Vivo T4 Ultra लवकरच येणार बाजारात; पहा फोनमध्ये काय खास?

Vivo T4 Ultra मध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्ट असू शकतो असा अंदाज आहे

Vivo T4 Ultra लवकरच येणार बाजारात; पहा फोनमध्ये काय खास?

Photo Credit: Vivo

Vivo T3 Ultra ची (चित्रात) रचना प्रीमियम Vivo V-सिरीज स्मार्टफोन्सपासून प्रेरित होती

महत्वाचे मुद्दे
  • Vivo T4, मिड रेंज सेगमेंट मधील हा सर्वात स्वस्त फोन असल्याचा दावा
  • Vivo कडून T4 Ultra model जून महिन्यात लॉन्च होण्याचा अंदाज
  • स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300 series SoC असण्याचा अंदाज
जाहिरात

Vivo T4, जो नुकताच समोर आला आहे त्याची किंमत मिड रेंज सेगमेंट मधील हा सर्वात स्वस्त फोन असल्याचं सांगितलं आहे. हा स्मार्टफोन हाय एंड व्हेरिएंट असून Vivo T4 Ultra म्हणून समोर येऊ शकतो. ‘Ultra' लेबल हे Vivo च्या T series मिड रेंज स्मार्टफोनसाठी नवं नाही. सध्या Vivo T3 Ultra हा भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याची किंमत Rs. 27,999 आहे. टीपस्टर कडून आता आगामी Vivo T4 Ultra model ची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये स्पेसिफिकेशन्स आणि लॉन्च टाईमलाईनचा समावेश आहे.Digit, च्या माहितीनुसार, Vivo कडून T4 Ultra model लॉन्चची तयारी सुरू असून हा स्मार्टफोन जून महिन्यात बाजारात येण्याचा अंदाज आहे. टीपस्टरने डिव्हाइसची प्रमुख फीचर्स शेअर केली आहेत, जी लवकरच सध्याच्या Vivo T3 Ultra मॉडेलची जागा घेतील.

Vivo T4 Ultra चे काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स

टीपस्टरच्या माहितीनुसार, Vivo T4 Ultra मध्ये 6.67-inch pOLED panel आहे. 120Hz screen refresh rate आहे. स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 9300 series SoC असण्याचा अंदाज आहे पण नेमकी कोणती SoC असेल याची माहिती देण्यात आलेली नाही.

टीपस्टरच्या माहितीनुसार, Vivo T4 Ultra मध्ये कॅमेर्‍यात मोठे अपग्रेडस बघायला मिळू शकतात. प्रायमरी कॅमेरा मध्ये 50-megapixel Sony IMX921 sensorअसण्याचा अंदाज आहे. 50-megapixel ultrawide camera ऐवजी 50-megapixel periscope telephoto camera असण्याचा अंदाज आहे.

हा फोन Android 15 वर आधारित Funtouch OS 15, वर चालतो असे म्हटले जाते. टिपस्टरने बॅटरीची क्षमता सांगितली नसली तरी, त्यांनी असे म्हटले आहे की Vivo T4 Ultra 90W चार्जिंगला सपोर्ट करू शकतो, जे खरे असल्यास, आउटगोइंग मॉडेलपेक्षा एक पाऊल पुढे आहे.

Vivo T3 Ultra ची स्पेसिफिकेशन्स आणि किंमत

सध्याच्या Vivo T3 Ultra मध्ये 6.78-inch, full-HD+ 120Hz AMOLED display आहे. त्यामध्ये MediaTek Dimensity 9200+ SoC आहे. यासोबतच 50-megapixel (OIS) primary camera आणि 50-megapixel ultrawide camera मागच्या बाजूला आ हे. फोनमध्ये 50-megapixel front-facing camera आहे. त्यासोबतच 5,500mAh battery आहे आणि 80W wired chargingआहे. हा स्मार्टफोन Rs. 27,999 पासून सुरू होतो, ही किंमत 8GB+128GB variant ची आहे तर 12GB+256GB व्हेरिएंट साठी Rs. 31,999 मोजावे लागत आहेत.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. OnePlus Nord Buds 4 Pro भारतात १९ मार्चला लॉन्च होणार
  2. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  3. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  4. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  5. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  6. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  7. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  8. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  9. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  10. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »