Xiaomi 15T Pro स्मार्टफोन HyperOS 2 वर चालतो. यात 6.83-इंचाचा 1.5K AMOLED LIPO डिस्प्ले देण्यात आला आहे.
Photo Credit: Xiaomi
Xiaomi 15T Pro काळा, राखाडी आणि मोचा गोल्ड रंगात येतो.
Xiaomi 15T आणि Xiaomi 15T Pro हा नुकताच लॉन्च झाला आहे. कंपनीकडून जर्मनी मधील Munich मध्ये फोनच्या लॉन्चची घोषणा करण्यात आली आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity processors आणि triple rear cameras आहे. जो Leica सोबत साकारण्यात आला आहे. Xiaomi 15T Pro मध्ये Dimensity 9400+ chipset चा समावेश आहे. तर standard Xiaomi 15T मध्ये Dimensity 8400 Ultra SoC चा समावेश आहे. दोन्ही फोनमध्ये 5,500mAh बॅटरीज आणि थर्मल मॅनेजमेंटसाठी 3D IceLoop System चा समावेश आहे. जो IP68 rating सह असल्याने फोन पाणी आणि धूळीपासून सुरक्षित आहे. Xiaomi 15T Pro मध्ये 90W wired charging आणि 50W wireless charging चा समावेश आहे.
Xiaomi 15T Pro ची किंमत 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलसाठी GBP 649 (अंदाजे 77,000 रुपये) पासून सुरू होते. 12GB + 512GB आणि 12GB + 1TB कॉन्फिगरेशनची किंमत अनुक्रमे GBP 699 (अंदाजे 83,000 रुपये) आणि GBP 799 (अंदाजे 99,000 रुपये) आहे. हा स्मार्टफोन Black, Grey आणि Mocha Gold रंग पर्यायांमध्ये उपलब्ध असेल.
स्टँडर्ड Xiaomi 15T च्या 12GB RAM + 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत GB 549 (अंदाजे 65,000 रुपये) आहे. 512GB स्टोरेज व्हेरिएंट GB 549 (अंदाजे 65,000 रुपये) मध्ये देखील खरेदी करता येईल. हा ब्लॅक, ग्रे आणि रोझ गोल्ड रंगांमध्ये उपलब्ध आहे.
ड्युअल-सिम सपोर्ट असलेला Xiaomi 15T Pro स्मार्टफोन HyperOS 2 वर चालतो. यात 6.83-इंचाचा 1.5K AMOLED LIPO डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्यामध्ये 144Hz रिफ्रेश रेट, 447ppi पिक्सेल डेन्सिटी आणि 480Hz टच सॅम्पलिंग रेट आहे. या स्क्रीनला Corning Gorilla Glass 7i प्रोटेक्शन देण्यात आले आहे. परफॉर्मन्ससाठी या डिव्हाईसमध्ये 3nm ऑक्टा-कोर MediaTek Dimensity 9400+ चिपसेट आहे. यात 12GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 1TB पर्यंत UFS 4.1 स्टोरेजची सुविधा उपलब्ध आहे.
स्टँडर्ड शाओमी 15T मध्ये शाओमी 15T प्रो प्रमाणेच सॉफ्टवेअर, डिस्प्ले आणि फ्रंट कॅमेरा आहे, तसेच त्याच IP रेटिंगची सुविधा आहे. या फोनचा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटपर्यंत सपोर्ट करतो. परफॉर्मन्ससाठी यात MediaTek Dimensity 8400 Ultra SoC आहे, ज्यासोबत 12GB पर्यंत LPDDR5X RAM आणि 512GB पर्यंत UFS 4.0 स्टोरेजची सुविधा आहे. फोनमध्ये मेगापिक्सेल Light Fusion 800 सेन्सर, 50 मेगापिक्सेल टेलीफोटो सेन्सर आणि 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा समाविष्ट आहे.
जाहिरात
जाहिरात