Photo Credit: Vivo
Vivo या स्मार्टफोन कंपनीने त्यांच्या T3 सिरीज मधील पुढचा स्मार्टफोन म्हणजेच Vivo T3 Ultra 5G हा स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार असल्याची माहिती समोर आली आहे. पण खरे पाहता, याबाबत कोणतीही स्पष्ट माहिती कंपनीकडून देण्यात आलेली नसून इंटरनेट वर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार चला तर मग बघुयात, काय आहेत Vivo च्या आगामी स्मार्टफोनची म्हणजेच Vivo T3 Ultra 5G ची वैशिष्ट्ये आणि बरेच काही.
Vivo T3 Ultra मध्ये Mediatek Dimensity 9200+ System on chip SoC या चीपसेट द्वारे समर्थित आहे. Vivo या कंपनीने मागच्याच महिन्यात लॉन्च केलेल्यान T3 Pro 5G हा स्मार्टफोन सर्व स्टोरेज प्रकारांमध्ये 8GB पासून सुरू होतो. T3 Ultra हा स्मार्टफोन याच स्मार्टफोनचा पुढचा स्मार्टफोन असल्याने या स्मार्टफोनची रॅम देखील 8 GB इतकी असू शकते. त्याचप्रमाणे या स्मार्टफोनमध्ये 1.5K च्या रिझोल्यूशन सोबत 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.77 इंचाचा AMOLED डिस्प्ले बसवला जाण्याची शक्यता वर्तविण्यात येते. या स्मार्टफोनच्या डिस्प्लेची तेजस्विता ही 4,500 nits पर्यंत वाढविण्यात येऊ शकते.
आता पाहूया Vivo T3 Ultra या स्मार्टफोनच्या कॅमेरा बद्दल. या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलचा Sony IMX921 हा प्राथमिक कॅमेरा सेन्सर असू शकतो. Vivo T3 Pro मध्ये सुध्दा 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देखील देण्यात आला आहे परंतु या स्मार्टफोनमध्ये अंतर्निहित सेन्सर Sony IMX882 आहे. सोबतच या स्मार्टफोनमध्ये प्राथमिक कॅमेरा सोबतच 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सुध्दा बसविण्यात आला आहे. तसेच विडियो कॉल आणि सेल्फी काढण्याच्या सुखद अनुभवासाठी यामध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा देखील देण्यात आला आहे.
Vivo T3 Ultra मध्ये 5500 mAh ची बॅटरी देखील असू शकते, जी 80 वॅटच्या फास्ट वायर्ड चार्जिंगला समर्थन करत असलेली बॅटरी असण्याची अपेक्षा आहे. या स्मार्टफोनला धूळ आणि पाण्याच्या विरोधात प्रतिकार करण्यासाठी IP68 रेटिंग देखील मिळण्याची शक्यता आहे.
Vivo T3 Ultra 5G या स्मार्टफोनच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज या प्रकाराची किंमत भारतामध्ये 30,999 इतकी असणार आहे. तर 256 GB स्टोरेज प्रकाराची किंमत 32,999 आणि 12 GB रॅम प्रकाराची किंमत 34,999 इतकी आहे.
जाहिरात
जाहिरात