OriginOS ची ग्लोबल लाँचिंग सुरू; Vivo V60 ऑगस्ट महिन्यात भारतात लॉन्च साठी सज्ज

आगामी Vivo V60 मध्ये Snapdragon 7 Gen 4 SoC. या चीपसेटचा समावेश असू अशी माहिती समोर आली आहे. मागील लीक्सनुसार, Vivo V50 चा हा 1.5K रिझोल्यूशनसह 6.67-इंच डिस्प्लेसह येऊ शकतो.

OriginOS ची ग्लोबल लाँचिंग सुरू; Vivo V60 ऑगस्ट महिन्यात भारतात लॉन्च साठी सज्ज

Photo Credit: Vivo

Vivo V60 हा स्मार्टफोन Vivo S30 च्या सुधारित आवृत्ती म्हणून लाँच होण्याची शक्यता आहे (चित्रात)

महत्वाचे मुद्दे
  • Vivo V60 Mist Grey, Moonlit Blue, आणि Auspicious Gold रंगांच्या पर्याया
  • OriginOS out-of-the-box सह येणारा हा Vivo चा पहिलाच हॅन्डसेट असू शकतो जो
  • Vivo V60 मध्ये 90W चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.
जाहिरात

Vivo V50आणि Vivo V50e स्मार्टफोन्स भारतात लॉन्च केल्यानंतर आता Vivo V60 येण्यासाठी सज्ज आहे. यापूर्वी, हा स्मार्टफोन विविध certification databases वर दिसला होता आणि आता X tipster कडून आलेल्या एका नवीन लीकमुळे भारतात त्याच्या लाँचिंग तारखेचे संकेत मिळाले आहेत. टिपस्टरच्या माहितीनुसार, Android 16, वर आधारित OriginOS, फोनसोबत देशात पदार्पण करेल. पुढील महिन्यात भारतात Vivo V60 स्मार्टफोन लाँच करण्याची तयारी करत आहे. या हँडसेटमध्ये अलीकडेच लाँच झालेल्या Vivo S30 शी बरेच साधर्म्य असण्याची अपेक्षा आहे. हा स्मार्टफोन OriginOS सोबत येणारा हा पहिला Vivo हँडसेट असू शकतो.

Vivo V60 ची लॉन्च डेट, डिझाईन आणि स्पेसिफिकेशन्स काय?

Vivo ने अधिकृतपणे V60 स्मार्टफोनच्या लाँचिंगची तारीख जाहीर केलेली नाही, टिपस्टर अभिषेक यादव यांच्या एका ताज्या लीकमध्ये म्हणाले आहेत की हा स्मार्टफोन भारतात 19 ऑगस्ट रोजी लाँच होऊ शकतो. पुढे, टिपस्टरने असेही म्हटले आहे की Vivo V60 मध्ये OriginOS चा global debut होईल, ही ऑपरेटिंग सिस्टम आतापर्यंत कंपनीच्या चीन लाइनअपसाठी खास करून उपलब्ध करून दिली जात होती.

X वरील Tipster Yogesh Brar यांच्या माहितीनुसार Vivo V60 Mist Grey, Moonlit Blue, आणि Auspicious Gold रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. ट्विटमध्ये दाखवलेल्या रेंडर्सवरून असे दिसून येते की निळ्या रंगाच्या प्रकारात पॅटर्न असलेली डिझाइन आहे, तर गोल्ड शेडमध्ये प्लेन बॅक आहे. फोनमध्ये पिल-आकाराचा कॅमेरा मॉड्यूल देखील आहे ज्यामध्ये दोन कॅमेरा सेन्सर आणि Zeiss ब्रँडिंग आहे, जसे Vivo च्या मागील V सीरीज स्मार्टफोन्समध्ये आहे.

पूर्वीच्या काही रिपोर्ट्सनुसार, मे महिन्यात चीन मध्ये लाँच झालेला Vivo V60 हा Vivo S30 सारखाच असेल. त्यामुळे, यात 120Hz पर्यंत रिफ्रेश रेटसह 6.67-इंचाचा 1.5K (AMOLED) डिस्प्ले असू शकतो. शिवाय, त्यात Snapdragon 7 Gen आणि 12GB पर्यंत रॅम असण्याची शक्यता आहे. कॅमेरासाठी, Vivo S30 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा युनिट आहे ज्यामध्ये 50MP, 50MP पेरिस्कोप टेलिफोटो कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड कॅमेरा आहे. यात 90W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी आहे.

चीन मध्ये लॉन्च झालेला हा स्मार्टफोन 12GB + 256GB storage सह CNY 2,699 पासून सुरू होतो. ज्याची भारतीय मार्केट मधील किंमत अंदाजे 32 हजारांच्या आसपास आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »