Vivo X300 सिरीज फोन्स हे standard X300 फ्री ब्लू, Comfortable Purple, Pure Black, आणि गुलाबी रंगात उपलब्ध असेल अशी माहिती समोर आली आहे.
Photo Credit: Vivo
Vivo X300 Pro (चित्रात) ची रचना त्याच्या आधीच्या मॉडेलसारखीच असल्याचे दिसून येते
विवो आता पुढच्या पिढीतील फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या लॉन्चच्या तयारीमध्ये आहे.VIVO ने पुष्टी केली आहे की Vivo X300 Pro आणि X300 पुढील महिन्यात चीनमध्ये लॉन्च होणार आहेत. सध्या चर्चेत असलेल्या माहितीनुसार, दोन्ही स्मार्टफोन्सना डिस्प्ले, कॅमेरा आणि बॅटरीमध्ये काही अपग्रेड मिळतील. इतकेच नाही तर X300 कोणत्या रंगांमध्ये उपलब्ध असतील याची माहिती देखील समोर आली आहे. त्यात मखमली काच असण्याची देखील पुष्टी झाली आहे. Vivo X300 मालिकेच्या लाँचची तारीख, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत श्रेणीसह समोर आलेले अपडेट्स इथे घ्या जाणून.Vivo X300 Series कधी होणार लॉन्च?Weibo वरील पोस्टच्या माहितीनुसार, Vivo चे Product Manage,Han Boxiao,यांनी घोषणा केली की Vivo X300 सिरीज चीनमध्ये 13 ऑक्टोबर रोजी स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता (भारतीय वेळेनुसार ४:३० वाजता) लाँच केली जाईल. अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, हँडसेटची रचना invisible design technology ने प्रेरित आहे.
Vivo X300 सीरीज मधील एक आकर्षण म्हणजे फोनमधील नवीन कॅमेरा डिझाइन. ज्यामध्ये कोल्ड-स्कल्प्ड ग्लासपासून बनवलेले "सस्पेंडेड वॉटर ड्रॉपलेट" चा समावेश असेल. रंगांच्या बाबतीत, standard X300 फ्री ब्लू, Comfortable Purple, Pure Black, आणि चौथ्या गुलाबी रंगात उपलब्ध असेल अशी माहिती समोर आली आहे.
Vivo X300 सीरीज मध्ये (model number 751440) सह “पहिल्यांदाच कस्टम-बिल्ट” सुपर सेन्स व्हायब्रेशन मोटर येणार असल्याची माहिती आधीच देण्यात आली आहे. त्यात सुधारित डिझाइन आणि प्रगत इलेक्ट्रोमॅग्नेटिक सोल्यूशन्स असल्याचा दावा केला जात आहे.
प्रो मॉडेलमध्ये युनिव्हर्सल सिग्नल अॅम्प्लिफायर चिपसेट आणि ड्युअल-चॅनेल UFS 4.1फोर-लेन ऑनबोर्ड स्टोरेज असेल. Vivo चा दावा आहे की यामुळे वाचन आणि लेखन गती 70% हून अधिक वाढू शकते आणि कमाल 8.6 Gbps गती गाठता येते. दोन्ही हँडसेटमध्ये 200 मेगापिक्सेलचा प्राथमिक शूटर २३ मिमी फोकल लांबी आणि HPB सेन्सर मिळण्याची पुष्टी झाली आहे. Vivo X300 Pro ला ८५ मिमी २००-मेगापिक्सेलचा टेलिफोटो कॅमेरा आणि CIPA 5.5-स्तरीय अँटी-शेक प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता देखील आहे. लीक्सनुसार, X300 ची किंमत सुमारे 69,999 रुपये असू शकते तर X300 Pro ची किंमत सुमारे 99,999 रुपये असू शकते.
जाहिरात
जाहिरात