Photo Credit: Vivo
Vivo Y19s हा फोन जगभर ऑक्टोबर महिन्यात समोर आला आहे. मात्रकंपनीकडून या फोनबाबत किंमत सह अन्य कोणतेही तपशील दिलेले नव्हते. आता Vivo कडून फोनच्या किंमती आणि RAM आणि storage configurations यांची माहिती समोर आली आहे. हा फोन ब्रॅन्डच्या रीजनल वेबसाईट वर लिस्ट झाला आहे. यामध्ये 6.68-inch 90Hz HD+ LCD screen आहे. Unisoc T612 chipset आहे तर 50-megapixel प्रायमरी कॅमेरा आहे आणि फोनमध्ये 5,500mAh battery आहे. तर 15W wired चार्जिंग सपोर्ट आहे. अजूनही हा फोन भारतामध्ये कधी लॉन्च होईल याची माहिती दिलेली नाही.
Vivo Y19s ची थायलंड मधील किंमत THB 3,999 आहे. भारतीय रूपयांमध्ये हा फोन 9800 रूपयांना उपलब्ध आहे. जो 4GB + 64GB व्हेरिएंटचा फोन आहे. यासोबतच 4GB + 128GB आणि 6GB + 128GB व्हेरिएंटची किंमत THB 4,399 (Rs. 10,800) आणि THB 4,999 (Rs. 12,300) आहे. सध्या हा फोन Vivo Thailand e-store द्वारा उपलब्ध आहे.
Vivo Y19s हा 3 रंगांमध्ये उपलब्ध आहे. जो Glacier Blue, Glossy Black, आणि Pearl Silver मध्ये येणार आहे.
Vivo Y19s मध्ये 6.68-inch HD+ (720 x 1,608 pixels) LCD screen सह 90Hz refresh rate आणि 264ppi pixel density सोबत येणार आहे. या स्मार्टफोन मध्ये 12nm octa-core Unisoc T612 SoC हे 6GB of LPDDR4X RAM आणि 128GB of eMMC 5.1 onboard storage सोबत जोडलेला आहे. हा फोन Android 14-based Funtouch OS 14 वर चालणार आहे.
कॅमेरा पाहता Vivo Y19s मध्ये dual rear camera unit आहे. यामध्ये 50-megapixel primary sensor आहे. f/1.8 aperture आणि 0.08-megapixel depth sensor तर f/3.0 aperture आहे. फ्रंट कॅमेरा हा 5-megapixel sensor हा सेल्फीसाठी आहे.
Vivo Y19s मध्ये 5,500mAh बॅटरी आहे. तर फोनला 15W wired charging आहे. सुरक्षेसाठी side-mounted fingerprint sensor आहे. फोन हा IP64-rated build असल्याने धूळ आणि पाण्यापासून संरक्षण करणारा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी 4G LTE, dual-band Wi-Fi, Bluetooth 5.2, GPS आणि USB Type-C port आहे. या फोनचा आकार 165.75 x 76.10 x 8.10mm आहे तर वजन 198g आहे.
जाहिरात
जाहिरात