Photo Credit: Vivo
Vivo X Fold 5 ची जाडी फोल्ड केल्यावर 9.2 मिमी आणि उघडल्यावर 4.3 मिमी असते
Vivo कडून सोमवार, 14 जुलै दिवशी त्यांचा दुसरा फोल्डेबल फोन Vivo X Fold 5, लॉन्च करण्यात आला आहे. हा फोन Vivo X200 FE सोबत भारतामध्ये लॉन्च झाला आहे. X Fold 3 Pro चा फोन उत्तराधिकारी आहे. नवा Vivo X Fold 5 हा फोन सध्या चर्चेमध्ये आहे. त्याची स्पर्धा Samsung च्या Galaxy Z Fold 7 सोबत आहे. लॉन्चिंग नंतर फोनच्या प्री ऑर्डर्स सुरू आहेत पण प्रत्यक्षात 30 जुलै पासून फोनची विक्री Flipkart आणि Vivo India online store वर सुरू होणार आहे.Vivo X Fold 5 ची स्पेसिफिकेशन्स,Vivo X Fold 5 मध्ये 6.53-inch AMOLED cover display आहे. त्यामध्ये 120 Hz refresh rate आणि 4,500 nits peak brightness आहे. मोबाईलच्या मेन स्क्रिन वर 8.03-inch AMOLED display आहे.. फोनची कव्हर स्क्रिन second gen Armor glass सह प्रोटेक्टेड आहे. फोन मध्ये Snapdragon 8 Gen 3 processor आहे. सोबत 16 GB LPDDR5X RAM आणि 512 GB UFS 4.1 storage आहे. हा फोन Funtouch OS 15 based on Android 15 वर चालतो.
Vivo X Fold 5 मध्ये 50 MP VCS बायोनिक मुख्य कॅमेरा, 50 MP ZEISS टेलिफोटो कॅमेरा, 3x ऑप्टिकल झूम आणि 100x पर्यंत हायपरझूम आणि 50 MP अल्ट्रावाइड लेन्स असेल. X Fold 5 मध्ये कव्हर स्क्रीनवर 20 MP चा फ्रंट लेन्स आणि मुख्य डिस्प्लेवर 20 MP चा लेन्स आहे.
Vivo X Fold 5 हा जेव्हा फोल्ड असेल तेव्हा तो 9.2 mm आणि उघडल्यानंतर 4.3 mm जाडीचा असेल. या फोनचं वजन 217 ग्राम आहे. Vivo X Fold 5 हा IPX8, IPX9 वॉटर रेझिस्टन्स, IPX9+ आणि 5X प्रोटेक्शन असलेला पहिला फोल्डेबल स्मार्टफोन आहे.
Vivo X Fold 5 मध्ये 6,000 mAh बॅटरी आहे, जी कोणत्याही फोल्डेबलपेक्षा सर्वात मोठी आहे. फोन सोबत 80 W चार्जर आहे. फो न 40 W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करणार आहे.
Vivo X Fold 5 मध्ये आवश्यक टूल्स अॅक्सेस करण्यासाठी एक नवीन tactile Shortcut button आहे. त्यात AI इमेजिंग सूटसह Google सह जेमिनी असिस्टंट असेल. त्यात AI इमेज एक्सपेंडर, AI मॅजिक मूव्ह, AI इरेज आणि AI रिफ्लेक्शन इरेज सारखी टूल्स असतील.
जाहिरात
जाहिरात