Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स

Vivo X200 FE हा बाजारात उपलब्ध असलेला नवीन कॉम्पॅक्ट फोन आहे ज्यामध्ये हेवी इंटरनल आणि Zeiss Optics कॅमेरे आहेत जे ऑल-राउंड पॅकेज देतात.

Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी?  घ्या जाणून अपडेट्स

Photo Credit: Vivo

Vivo X200 FE (चित्रात) मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे

महत्वाचे मुद्दे
  • 3 जुलै ला Vivo X200 FE थायलंडमध्ये रिलीज होईल तर भारतात जुलैमध्ये लाँच ह
  • Vivo X200 FE मध्ये Zeiss Optics लेन्ससह ट्रिपल सेन्सर मॉड्यूल, 50MP चा
  • Vivo X-200 मॉडेल गुलाबी, निळा आणि हलका तपकिरी अशा रंगांमध्ये उपलब्ध होईल
जाहिरात

Vivo X200 FE हा अधिकृतपणे ग्राहकांसमोर आला आहे मात्र अद्याप तो भारतीयांसाठी उपलब्ध नाही. नवी X-200 series model विविध आस्पेक्ट वर लक्ष केंद्रीत करून आहेत. Zeiss Optics लेन्ससह अजूनही शक्तिशाली हार्डवेअर उपलब्ध आहे. अलिकडेच बाजारात compact premium phones ची भर पडली आहे आणि Vivo आता OnePlus, Xiaomi आणि Samsung सोबत या क्षेत्रात आपले नाव जोडत आहे. Vivo S30 Pro Mini जो चीन मध्ये मागील महिन्यात लॉन्च झाला आहेत त्याचा हा rebadged version असल्याचा अंदाज आहे.Vivo X200 FE ची किंमत काय?तैवानमध्ये Vivo X200 FE ची लाँच किंमत अद्याप जाहीर केलेली नाही आणि हा फोन या प्रदेशात कधी उपलब्ध होईल हे देखील माहिती नाही. पण Vivo X200 FE जुलैमध्ये भारतासह इतर बाजारपेठांमध्ये जाहीर होण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे अधिक माहितीसाठी वाट पहावी लागू शकते.

Vivo X200 FE ची स्पेसिफिकेशन्स काय?

X200 FE मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1.5k रिझोल्यूशनला सपोर्ट असलेला 6.31-इंचाचा कॉम्पॅक्ट AMOLED डिस्प्ले आहे. हा फोन 12GB पर्यंत रॅम आणि 512GB स्टोरेजसह MediaTek Dimensity 9300+ चिपसेटद्वारे सपोर्टेट आहे. हा फोन Funtouch OS 15 आवृत्तीवर चालतो. Vivo या स्मार्टफोनला IP68 आणि IP69 रेटिंग देत आहे ज्यामुळे ते पाणी आणि धूळीपासून सुरक्षित आहे. फोनमध्ये 6,500mAh ची मोठी बॅटरी आहे, तरीही ती 8 मिमीपेक्षा कमी आहे. वजन सुमारे 186 ग्रॅम आहे, बहुधा सिलिकॉन कार्बाइड तंत्रज्ञानामुळे हे वजन कमी आहे. 90W फास्ट चार्जिंग करता येऊ शकते.

फोनमधील कॅमेरा पाहता X200 FE मध्ये Zeiss Optics लेन्ससह ट्रिपल सेन्सर मॉड्यूल आहे. यात 50MP चा प्रायमरी सेन्सर, 50MP चा टेलिफोटो लेन्स आणि 8MP चा अल्ट्रावाइड लेन्स आहे. Vivo X-200 मॉडेल गुलाबी, निळा आणि हलका तपकिरी अशा रंगांमध्ये उपलब्ध होईल.

आधीच्या अहवालांमध्ये, Vivo X200 FE भारतात जुलैमध्ये लाँच होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती आणि किंमत टॅगशिवाय फोनचे अधिकृत अनावरण सूचित करते की आपल्याला जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही. या फीचर्सनुसार, X200 FE मध्ये OnePlus 13s पेक्षा चांगली बॅटरी आणि कॅमेरा असल्याचे दिसते, तर Xiaomi 15 मध्ये लहान बॅटरी युनिट वगळता बहुतेक बेस कव्हर केले आहेत. 3 जुलै ला Vivo X200 FE थायलंडमध्ये रिलीज होईल, तर ग्राहक मलेशियामध्ये हँडसेट प्री-रिझर्व करू शकतात.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »