Photo Credit: Vivo
Vivo X200 Pro हा कंपनीचा भारतातील सध्याचा प्रमुख स्मार्टफोन आहे
Vivo X200 FE सध्या विकसित होत असून लवकरच भारतीय बाजारपेठांमध्ये flagship X200 lineup मध्ये येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या फोनमध्ये 1.5K OLED screen आहे. या फोनमध्ये सिक्युरिटीच्या दृष्टीने under-display fingerprint scanner आहे. अद्याप या फोनची अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या फोनमध्ये Dimensity 9300+ chipset असण्याचा अ ंदाज आहे. Vivo X200 FE चे दोन SKUs लाँच होणार आहेत, जे जुलैमध्ये होण्याची शक्यता आहे.Vivo X200 FE ची किंमत, उपलब्धतता काय?tipster Yogesh Brar, SmartPrix च्या माहितीनुसार, आगामी Vivo X200 FE हा स्मार्टफोन भारतामध्ये 50 ते 60 हजारांमध्ये उपलब्ध होण्याचा अंदाज आहे. हा फोन जुलै महिन्यामध्ये येऊ शकतो असा अंदाज आहे तर फोन दोन रंगांमध्ये उपलब्ध असेल. रिपोर्टनुसार, Vivo X200 FE दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असू शकतो, एक 12 GB RAM/256GB स्टोरेजसह आणि दुसरा 16GB RAM/512GB स्टोरेजसह.
Vivo X200 FE मध्ये 6.31-inch LTPO OLED screen आहे. 120Hz refresh rate आहे. तर फोन मध्ये under-display fingerprint sensor आणि IP68 + IP69 rating असल्याने तो धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. या फोनचं वजन सुमारे 200 ग्राम असण्याचा अंदाज आहे.
फोनमध्ये Zeiss-branded triple rear camera unit असण्याचा अंदाज आहे. त्यामध्ये 50-megapixel Sony IMX921 primary sensor,आणि 8-megapixel ultra-wide-angle lens,तसेच 50-megapixel Sony IMX882 3x telephoto sensor असू शकतो. फोनमध्ये 50-megapixel front-facing camera असू शकतो ज्याद्वारा सेल्फी आणि व्हिडिओ कॉल करता येऊ शकतो.
Vivo X200 FE मध्ये MediaTek Dimensity 9300+ chipset असण्याचा अंदाज आहे. हा फोन AI फीचर्स सह असू शकतो ज्यामध्ये AI seasonal portraits, एक वैशिष्ट्य जे आतापर्यंत चीनसाठी खास राहिले आहे. Vivo त्याच्या कथित हँडसेटसह तीन वर्षांचे OS आणि चार वर्षांचे security updates ऑफर करेल असे म्हटले जाते. या वर्षी लाँच झालेल्या इतर कोणत्याही Vivo फोनप्रमाणे, X200 FE मध्ये Android 15 वर आधारित नवे FuntouchOS 15 असू शकते.फोनमध्ये 6,500mAh battery आणि 90W fast charging सपोर्ट असणार आहे.
जाहिरात
जाहिरात