Photo Credit: Vivo
Vivo X200 Pro मध्ये V3+ इमेजिंग चिप आहे
Vivo X200 Pro आणि Vivo X200 भारतामध्ये गुरूवारी लॉन्च झाले आहेत. Vivo X series मधील हॅन्डसेट्स हे MediaTek Dimensity 9400 chipset वर चालणार आहेत. Vivo X200 series मध्ये ट्रिपल रेअर कॅमेरा युनिट्स आहेत. हा स्मार्टफोन Zeiss सोबत बनवण्यात आला आहे. प्रो मॉडेल मध्ये Vivo ची in-house V3+ imaging chip आहे. Vivo X200 आणि Vivo X200 Pro मध्ये 5,800mAh आणि 6,000mAh बॅटरीज आहेत.
Vivo X200 Pro भारतामध्ये 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंट 94,999 रूपयांत मिळेल. हा स्मार्टफोन Cosmos Black आणि Titanium Grey या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
vanilla Vivo X200 हा 65,999 रूपयांत मिळेल. हा 12GB RAM + 256GB स्टोरेजचा फोन आहे. 16GB RAM + 512GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत Rs. 71,999 आहे. हा स्मार्टफोन Cosmos Black आणि Natural Green रंगांमध्ये उपलब्ध आहे.
फोनचे दोन्ही मॉडेल्स सध्या प्री बुकिंग साठी उपलब्ध आहेत. 19 डिसेंबर पासून हे स्मार्टफोन उपलब्ध होणार आहेत. Vivo 9 महिन्यांसाठी no-cost EMI पर्याय देणार आहे. 9,500 रूपयांचे इंस्टंट डिस्काऊंट मिळणार आहे. वर्षभरासाठी वॉरंटी वाढवून मिळणार आहे आणि 9500 रूपयांचा एक्सचेंज बोनस मिळणार आहे.
Vivo X200 Pro, Vivo X200 ड्युअल सिम सह आहेत. हे Funtouch OS 15 बेस्ड Android 15 वर चालणारे आहेत. प्रो मॉडेल मध्ये 6.78-inch 1.5K resolution (1,260x2,800) LTPO AMOLED डिस्प्ले आहे. 120Hz refresh rate आहे आणि 452ppi pixel density आहे. फोनचा स्टॅडर्ड मॉडेल हा तुलनेत लहान आहे. 6.67-inch 1.5K resolution (1,260x2,800 pixel) AMOLED 8T LTPS डिस्प्ले आहे. 120Hz refresh rate आणि 460ppi pixel density आहे. दोन्ही फोन्सची स्क्रिन 4,500 nits peak brightness आणि 2,160Hz PWM dimming सह आहे.
Vivo X200 series फोन MediaTek Dimensity 9400 SoC सह 16GB LPDDR5X RAM आणि 512GB UFS 4.0 स्टोरेज सह जोडलेली आहे. प्रो मॉडेल मध्ये 50-megapixel Sony LYT-818 sensor आणि OIS support आहे. 50-megapixel wide-angle camera हा ऑटोफोकस सह आहे. 200-megapixel telephoto ISOCELL HP9 sensor आहे.
जाहिरात
जाहिरात