Vivo X300 Pro मध्ये 8.8x पर्यंत ऑप्टिकल झूम मिळू शकतो, तर स्टँडर्ड X300 मध्ये सुमारे 7x पर्यंत ऑप्टिकल झूम मिळतो.
Photo Credit: Vivo
Vivo X300 आणि X300 Pro चीननंतर भारतात लवकरच उपलब्ध
भारतामध्ये आता 2025 च्या शेवटच्या टप्प्यामध्ये अनेक प्रिमियम स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यामध्ये OnePlus 15,iQOO 15 ते Xiaomi 15 series चा समावेश आहे. येत्या काही महिन्यांत सर्व लवकरच लाँच होणार आहेत. याशिवाय, Vivo X300 सीरीज देखील डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारतात पदार्पण करण्याची शक्यता आहे, असे Smartprix च्या अहवालात म्हटले आहे. विशेष बाब म्हणजे Vivo X300 आणि X300 Pro या लाइनअपमध्ये अलीकडेच चीनमध्ये लाँच करण्यात आले होते आणि ते भारताच्या BIS सर्टिफिकेशन साइटवर आधीच दिसले आहे, जे संकेत देते की लाँचिंग जवळ आले आहे. लीकच्या आधारे, भारतात Vivo चा ZEISS टेलिफोटो एक्सटेंडर किट मिळणार्या पहिल्या जागतिक बाजारपेठांपैकी एक असेल.
X300, X300 Pro दोन्ही ZEISS 2.35x टेलिकन्व्हर्टर लेन्सना सपोर्ट करतात असे म्हटले जाते, जे फोटोची क्लिएरिटी न घालवता मूलतः जास्त काळ ऑप्टिकल झूम करण्यास अनुमती देतात. या किटसह, X300 Pro 8.8x पर्यंत ऑप्टिकल झूम मिळवू शकतो. स्टॅन्डर्ड X300 सुमारे 7x पर्यंत जातो. प्रो मॉडेलची फोकल लेंथ 200mm पर्यंत वाढते आणि नियमित X300 165mm पर्यंत पोहोचते.
चीनमध्ये लाँच झाल्यानंतर, दोन्ही फोनमध्ये MediaTek Dimensity 9500 चिपसेट 16GB LPDDR5X RAM रॅम आणि 1TB UFS 4.0 storage असण्याची शक्यता आहे. ते Android 16 वर आधारित OriginOS 6 वर चालतील अशी अपेक्षा आहे. शिवाय, Vivo X300 मध्ये 1.5K रिझोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटसह 6.31-inch LTPO OLED display असू शकतो, तर X300 Pro मध्ये थोडा मोठा 6.78 इंचाचा डिस्प्ले मिळू शकतो.
X300 मध्ये 200MP Samsung HPB मुख्य कॅमेरा, 50MP अल्ट्रा-वाइड आणि 50MP टेलिफोटो लेन्स मिळण्याची अपेक्षा आहे. दुसरीकडे, X300 Pro मध्ये 50MP Sony LYT-828 मुख्य सेन्सर, 200MP पेरिस्कोप टेलिफोटो लेन्स आणि 50MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा असू शकतो. दोन्हीमध्ये 50MP फ्रंट कॅमेरे आणि कमी प्रकाशात चांगले फोटो काढण्यासाठी OIS लेन्स असण्याची शक्यता आहे. बॅटरीच्या बाबतीत, X300 मध्ये 6,040mAh असण्याची शक्यता आहे, तर Pro मॉडेलमध्ये 6,510mAh असू शकते. दोन्हीमध्ये 90W वायर्ड आणि 40W वायर्ड चार्जिंग सपोर्ट असू शकतो.
जाहिरात
जाहिरात