Photo Credit: Vivo
Vivo Y300 GT काळ्या आणि शॅम्पेन गोल्ड शेड्समध्ये येईल असे सांगितले जात आहे
Vivo Y300 आणि Vivo Y300 Pro चीन मध्ये सप्टेंबर आणि डिसेंबर 2024 मध्ये लॉन्च झाले आहेत. आता काही आठवड्यांपूर्वी Vivo Y300 Pro+ आणि Vivo Y300t या व्हेरिएंट्सना समोर आणण्यात आले आहे. Vivo Y300 GT ची लॉन्च डेट सोबतच या फोनच्या डिझाईन आणि महत्त्वाच्या फीचर्स बद्दल माहिती देण्यात आलेली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन iQOO Z10 Turbo चा रिब्रॅन्डेड फोन आहे.Vivo Y300 GT कधी होणार लॉन्च?Vivo Y300 GT चीन मध्ये 9 मे दिवशी सकाळी 10 वाजता लॉन्च होणार आहे. कंपनीकडून Weibo post मध्ये त्याची माहिती देण्यात आली आहे. हा "durable audio-visual trio." असा सांगण्यात आला आहे. प्रोमोशनल इमेज मध्ये हा फोन काळा आणि सोनेरी रंगांमध्ये दिसत आहे.
Vivo Y300 GT चं डिझाईन हे iQOO Z10 Turbo series च्या फोन प्रमाणेच आहे, जो चीन मध्ये सोमवारी लॉन्च झाला आहे. फोनमध्ये "squircle" rear camera module आहे. ज्यात दोन कॅ मेरा सेंसर्स आहेत. रिंग प्रमाणे LED flash unit आहे. रेअर पॅनल वर हे डाव्या कोपर्यात आहे. फोनमध्ये पॉवर बटण आणि व्हॉल्युम रॉकर उजव्या बाजूला आहे.
TMall product page वरील टीझर इमेज प्रमाणे Vivo Y300 GT डिस्प्लेमध्ये अतिशय पातळ बेझलसह फ्लॅट डिस्प्ले, थोडी जाड चीन आणि वरच्या बाजूला मध्यभागी होल-पंच कटआउट असेल. लिस्टिंग नुसार, MediaTek Dimensity 8400 SoC आणि 90W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,620mAh बॅटरीद्वारे चा सपोर्ट असणार आहे.
Vivo Y300 GT हा iQOO Z10 Turbo model च्या बेस मॉडेल प्रमाणेच असेल असा अंदाज आहे. जर हे खरं असेल तर Vivo Y200 GT च्या या आगामी फोनमध्ये 50-megapixel Sony LYT-600 main rear sensor सोबत 2-megapixel depth sensor आणि 16-megapixel selfie shooter असणार आहे. यामध्ये 6.78-inch 144Hz 1.5K AMOLED screen आहे. ज्यात SGS Low Blue Light आणि Low Flicker certifications आहे.
जाहिरात
जाहिरात