Photo Credit: Vivo
Vivo X200, Vivo X200 Pro आणि Vivo X200 Pro Mini हे तीन स्मार्टफोन्स मागील महिन्यात चीन मध्ये लॉन्च झाले आहेत. अद्याप विवो ने या फोन्सला ग्लोबली कधी लॉन्च केले जाईल याची माहिती देण्यात आली नाही. मात्र सध्या लीक झालेल्या माहितीनुसार, भारतामध्ये हे तीन फोन पुढील महिन्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे. रिपोर्ट्सनुसार Vivo X200 series मधील सारेच फोन भारतात उपलब्ध होणार नाहीत. Vivo X200 series चे हे स्मार्टफोन MediaTek Dimensity 9400 SoCs वर चालणार आहेत. तर फोनमध्ये Zeiss-branded cameras आहेत.
91mobiles reports नुसार, Vivo कडून Vivo X200 आणि Vivo X200 Pro भारतामध्ये डिसेंबर महिन्यात येणार आहेत. तर विवो कडून X200 Pro Mini भारतामध्ये येणार नाही.
Vivo X200 series मागील महिन्यात लॉन्च झाल्यानंतर सध्या केवळ चीन पुरता मर्यादित आहे. आता हे फोन मलेशिया मध्ये ही लॉन्च होणार आहेत. Vivo X200 Pro Mini जागतिक पातळी वर लॉन्च होणार का? याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. याआधी फोन भारतात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लॉन्च होण्याची शक्यता आहे.
दुर्देवाने, विवो कडून Vivo X200 series भारतामध्ये कधी, कसा उपलब्ध होणार आहे याची माहिती दिलेली नाही. त्यामुळे या तपशीलांबद्दल ठोस माहिती देता येऊ शकत नाही. यापूर्वीचे Vivo X series phones भारताच्या बाजारपेठांमध्ये उपलब्ध झाले आहेत.
Vivo X200 series च्या मोबाईल्सची किंमत CNY 4,300 आहे म्हणजे भारतीय रूपयांमध्ये ही किंमत 51 हजार आहे. ही किंमत बेस मॉडेल 12 जीबी आणि 256 जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची आहे.
Vivo चे X200, X200 Pro, X200 Pro Mini हे फोन Android 15 बेस्ड OS 5,वर चालणारे आहेत.
तर हे तिन्ही फोन MediaTek Dimensity 9400 SoC सह आहे. यामध्ये Zeiss ब्रॅन्डचे ट्रीपल रेअर कॅमेरा सेटअप आहेत. त्यामध्ये 50-megapixel primary camera आहे. Vivo X200 Pro मध्ये 200-megapixel telephoto sensor आहे.
vanilla Vivo X200 मध्ये 5,800mAh बॅटरी आहे, 90W wired charging सपोर्ट आहे. Vivo X200 Pro, X200 Pro Mini मध्ये 6,000mAh आणि 5,800mAh बॅटरीज आहेत. तर 90W wired charging सपोर्ट आहे.
जाहिरात
जाहिरात