Vivo T4 Ultra चा टीझर पाहिलात का? पहा काय खास असेल या दमदार फोनमध्ये

Vivo T4 Ultra मध्ये Dimensity 9300 Plus चिपसेट असण्याची अपेक्षा आहे

Vivo T4 Ultra चा टीझर पाहिलात का? पहा काय खास असेल या दमदार फोनमध्ये

Photo Credit: Vivo

विवोने टी सिरीजमधील कंपनीचा पुढील स्मार्टफोन, टी४ अल्ट्राच्या लाँचिंगची टीझ सुरू केली आहे

महत्वाचे मुद्दे
  • Vivo T4 Ultra काळ्या रंगामध्ये आणि oval-shaped camera module मध्ये उपलब्ध
  • कॅमेरा मॉड्यूलवर लिहिलेला 100x डिजिटल झूम सपोर्ट मजकूर याची पुष्टी करतो
  • Flipkart आणि Vivo च्या online store वर फोन विक्रीसाठी खुला असेल
जाहिरात

Vivo कडून T4 Ultra smartphone ची झलक शुक्रवार (30 मे) भारतामध्ये समोर आणण्यात आली आहे. हा फोन Flipkart च्या माध्यमातून विक्रीसाठी खुला केला जाईल असे संकेत देण्यात आले आहेत. दरम्यान Vivo ने अद्याप या फोनची ठोस लॉन्च ची तारीख आणि अन्य अपडेट्स समोर आणले नाहीत पण जारी अधिकृत व्हिडिओ टीझर नुसार हा स्मार्टफोन काळ्या रंगामध्ये आणि oval-shaped camera module मध्ये उपलब्ध असणार आहे. Vivo T4 Ultra हा मागील महिन्यात लॉन्च झालेल्या T4 smartphone च्या सीरीज मधील अजून एक फोन असणार आहे. त्यामुळे आता ग्राहकांमध्ये या फोनची उत्सुकता वाढली आहे.Vivo T4 Ultra ची काय असू शकतात स्पेसिफिकेशन्स?Vivo T4 Ultra मध्ये 6.67-inch pOLED quad-curved display आहे. 120 Hz refresh rate आणि 5,000 nits peak brightness सोबत Eye Care Certification आहे. फोनमध्ये triple rear camera setup आहे. 50MP Sony IMX921 primary sensor, 50MP periscope lens with 100X digital zoom आणि 8MP ultra-wide sensor चा समावेश आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9300 Plus chipset असण्याचा देखील अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

हा फोन Android 15-based Fun TouchOS 15 वर चालेल असा अंदाज आहे. फोनमध्ये 5,500mAh ची बॅटरी आणि 90W चार्जिंग सपोर्ट असण्याचा अंदाज आहे. कंपनीचा दावा आहे की T4 अल्ट्रा फ्लॅगशिप-लेव्हल झूम देईल आणि कॅमेरा मॉड्यूलवर लिहिलेला 100x डिजिटल झूम सपोर्ट मजकूर याची पुष्टी करतो.Vivo T4 Ultra मध्ये Dimensity 9300 Plus चिपसेट असण्याची अपेक्षा आहे आणि तो Vivo S20 Pro वर आधारित असू शकतो, जो गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये चीनमध्ये लाँच झाला होता.

Vivo T4 Ultra ची काय असू शकते किंमत?

Vivo T4 Ultra हा भारतामध्ये सुमारे 34 हजारांच्या रेंजमधील फोन असू शकतो. भारतात जेव्हा Vivo T3 Ultra लॉन्च झाला होता तेव्हा त्याची बेस मॉडेलची किंमत Rs 31,999 होती.

रिपोर्ट्सनुसार Vivo T4 Ultra हा फोन भारतामध्ये Flipkart च्या माध्यमातून विक्रीसाठी खुला केला जाऊ शकतो. फ्लिपकार्ट या e-commerce website वर त्यच्यासाठी खास लॅन्डिंग पेज तयार आहे. त्यामुळे या नव्या फोनचे संकेत मिळत आहेत. लिस्टिंग वरून या फोनमध्ये AI-backed features असू शकतात असा अंदाज देखील व्यक्त होत आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Samsung Galaxy M17 5G भारतात लॉन्च; ५०MP कॅमेरा आणि ५,०००mAh बॅटरीसह दमदार फीचर्स
  2. WhatsApp अपडेट: इमोजी टाइप करताच मिळणार संबंधित स्टिकर्स, iPhone युजर्ससाठी नवीन फीचर
  3. वनप्लस 15T चे डिझाइन आणि रंग पर्याय अधिकृतपणे जाहीर; चीन लॉन्चपूर्वी फीचर्स समोर
  4. iQOO Z11 Turbo चा टीझर समोर; लवकरच लॉन्च, जबरदस्त बॅटरी आणि फास्ट चार्जिंगची शक्यता
  5. SIM Binding नियम काय आहे? मेसेजिंग अॅप्स आणि वापरकर्त्यांवर काय परिणाम होणार
  6. Poco C85x 5G लवकरच भारतात; Flipkart मायक्रोसाइटवर डिझाइनची झलक
  7. Google Pixel 10a भारतात विक्रीसाठी उपलब्ध; 48MP कॅमेरा, 5100mAh बॅटरीसह किंमत ₹49,999
  8. Motorola Edge 70 Fusion किंमत आणि उपलब्धता
  9. Nothing Phone 4a सीरिज भारतात लॉन्च; किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाहीर
  10. Oppo K14 5G भारतात 9 मार्चला लॉन्च होणार; 7,000mAh बॅटरी आणि डिझाइनची माहिती समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2026. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »