फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी

Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन Prism Blue आणि Titanium Gold अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे.

फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी

Photo Credit: Vivo

Vivo T4 Lite 5G प्रिझम ब्लू आणि टायटॅनियम गोल्ड रंगांमध्ये येतो

महत्वाचे मुद्दे
  • Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB या
  • SBI Bank, HDFC Bank आणि Axis Bank च्या कार्ड होल्डर्सना 500 रूपयांचे in
  • Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन भारता मध्ये 2 जुलैला दुपारी 12 व
जाहिरात

Vivo च्या T series मध्ये आता नव्याने सहभागी झालेला फोन म्हणजे Vivo T4 Lite 5G. भारतामध्ये आता हा फोन लॉन्च झाला आहे. Vivo T4 Lite 5G बद्दल सुरू असलेल्या चर्चांप्रमाणे आणि फोनच्या लॅन्डिंग पेज वरील माहितीनुसार, Vivo T4 Lite 5G हा iQOO's Z10 Lite,सारखा आहे. यापूर्वी Vivo T3 Lite आणि iQOO's Z9 Lite देखील सारखाच होता. त्यांचे फीचर्स, किंमती देखील सारख्याच होत्या. Vivo T4 Lite हा कंपनीचा सर्वात किफायतशीर 5G smartphone आहे. ज्यांना फोनमध्ये स्टाईल, उत्तम परफॉर्मन्स, चांगली बॅटरी हवी आहे त्यांना हा फोन चांगल्या दरात मिळणार आहे.

Vivo T4 Lite 5G ची भारतामधील किंमत

Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB आणि 8GB + 256GB या तीन व्हेरिएंट मध्ये मिळणार आहे. त्यांची किंमत अनुक्रमे Rs 9,999, Rs 10,999 आणि Rs 12,999 असणार आहे. Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन Prism Blue आणि Titanium Gold अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Vivo T4 Lite 5G हा स्मार्टफोन भारता मध्ये 2 जुलैला दुपारी 12 वाजल्यापासून विक्रीसाठी खुला होणार आहे. Flipkart आणि Vivo ची अधिकृत वेबसाईट वर खरेदी करता येईल.

Vivo T4 Lite 5G खरेदी करताना SBI Bank, HDFC Bank आणि Axis Bank च्या कार्ड होल्डर्सना 500 रूपयांचे instant discount मिळणार आहे. त्यामुळे या फोनच्या किंमती 9,499, Rs 10,499 आणि Rs 12,499 अशा होणार आहेत.

Vivo T4 Lite 5G ची स्पेसिफिकेशन्स

फोन मध्ये 6.74-inch HD+ display आहे तर 90Hz refresh rate आणि 1,000 nits (HBM) ब्राईटनेस आहे. Vivo ने हा फोन IP64 rating केला असल्याने धूळ आणि पाण्यापासून तो सुरक्षित आहे. SGS five-star anti-fall certification तसेच MIL-STD-810H military-grade durability फोनला आहे.

फोनमध्ये 6nm प्रक्रियेवर बनवलेल्या MediaTek Dimensity 6300 चिपचा वापर केला जातो. तो 8GB पर्यंत RAM सह येतो आणि अतिरिक्त 8GB व्हर्च्युअल RAM ला सपोर्ट करतो. स्टोरेज पर्यायांमध्ये 128GB आणि 256GB समाविष्ट आहेत. T4 Lite 5G Android 15 वर आधारित Funtouch OS 15 चालवतो. Vivo दोन वर्षांचे Android अपडेट्स आणि तीन वर्षांचे सुरक्षा पॅचेस देखील देतो. बॅटरी लाइफ ही Vivo T4 Lite ची सर्वात मोठी ताकद आहे. यात 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे, जी एका चार्जवर 70 तासांपर्यंत म्युझिक प्लेबॅक किंवा 22 तासांपर्यंत व्हिडिओ स्ट्रीमिंग करू शकते असा Vivo चा दावा आहे. हे 15W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते आणि कंपनी म्हणते की 1,600 पूर्ण चार्ज सायकलनंतरही बॅटरी 80 टक्के राहते.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »