भारतात Vivo X200T ची किंमत 12GB RAM आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी 59,999 रुपयांपासून सुरू होते.
Photo Credit: Vivo
Vivo X200T मध्ये Dimensity 9400+ 12GB LPDDR5X RAM 512GB UFS 4.1 स्टोरेज
भारतात आज, 27 जानेवारीला Vivo X200T लाँच करण्यात आला आहे. कंपनीच्या देशातील X200 लाइनअपमध्ये हा नवीन फोन आहे, ज्यामध्ये आधीच X200 आणि X200 Pro मॉडेल्स आहेत. यात Zeiss सोबत को इंजिनिअर केलेले 50 मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरे आहेत. Vivo X200T हा एक सब-फ्लॅगशिप आहे, ज्यामध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.67-इंच AMOLED स्क्रीन आहे. यात 90W फास्ट चार्जिंगसह 6,200mAh बॅटरी आहे.
भारतात Vivo X200T ची किंमत 12GB RAM आणि 256GB ऑनबोर्ड स्टोरेज असलेल्या बेस व्हेरिएंटसाठी 59,999 रुपयांपासून सुरू होते. हे 12GB + 512GB कॉन्फिगरेशनमध्ये देखील उपलब्ध आहे, ज्याची किंमत 69,999 रुपये आहे. ग्राहकांना 5,000 रुपयांचा इन्स्टंट कॅशबॅक किंवा 5,000 रुपयांपर्यंत एक्सचेंज बोनस मिळू शकतो. याशिवाय, त्यांना 18 महिन्यांसाठी नो-कॉस्ट EMI ऑफर देखील मिळू शकतात.
Vivo X200T हा Seaside Lilac आणि Stellar Black रंगात उपलब्ध आहे आणि 3 फेब्रुवारीपासून Vivo इंडिया ई-स्टोअर, फ्लिपकार्ट आणि देशभरातील रिटेल पार्टनर्सकडून खरेदी करता येईल.
Vivo X200T मध्ये ड्युअल-सिम (नॅनो सिम + नॅनो सिम) आहे तर हा Android 16-based Origin OS 6 वर चालतो. याला पाच वर्षांचे ओएस अपग्रेड आणि सात वर्षांचे सुरक्षा अपडेट मिळण्याचे आश्वासन दिले आहे. हँडसेटमध्ये 6.67 इंच (1,260 x 2,800 pixels)AMOLED स्क्रीन आहे ज्याचा रिफ्रेश रेट 120 Hz, पीक ब्राइटनेस 5,000 निट्स आणि 460 PPI पिक्सेल डेन्सिटी आहे.
फोनमध्ये असलेला कॅमेरा पाहता Vivo X200T मध्ये Zeiss-ट्यून केलेला ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 50 मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड-अँगल लेन्स आणि 3x ऑप्टिकल झूमसह 50 मेगापिक्सेलचा टेलिफोटो सेन्सर आहे. यात 32 मेगापिक्सेलचा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे.
Vivo X200T मध्ये 3nm MediaTek Dimensity 9400+ चिपसेट, 12GB LPDDR5X अल्ट्रा रॅम आणि 512GB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज आहे. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, NFC आणि USB Type-C यांचा समावेश आहे. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी या हँडसेटमध्ये IP68 + IP69-रेटेड बिल्ड आहे. यात 6,200mAh बॅटरी आहे, जी 90W वायर्ड चार्जिंग आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करते.
जाहिरात
जाहिरात
iQOO 15R Price in India, Chipset Details Teased Ahead of Launch in India on February 24