14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक

Vivo X Fold 5 आणि Vivo X200 FE या स्मार्टफोनमध्ये Zeiss- सपोर्टेड रियर कॅमेरा युनिट्ससह असणार आहेत.

14 जुलै ला लॉन्च होणार्‍या  Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक

Photo Credit: Vivo

Vivo X Fold 5 आणि Vivo X200 FE फ्लिपकार्टवर उपलब्ध असतील

महत्वाचे मुद्दे
  • Vivo X200 FE ची सुरूवात 55 हजारांच्या आसपास असण्याचा अंदाज
  • Vivo X200 FE सोबत Vivo X Fold 5 भारतात 14 जुलैला होणार लॉन्च
  • Vivo X200 FE हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 9300+ chipset वर चालणार
जाहिरात

Vivo X200 FE, हा X Fold 5 प्रमाणे भारतामध्ये लॉन्च साठी सज्ज आहे. 14 जुलै दिवशी दोन्ही स्मार्टफोन्स बाजारात लॉन्च होतील. जून महिन्यात हे फोन चीन, तैवान मध्ये लॉन्च झाले आहेत. Vivo X200 FE हा solid compact flagship स्मार्टफोन असणार आहे. फोनचं डिझाईन आकर्षक आहे, स्पेसिफिकेशन्स उत्तम आहेत. या फोनमध्ये Zeiss-tuned camera setup आहे. Vivo कडून फोनची झलकही दाखवण्यात आली आहे. हा फोन चार रंगांमध्ये उपलब्ध असणार आहे. Flipkart,Vivo e-store वरून हे फोन खरेदी करता येणार असल्याने पहा त्याचे अपडेट्स.Vivo X200 FE, Vivo X Fold 5 ची किंमतTipster Abhishek Yadav, च्या माहितीनुसार Vivo X200 FE हा स्मार्टफोन दोन व्हेरिएंट्स मध्ये बाजारात उपलब्ध केला जाईल. अंदाजे या फोनची किंमत 55 हजारांच्या आसपास असणार आहे. Vivo X200 FE, हा फोन 12GB RAM आणि 256GB व्हेरिएंट मध्ये आहे जो Rs 54,999 मध्ये उपलब्ध असेल तर फोनाचा टॉप एंड व्हेरिएंट 16GB आणि 512GB variant हा Rs 59,999 मध्ये उपलब्ध असण्याचा अंदाज आहे. Vivo X Fold 5 हा 16 GB+512GB या एकाच पर्यायात येणार आहे त्याची किंमत Rs. 1,49,999 असण्याचा अंदाज आहे.

Vivo X200 FE ची स्पेसिफिकेशन्स

Vivo X200 FE ने पुष्टी केलेल्या माहितीनुसार, या फोनमध्ये 6.31-inch AMOLED panel आहे. 120hz refresh rate आणि 0.79 cm thickness आहे. फोनमध्ये MediaTek Dimensity 9300+ chipset आहे. 4nm processआहे. हा फोन 12GB RAM आणि UFS 3.1 storage सह उपलब्ध आहे. Vivo X200 FE मध्ये 6,500 mAh battery आहे तर चार्जर 90W support चा आहे. फोनला IP68, IP69 certification मिळालं असल्याने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. Vivo X200 FE मधील कॅमेरा पाहता तो ट्रिपल रेअर कॅमेरा सेटअप सह आहे. फोन मधील मुख्य कॅमेरा 50MP आहे. 50MP telephoto lens आणि 8MP ultra-wide-angle lens आहे. Amber Yellow, Frost Blue,आणि Luxe Grey shades मध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.

Vivo X Fold 5 फीचर्स

Vivo X Fold 5 भारतात ट्रिपल रियर कॅमेरा युनिटसह येण्याची माहिती आहे, ज्यामध्ये 50-megapixel Sony IMX921 primary sensor, 50-megapixel Sony IMX882 telephoto shooter आणि 50-megapixel Samsung JN1 ultrawide camera आहे. हँडसेटमध्ये 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट असलेली 6000mAh बॅटरी असेल. Titanium Grey shade मध्ये हा फोन उपलब्ध असणार आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. फोल्ड डिझाइनचा सॅमसंगचा नवा स्मार्टफोन भारतात दाखल; पहा फीचर्स
  2. Samsung Galaxy Z Fold 7 भारतात लॉन्च; इथे पहा किंमत, ऑफर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  3. Galaxy Buds 3 Pro वर Amazon Prime Day सेलमध्ये मोठा डिस्काउंट जाहीर
  4. Amazon Prime Day 2025 मध्ये iQOO स्मार्टफोन्सवर जबरदस्त ऑफर्स जाहीर; पहा अपडेट्स
  5. 14 जुलै ला लॉन्च होणार्‍या Vivo X Fold 5 आणि X200 FE च्या किंमती इंटरनेट वर लीक
  6. आयफोनही आता येणार दमदार बॅटरीज सोबत; पहा iPhone 17 Pro Max बद्दलची अपडेट
  7. Honor X9c 5G भारतात 7 जुलै येतोय; 12 जुलै पासून विक्री होणार Amazon वर सुरू
  8. Amazon चा 72 तासांचा Prime Day सेल जाहीर; पहा स्मार्टफोन सह कोणत्या वस्तूंवर मिळणार सूट
  9. Nothing Headphone (1) भारतात लॉन्च; पहा प्रीमियम फीचर्स, किंमत इथे
  10. Nothing Phone (3) भारतात अखेर आलाच; किंमत ₹79,999 पासून सुरू
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »