Vivo सध्या Y31 5G बाजारात आणण्याच्या विचारामध्ये आहे. हा बजेट फ्रेंडली फोन असणार आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन आणि लॉन्च डेट बाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही.
Photo Credit: Vivo
Vivo Y30 5G (चित्रात) जुलै २०२२ मध्ये निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये लाँच करण्यात आला
Vivo भारतामध्ये त्यांच्या स्मार्टफोनच्या लाईनअप मध्ये वाढ करण्याच्या विचारामध्ये आहे. आता बाजारात त्यांचा Vivo Y31 5G हा नवा स्मार्टफोन येण्याच्या तयारीमध्ये आहे. अद्याप विवो कडून याबाबत अधिकृत घोषणा झाली नाही, मात्र त्याच्या लॉन्च बद्दल काही रिपोर्ट्स समोर आले आहे. मूळ Vivo Y31 हा स्मार्टफोन 4G model मध्ये जानेवारी 2021 ला लॉन्च झाला होता. फीचर्स आणि किंमतींच्या संतुलनाने एक आदर्श निर्माण केला आहे. आता, येणाऱ्या 5G स्मार्टफोनचे उद्दिष्ट त्याच्यावरच उभारणीचे आहे. मग पहा Vivo Y31 5G चे अपडेट्सVivo Y31 5G भारतामध्ये कधी होणार लॉन्च?PassionateGeekz,सह सूत्रांच्या माहितीनुसार, Vivo सध्या Y31 5G बाजारात आणण्याच्या विचारामध्ये आहे. हा बजेट फ्रेंडली फोन असणार आहे. या फोनच्या स्पेसिफिकेशन आणि लॉन्च डेट बाबत अजूनही माहिती समोर आलेली नाही. इंडस्ट्री एक्सपर्ट्स नुसार, Vivo लवकरच त्याची देखील माहिती देतील. यामध्ये फोनची किंमत, उपलब्धता आणि मिड रेंज मध्ये त्याचे असलेले स्थान समोर येईल.
Vivo Y31 4G मध्ये 6.58-inch full-HD+ IPS LCD display होता. फोनमध्ये 5,000mAh battery होती. फोनमध्ये 48MP ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. त्यामध्ये रेअर आणि 16MP camera फ्रंटला सेल्फी साठी आहे. Vivo Y31 4G हा Qualcomm च्या Snapdragon 662 processor वर चालतो. तर तो 6GB RAM आणि 128GB storage configuration सोबत जोडलेला आहे. या फोनची किंमत Rs. 16,490 आहे.
फोनच्या तुलने मध्ये जुलै 2022 मध्ये निवडक जागतिक बाजारपेठांमध्ये लाँच झालेला Vivo Y30 5G, MediaTek Dimensity 700 chipset आणि त्याच बॅटरी क्षमतेसह आहे. यात 50MP ड्युअल रिअर कॅमेरा सिस्टम आणि 8MP फ्रंट कॅमेरा आहे, ज्यामध्ये थोडीशी लहान 6.51-इंच HD+ IPS स्क्रीन आहे. फोनमध्ये 4 D vibration आणि fingerprint sensorआहे.
Vivo Y31 5G व्यतिरिक्त, Vivo ने अलीकडेच Vivo Y400 मॉडेलची घोषणा केली आहे, जो 4 ऑगस्ट रोजी इंडोनेशियामध्ये लाँच होणार आहे. या नवीन हँडसेटमध्ये 6.67-इंच 120Hz AMOLED डिस्प्ले, 6,000mAh बॅटरी आणि 50MP Sony IMX852 सेन्सरद्वारे हायलाइट केलेला ड्युअल रियर कॅमेरा सेटअप आहे. Vivo Y400 IP68 आणि IP69 रेटिंग असल्या ने फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित राहणार आहे. या मध्ये AI tools चा समावेश आहे. ज्यात AI-द्वारा ट्रान्सक्रिप्शन आणि नोट समरीझेशन तसेच विंडोज इंटिग्रेशन फीचर्सचा समावेश आहे.
जाहिरात
जाहिरात