Photo Credit: Redmi
Redmi Note 14 5G मध्ये 6.67-इंचाचा 120Hz डिस्प्ले आहे
Xiaomi कडून होळी सेल साठी अनेक स्मार्टफोन्सवर आकर्षक डिस्काऊंट्स जाहीर करण्यात आली आहेत. ऑफ़र्सचा भाग म्हणून कंपनीकडून Redmi Note 14 5G वर मोठी सवलत जाहीर केली आहे. अन्य डिस्काऊंटेड स्मार्टफोन्स मध्ये Redmi Note 13 series, Redmi 13C 4G चा समावेश आहे. ग्राहकांना discount coupons, bank offers चा फायदा घेत अजून कमी दरामध्ये स्मार्टफोन्सची खरेदी करता येऊ शकते.
Redmi Note 14 5G लॉन्च झाला तेव्हाची किंमत 6GB + 128GB व्हेरिएंट साठी Rs. 18,999 आहे. Xiaomi कडून Rs. 1,000 चं डिस्काऊंट जाहीर करण्यात आले आहे. सध्या हा फोन वेबसाईट वर Rs 17,999 मध्ये उपलब्ध आहे. फोनच्या अन्य व्हेरिएंट्स वर देखील अशाच प्रकारे डिस्काऊंट दाखवण्यात आले आहे.
Redmi Note 13 series ची किंमत देखील कमी करण्यात आली आहे. हा फोन लॉन्च झाला तेव्हा Rs. 31,999 ला उपलब्ध होता.Redmi Note 13 Pro+ 5G हा आता Rs. 28,999 ला मिळेल. Redmi Note 13 5G आणि Redmi Note 13 Pro 5G हा Rs. 17,999 आणि Rs. 25,999 ला लॉन्च झाला होता आता त्याची किंमत Rs. 16,499 आणि Rs. 22,999असणार आहे.
Xiaomi कडून Redmi 13C 4G वर मर्यादित वेळेसाठी होळी ऑफर जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये 4GB + 128GB हा व्हेरिएंट Rs. 7,999 ला उपलब्ध आहे पण आता ऑफर मध्ये 7499 मध्ये विकत घेता येऊ शकतो.
ऑफरचा भाग म्हणून Chinese OEM ने फोन सोबत काही अॅक्सेसरीज देखील दिल्या आहेत. यामध्ये Redmi Note 13 Pro, Redmi Buds 5 हा 26,798 ला मिळेल. Redmi Note 13 5G (12 GB + 256 GB variant) आणि Redmi Buds 5 हे कॉम्बो ऑफर मध्ये Rs. 23,798ला मिळणार आहेत.
फोनच्या किंमती कमी करण्यासोबतच, ग्राहक Xiaomi स्मार्टफोनवर बँक सवलतीचा देखील लाभ घेऊ शकतात. Xiaomi ICICI बँक डेबिट, क्रेडिट आणि EMI व्यवहारांवर 5,000 रुपयांपर्यंत सूट देत आहेत.
जाहिरात
जाहिरात