Vivo X Fold 5 च्या दोन्ही पॅनेल मध्ये high-frequency PWM dimming आणि local peak brightness of 4,500 nits आहे.
Photo Credit: Vivo
विवोने चीनमध्ये अधिकृतपणे विवो एक्स फोल्ड ५ ची टीझिंग सुरू केली आहे
Vivo X Fold 5 च्या लॉन्चपूर्वी या फोन बद्दल ग्राहकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अल्ट्रा ब्राईट डिस्प्ले, लाईटवेट कन्स्ट्रक्शन, रोबस्ट डिझाईन यामुळे हा फोन बाजारात धमाका करणार आहे. सध्या या फोनचा टीझर लीक झाला आहे. त्यामुळे फोनमधील inner आणि exterior screens ची माहिती मिळाली आहे. ज्यात 8T LTPO technology असल्याने brilliant peak brightness हा 4,500 nits असणार आहे. X Fold 5 हा फोल्ड होऊ होऊ शकणार्या फोन्सपैकी सगळ्यात स्टायलिश फोन असणार आहे. ग्राहकांना या फोनचं डिझाईन आणि परफॉर्मन्स मध्ये करण्यात आलेली सुधारणा मनात भरली आहे. या फोल्डेबल फोनमुळे Vivo एका नव्या उंचीवर पोहचणार आहे.Vivo X Fold 5 कधी होऊ शकतो लॉन्च?Vivo X Fold 5 लवकरच समोर येणार आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, कंपनीच्या एक्झिक्युटिव्हने Weibo वर आगामी फोल्डेबल फोनचा एक नवीन टीझर शेअर केला आहे, ज्यामध्ये त्याची डिझाईन आणि काही वैशिष्ट्ये दर्शविली आहेत. अद्याप व्हिवो ने फोनची अधिकृत पदार्पणाची तारीख गुलदस्त्यात ठेवली आहे.
फोनच्या दोन्ही पॅनेल मध्ये high-frequency PWM dimming आणि local peak brightness of 4,500 nits आहे याची पुष्टी झाली आहे. असे म्हटले आहे की फोल्डेबल स्क्रीन्स Zeiss Master Color आणि TÜV Rheinland Global Eye Protection 3.0 द्वारे प्रमाणित आहेत.
Vivo X Fold 5 ची थंड वातावरणामध्येही अपवादात्मक प्रतिकारशक्ती आहे. -20°C वर बराच काळ ठेवल्यावरही, फोनची सर्व फीचर्स उत्तम प्रकारे काम करत असल्याचे नोंदवले गेले आहे. अलीकडील सूत्रांनुसार, Vivo X Fold 5 चे वजन 209 ग्रॅम असेल. यात 6.53-इंच कव्हर डिस्प्ले आणि 8.03 -इंच फोल्डेबल इनर डिस्प्ले असण्याची अपेक्षा आहे.
रिपोर्ट्सनुसार, फोनच्या मागील बाजूस तीन 50 मेगापिक्सेल कॅमेरे असतील. Vivo X Fold 5 मध्ये 6,000mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे जी 30 W वायरलेस आणि 90 W केबलने चार्ज करण्यास सक्षम आहे. यात 512GB स्टोरेज, 16GB रॅम आणि Snapdragon 8 Gen 3 CPU आहे. फोनच्या internal आणि external दोन्ही डिस्प्ले मध्ये 8T LTPO पॅनेल असणार आहेत. स्क्रीनमध्ये उच्च पिक्सेल घनता, ultra-high resolution आणि अॅडॉप्टिव्ह रिफ्रेश रेट आहे.
जाहिरात
जाहिरात
Microsoft Announces Latest Windows 11 Insider Preview Build With Ask Copilot in Taskbar, Shared Audio Feature
Samsung Galaxy S26 Series Specifications Leaked in Full; Major Camera Upgrades Tipped