Photo Credit: Vivo
Vivo V50 (चित्रात) मागील V40 मॉडेल सारखेच दिसते
Vivo कडून त्यांच्या आगामी वी सीरीज फ्लॅगशीप मधील V50 ची माहिती देण्यात आली आहे. V50 भारतात जेव्हा लॉन्च होईल तेव्हा V40 model ला रिप्लेस करणार आहे. भारतामध्ये V40 Pro model सोबत ऑगस्ट 2024 मध्ये तो लॉन्च करण्यात आला होता. अनेक अफवांनंतर, Vivo ने अधिकृतपणे त्याच्या आगामी प्रीमियम स्मार्टफोनबद्दल बहुतेक तपशील स्वतःच्या वेबसाइटद्वारे जाहीर करण्याचा निर्णय घेतला आहे, फोनचा प्रोसेसर, चार्जिंग स्पीड आणि बरेच काही यासारख्या काही निवडक तपशीलांची माहिती दिली आहे. लॅन्डिंग पेज वर आता कॉस्मॅटिक डिझाईन आहे. सोबतच फोन चे रंग देखील समोर आले आहेत.
Vivo V50 चे डिझाईन त्याच्या पूर्वीच्या फोनप्रमाणे आहे. फोनला rounded appearance आहे. त्याच्या डिझाइनमध्ये एक लक्षणीय बदल त्याच्या डिस्प्लेमधून येतो. हे यापुढे dual-curved edge panel नाही, तर quad-curved panel आहे, याचा अर्थ Vivo V40 प्रमाणे डिस्प्ले फक्त दोन (डावीकडे आणि उजवीकडे) ऐवजी चारही बाजूंच्या कडांवर थोडासा curve आहे.
फोनचा आय पी रेटिंग पाहता तो सुधारला आहे. IP68 आणि IP69 असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. हा फोन Rose Red, Starry Blue, Titanium Grey मध्ये हा फोन उपलब्ध आहे.
वेबसाईट वर देण्यात आलेल्या माहितीनुसार, फोनमध्ये 3 कॅमेरे आहेत. त्यात 50 मेगापिक्सेल सेंसर आहेत. यामध्ये 50-मेगापिक्सलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा, 50-मेगापिक्सलचा primary cameraआणि 50-मेगापिक्सेलचा ultrawide camera समाविष्ट असेल. Vivo चे Aura Light वैशिष्ट्य देखील उपस्थित आहे परंतु मागील मॉडेलच्या तुलनेत ते आकाराने खूप मोठे दिसते.
landing page वरील माहितीनुसार, 6,000mAh बॅटरी, Funtouch OS 15, आणि काही AI आणि कॅमेरा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत ज्यांनी अलीकडेच कंपनीच्या फ्लॅगशिप मॉडेल, Vivo X200 Pro मध्ये स्थान मिळवले आहे. त्याच्या प्रोसेसर आणि चार्जिंग स्पीड ची पुष्टी झालेली नाही. मागील अहवालात असे दिसून आले आहे की Vivo V50 मध्ये Qualcomm Snapdragon 7 Gen 3 SoC असेल. दुसऱ्या रिपोर्टनुसार हा फोन भारतात 18 फेब्रुवारीला लॉन्च होऊ शकतो.
जाहिरात
जाहिरात