Xiaomi 16 मध्ये 7,000mAh battery असू शकते. त्याला 100W fast wire आणि 50W wireless charging चा सपोर्ट असणार आहे.
Photo Credit: Xiaomi
Xiaomi 16 हा Xiaomi 15 ला यशस्वी करेल अशी अपेक्षा आहे
Xiaomi चा आगामी फ्लॅगशीप Xiaomi 16 हा महिना अखेरीपर्यंत लॉन्च होण्याच्या तयारीमध्ये आहे. या स्मार्टफोनमधील काही फीचर्स सध्या ऑनलाईन माध्यमातून लीक झाले आहेत. एका विश्वासू टीपस्टरच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीवरून Xiaomi 16 ची स्पेसिफिकेशन आता समोर आली आहे. हा स्मार्टफोन मागील वर्षीच्या Xiaomi 15 चा उत्तराधिकारी आहे. दरम्यान Xiaomi 16 हा प्रीमियम फीचर्ससह लवकरच बाजारात येण्याची शक्यता आहे. हा फोन Android 15 आधारित HyperOS वर चालू शकतो, ज्यामुळे अधिक चांगली कार्यक्षमता आणि सॉफ्टवेअर अनुभव मिळेल. तसेच AI आधारित कॅमेरा फीचर्ससह अपग्रेडेड फोटोग्राफी क्षमता देखील मिळण्याची अपेक्षा आहे.
Xiaomi 16 ची स्पेसिफिकेशन्स Tipster Yogesh Brar यांनी दिलेल्या माहितीवरून लीक झाली आहे. त्यांच्या माहितीनुसार, Xiaomi च्या आगामी फ्लॅगशीप मध्ये 6.3-inch LTPO OLED screen आहे. 1.5K resolution आणि 120Hz refresh rate आहे. इंटर्नली त्यामध्ये Snapdragon 8 Elite 2 किंवा Snapdragon 8 Elite Gen 5 chipset असण्याचा अंदाज आहे. यामुळे Xiaomi 16 हा आगामी मोबाइल प्रोसेसर असलेल्या पहिल्या फोनपैकी एक बनणार आहे.
Xiaomi च्या आगामी स्मार्टफोनमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप असणार आहे. 50MP OmniVision sensor चा समावेश असणार आहे. यासोबत 50MP ultra-wide shooter आणि 50MP Samsung ISOCELL JN5 telephoto lens असणार आहे. फोनचा सेल्फी कॅमेरा 32MP selfie camera असणार आहे.
Xiaomi 16 मध्ये 7,000mAh battery असू शकते. त्याला 100W fast wire आणि 50W wireless charging चा सपोर्ट असणार आहे. टीपस्टरच्या माहितीनुसार, फोनमध्ये IP68 किंवा IP69 रेटिंग असणार आहे, त्यामुळे फोन धूळ आणि पाण्यापासून सुरक्षित आहे. यामध्ये HyperOS 3 out of the box चा समावेश असणार आहे.
Xiaomi 16 सीरीज चीनमध्ये 24 ते 26 सप्टेंबर दरम्यान लॉन्च होण्याचा अंदाज आहे. Xiaomi 15 मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात लॉन्च झाला होता. standard Xiaomi 16 आणि Xiaomi 16 Pro या दोन स्मार्टफोन्सचा या सीरीजमध्ये समावेश आहे. परंतू फोन कंपनी कडून यामध्ये Xiaomi 16 Pro Mini हे एक कॉम्पॅक्ट मॉडेल देखील जारी केले जाणार आहे असा अंदाज आहे.
जाहिरात
जाहिरात
Astronomers Observe Star’s Wobbling Orbit, Confirming Einstein’s Frame-Dragging
Chandra’s New X-Ray Mapping Exposes the Invisible Engines Powering Galaxy Clusters