Vivo X300 आणि X300 Pro दोन्ही फोन्समध्ये Zeiss ब्रँडिंगसह मोठे सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल आहेत.
Photo Credit: Vivo
Vivo X300 लाइनअपमध्ये Zeiss-ट्यून केलेले ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे.
Vivo कडून त्यांची फ्लॅगशीप X300 series बाजारात लॉन्च करण्यात आली आहे. यामध्ये X300 आणि X300 Pro चा समावेश आहे जो यापूर्वीच चीन मध्ये लॉन्च करण्यात आला आहे. या दोन्ही फोनमध्ये X200 सीरीज मधील अनेक अपग्रेड्स आहेत, ज्यामध्ये नवीन MediaTek Dimensity 9500 चिपसेटचा समावेश आहे. X सीरीजप्रमाणेच दोन्ही फोन्समध्ये Zeiss-branded cameras चा समावेश आहे. यामुळे फोन्स यूजर्ससाठी आयडिअल आहेत ज्यांना फोटोग्राफी हे प्राधान्य आहे. चायनीज फोन मेकर्स या वर्षाच्या अखेरीस त्यांचे नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन भारतात आणण्याची अपेक्षा आहे. Vivo चा सबब्रँड iQOO देखील 26 नोव्हेंबर रोजी भारतात त्यांचा फ्लॅगशिप, iQOO 15 लाँच करणार आहे. Vivo X300 सिरीजमध्ये कंपनीच्या परिचित X सिरीज डिझाइनचा समावेश आहे. दोन्ही फोन्समध्ये Zeiss ब्रँडिंगसह मोठे सर्क्युलर कॅमेरा मॉड्यूल आहेत. X300 हे दोन रंगांमध्ये येतो ज्यात हॅलो पिंक आणि फॅंटम ब्लॅक यांचा समावेश आहे. X300 Pro ड्यून ब्राउन आणि फॅंटम ब्लॅक पर्यायांमध्ये येतो. दोन्ही फोन्स IP68 वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्ससह येतात.
दोन्ही फोन्समध्ये मागील बाजूस ट्रिपल कॅमेरा सेटअप आहेत. X300 Pro मध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन (OIS) सह 50 MP मुख्य सेन्सर, 50 MP अल्ट्रा-वाइड सेन्सर आणि OIS सह 200 MP पेरिस्कोप टेलिफोटो आहे. Vivo X300 मध्ये OIS सह 200 MP चा प्रायमरी सेन्सर, 50 MP पेरिस्कोप टेलिफोटो आणि Pro प्रमाणेच 50 MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. दोन्ही फोन्समध्ये Zeiss-ब्रँडेड कॅमेरे आहेत. X300 आणि X300 Pro दोन्हीमध्ये 50-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे.
Vivo X300 आणि X300 Pro हे MediaTek च्या नवीन फ्लॅगशिप चिपसेट, Dimensity 9500 द्वारे सपोर्टेड आहेत. दोन्ही डिव्हाइस LPDDR5x रॅमला सपोर्ट करतात. X300 आणि X300 Pro च्या ग्लोबल व्हर्जेनमध्ये त्यांच्या चिनी फोन्सप्रमाणे लहान बॅटरी आहेत. युरोपमध्ये लाँच झालेल्या X300 Pro मध्ये 5,440mAh बॅटरी आहे, जी चीनमध्ये 6,510mAh आहे. स्टॅन्डर्ड X300 मध्ये 5,360mAh बॅटरी पॅक आहे, जो चीनमध्ये 6,040mAh पेक्षा कमी आहे. दोन्ही डिव्हाइस 90W वायर्ड आणि 40W वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करतात.
X300 युरोपमध्ये 12GB + 256GB व्हेरिएंट 1,049 युरो (अंदाजे 1,07,600 रूपये) लाँच करण्यात आला होता. X300 Pro च्या एकमेव 16GB + 512GB मॉडेलची किंमत 1,399 युरो (अंदाजे 1,43,000 रूपये) आहे.
जाहिरात
जाहिरात