जाणून घ्या, का Vivo ने केली आहे Vivo Y58 5G ची किंमत कमी

Vivo ने दोन महिन्यापूर्वीच म्हणजेच जून 2024 मध्येच भारतात आपला Vivo Y58 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता.

जाणून घ्या, का Vivo ने केली आहे Vivo Y58 5G ची किंमत कमी
महत्वाचे मुद्दे
  • Vivo Y58 5G स्मार्टफोन Snapdragon 4 Gen 2 SoC ne समर्थित आहे.
  • स्मार्टफोनमध्ये धूळ आणि स्प्लॅश प्रतिरोधक म्हणून IP64-रेटेड दिले आहे.
  • Vivo Y58 5G हा 44W वायर जलद चार्जिंगचे समर्थन करतो.
जाहिरात
Vivo या स्मार्टफोन कंपनीने दोन महिन्यापूर्वीच म्हणजेच जून 2024 मध्येच भारतात आपला Vivo Y58 5G हा स्मार्टफोन लॉन्च केला होता. आणि फक्त दोन महिन्यातच Vivo ने या स्मार्टफोनची किंमत कमी केली आहे. आता तुम्हाला असे वाटेल, की आम्ही तुम्हाला नक्कीच कोणत्या तरी ऑफरबाबत किंवा सेलबाबत सांगत आहोत, ज्यामध्ये या स्मार्टफोनच्या किंमतीवर सवलत मिळत असेल, तर असं अजिबात नाही आहे. Vivo ने या स्मार्टफोनवर कोणतीही सवलत न देता याची किंमत भारतात कायमचीच कमी केली आहे. यामागे कदाचित स्मार्टफोनची वाढती मागणी किंवा विक्रिसाठीची धोरणे असू शकतात. चला तर मग बघुया काय आहेत Vivo Y58 5G ची वैशिष्ट्ये आणि नवीन किंमत.

Vivo Y58 5G ची वैशिष्ट्ये


Vivo Y58 5G या स्मार्टफोनचा डिस्प्ले 6.7 इंचाचा असून 120Hz च्या रिफ्रेश रेटसोबतच HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे, जिची तेजस्विता 1024nits पर्यंत वाढवता येऊ शकते. 4nm Snapdragon 4 Gen 2 SoC या प्रोसेसर द्वारे समर्थित असलेल्या स्मार्टफोनला TUV Rheinland Low Blue Light चे प्रमाणपत्र सुद्धा मिळाले आहे. 

8GB LPDDR4x रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला हा Vivo Y58 5G फक्त एकच प्रकारात मोडतो. रॅम किंवा स्टोरेजच्या आधारावर स्मार्टफोनचे वेगवेगळे प्रकार पडत नाहीत. त्यासोबतच मायक्रोएसडी कार्ड स्लॉट ची क्षमता ही 1 TB पर्यंत ठेवण्यात आली आहे. या स्मार्टफोनमध्ये मागील बाजूस दोन कॅमेऱ्यांचा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये प्राथमिक कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा असून 2 मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा ही देण्यात आला आहे. सोबत LED फ्लॅश सुध्दा आहे. सेल्फी प्रेमींसाठी यामध्ये 8 मेगलिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 

Vivo Y58 5G या स्मार्टफोनच्या उजव्या बाजूस सुरक्षा हेतू फिंगरप्रिंट स्कॅनर दिला आहे. हा स्मार्टफोन धूळ आणि पाणी प्रतिरोधक असल्याने पावसामध्ये या स्मार्टफोनला कोणतेही नुकसान होऊ शकत नाही. हिरवा आणि निळा अशा रंगांमध्ये उपलब्ध असलेल्या या स्मार्टफोनचे वजन फक्त 199 ग्रॅम आहे. याची बॅटरी 6000 mAh ची असून 44 वॅटच्या जलद चार्जिंगचे समर्थन करते. त्यामुळे एकदा चार्ज केल्यानंतर संपूर्ण दिवसभर हा स्मार्टफोन आरामात चालू शकतो. 

Vivo Y58 5G ची नवीन किंमत


जूनमध्ये लॉन्च झाल्यानंतर Vivo Y58 5G ची किंमत 19,499 रुपये ठेवण्यात आली होती. 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या एकमेव प्रकारचा स्मार्टफोन आता तुम्ही 18,499 रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Vivo ने बदलेल्या या स्मार्टफोनच्या किंमतीमध्ये 1,000 रुपये कमी करण्यात आले आहेत. 8 ऑगस्ट 2024 पासून सर्वत्र हा स्मार्टफोन तुम्ही नवीन किंमतीमध्ये खरेदी करू शकता.
Comments

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Motorola Edge 70 भारतात दाखल; दमदार प्रोसेसर, अल्ट्रा-स्लिम बॉडी खास आकर्षण
  2. लॉन्चपूर्वी समोर आले OnePlus Max चे स्पेसिफिकेशन्स; इथे पहा अपडेट्स
  3. WhatsApp वर वाढणार सिक्युरिटी! ‘Strict Account Settings’ फीचरची चाचणी सुरू
  4. Lava Agni 4 ची किंमत आणि मुख्य फीचर्स लाँचपूर्वीच झाले लीक; इथे पहा अपडेट्स
  5. Motorola चा Moto G67 Power 5G भारतात लॉन्च; मोठी बॅटरी, दमदार कॅमेरा पॉवरने फोन सज्ज
  6. Galaxy A57 मॉडेल नंबर आला समोर, Samsung चा नवीन fमड-रेंज फोन येणार बाजारात
  7. Poco F8 Ultra आण F8 Pro च ग्लोबल लाँच निचत; दमदार परफॉमन्सची अपक्षा
  8. Oppo Reno 15 सिरीज भारतात येण्यासाठी सज्ज; Geekbench वर दिसली झलक
  9. Realme C85 5G आणि Pro 4G लाँच; बॅटरी बॅकअप आणि फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळणार
  10. Vivo चा नवीन Y19s 5G स्मार्टफोन भारतात दाखल, पहा किंमत काय?
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »