दमदार कॅमेरा आणि बॅटरी सह आला Vivo चा स्टायलिश Vivo V60e

Vivo V60e ची किंमत 29,999 रूपयांपासून सुरू होते ते टॉप मॉडेल साठी सुमारे 33,999 रूपये मोजावे लागणार आहेत.

दमदार कॅमेरा आणि बॅटरी सह आला  Vivo चा स्टायलिश Vivo V60e

Photo Credit: Vivo

Vivo V60e मध्ये २००-मेगापिक्सेल मुख्य सेन्सरसह ड्युअल-रीअर कॅमेरा युनिट आहे

महत्वाचे मुद्दे
  • Vivo V60e या स्मार्टफोनमध्ये 6.77-inch Quad Curved AMOLED display आहे
  • फोनला डायमंड शिल्ड ग्लास, लो ब्लू लाईट
  • हा स्मार्टफोन Android 15-based Funtouch OS 15 वर चालणार आहे
जाहिरात

Vivo कडून  V-series लाईनअप मधील आगामी स्मार्टफोन ‘Vivo V60e'भारतात लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन मिड रेंज स्मार्टफोन पोर्टफोलिओ  मधील आहे. 7 ऑक्टोबर दिवशी लॉन्च झालेल्या या स्मार्टफोनमध्ये  MediaTek Dimensity 7360-Turbo chipset, असून तो 12GB of RAM आणि 256GB of internal storage सोबत जोडलेला आहे. हा स्मार्टफोन Android 15-based Funtouch OS 15 वर चालणार आहे.  

Vivo V60e ची भारतामधील किंमत   

Vivo V60e ची भारतामधील किंमत  8GB RAM + 128GB storage variant साठी 29,999 रूपयांपासून सुरू होते. 8GB + 256GB व्हेरिएंटसाठी ग्राहकांना 31,999 रूपये मोजावे लागणार  आहेत. टॉप मॉडेल   12GB RAM आणि   256GB storage  साठी  ग्राहकांना सुमारे 33,999    रूपये मोजावे लागणार आहेत. हा फोन सध्या ग्राहकांना दोन रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. विवो च्या अधिकृत संकेतस्थळावरून ग्राहक हा स्मार्टफोन विकत घेऊ शकणार आहेत.  तसेच अधिकृत रिटेल शॉप मध्येही फोनची विक्री होणार आहे.   

Vivo V60e ची स्पेसिफिकेशन्स   

Vivo V60e या स्मार्टफोनमध्ये 6.77-inch Quad Curved AMOLED display आहे. तर  120Hz refresh rate, 1,600 nits peak brightness आहे.  फोनला Diamond Shield Glass protection आहे. Low Blue Light certification देखील देण्यात आले आहे. यामुळे फोनची वापरण्यास आणि हाताळण्यास सहज सोपा आहे.  फोनमध्ये dual-rear camera setup आहे. फोनमध्ये 200 megapixel primary sensorआहे. ज्याला  

OIS सपोर्ट आहे. त्यासोबतच 8-megapixel ultrawide lens आहे. Aura Light system आहे.  समोर, डिव्हाइसमध्ये  50-मेगापिक्सेल आय ऑटो-फोकस ग्रुप सेल्फी कॅमेरा एका होल-पंच कटआउटमध्ये आहे. विवोचा दावा आहे की हा भारतातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यामध्ये एआय फेस्टिव्हल पोर्ट्रेट, एआय फोर सीझन पोर्ट्रेट आणि इमेज एक्सपांडर मोड आहेत, जे यूजर्सना creative flexibility देतात.    

V60e स्मार्टफोनची बॅटरी 6,500mAh आहे त्याला 90W wired fast charging चा सपोर्ट आहे. कनेक्टीव्हिटी साठी  NFC,नेटवर्क साठी 360-degree Omnidirectional Antenna आहे.  विवोचं लक्ष टिकाऊपणा वर देखील आहे. या हॅन्डसेटला IP68 आणि  IP69 रेटिंग आहे. त्यामुळे हा फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. सॉफ्टवेअरच्या बाबतीत, फोनमध्ये एआय कॅप्शन, एआय इरेज 3.0, एआय स्मार्ट कॉल असिस्टंट आणि जेमिनी इंटिग्रेशन सारखी अनेक नवीन एआय-टूल्स आहेत, जी रोजचा  संवाद अधिक सहजतेने वापरता येतील यासाठी डिझाइन केलेली आहेत. 

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. लॉन्चपूर्वीच Lava Shark 2 च्या डिस्प्लेचे स्पेसिफिकेशन्स झाले जाहीर; इथे घ्या जाणून
  2. HMD Touch 4G मध्ये 3.2-इंच डिस्प्ले, Unisoc T107 प्रोसेसर; इथे पहा स्पेसिफिकेशन्स
  3. Amazon Sale 2025 मध्ये Acer, Dell, HP गेमिंग लॅपटॉप्सवर भन्नाट डील्स
  4. OnePlus 15s होणार Snapdragon 8 Elite Gen 5 आणि 100W फास्ट चार्जिंगसह लॉन्च
  5. दमदार कॅमेरा आणि बॅटरी सह आला Vivo चा स्टायलिश Vivo V60e
  6. 50MP triple rear camera सह पहा कोणती खास फीचर्स असणार Samsung Galaxy M17 5G मध्ये
  7. टॉप ब्रँडच्या इलेक्ट्रिक टूथब्रशवर Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये मोठ्या ऑफर्स
  8. iQOO Neo 11 लवकरच लॉन्च होण्याची शक्यता; समोर आली दमदार फीचर्सची माहिती
  9. OnePlus 15 मध्ये मिळणार पॉवरफुल परफॉर्मन्स आणि नवं डिझाईन; इथे पहा अपडेट्स
  10. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये GPS Kids Smartwatch वर 70% पर्यंत सूट मिळणार
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »