या सेलिंग पॉईंट मध्ये periscope telephoto lens चा समावेश आहे. कॅमेरा सेटअप मध्ये फ्लॅगशीप लेव्हल सेन्सर असून हायर क्वॅलिटी झूमिंगचा समावेश आहे. विवो कडून 50 MP camera असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामध्ये S50 हा सेल्फी फोन श्रेणीतील एक महत्त्वाचा स्पर्धक बनला आहे.
Vivo S50 Pro Mini हा कॉम्पॅक्ट पॅकेजमध्ये फ्लॅगशिपचा अनुभव देण्याचे काम करतो. फोनमध्ये सेम डिस्प्ले रिझोल्यूशन असेल पण स्क्रीन थोडी लहान असेल ज्याचा आकार 6.31-इंच असेल असे म्हटले जाते. DCS ने अचूक तपशील सांगितले नाहीत पण आगामी स्मार्टफोनमध्ये 300W+ चा स्कोअर चालविणारी फ्लॅगशिप चिप असेल असे उघड केले आहे. परंतू, मागील लीकवरून असे सूचित होते की S50 Pro Mini मध्ये MediaTek Dimensity 9400 चिपसेट असेल, जो 2024 पासून Vivo X200 मध्ये आढळणारा सिलिकॉन असेल.
Pro Mini हा आणखी एक मोबाइल फोटोग्राफी पॉवरहाऊस असणार आहे, ज्यामध्ये ट्राय-कॅमेरा सिस्टम असेल आणि पेरिस्कोप कॅमेरा असेल. यात 50 MP सेल्फी कॅमेरा देखील असावा, जो अल्ट्रासोनिक इन-स्क्रीन फिंगरप्रिंट सेन्सरसह असेल. चीन मध्ये क्रमांक 4 बद्दल असलेल्या सांस्कृतिक मान्यतांमुळे, विवो S40 लाँच करत नाही असे म्हटले जाते.
पण, S50 ची स्पर्धा Oppo Reno 15 आणि Honor 500 सिरीजशी असेल, जे दोन्ही नोव्हेंबरमध्ये चीनमध्ये लाँच होण्याची अपेक्षा आहे. जर DCS ने यावेळी योग्य कामगिरी केली तर, S50 सिरीज फ्लॅगशिपलेव्हल वर कामगिरी आणि स्लिम चेसिसमध्ये फोटोग्राफी आणेल.
जाहिरात
जाहिरात
Cat Adventure Game Stray is Reportedly Coming to PS Plus Essential in November