Photo Credit: Xiaomi
Xiaomi कडून HyperOS 2 अद्यावत ऑपरेटिंग सिस्टिमची घोषणा करण्यात आली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम स्मार्टफोन्स, स्मार्टवॉचेस, स्मार्ट टीव्ही मध्ये वापरली जाणार आहे. या नव्या ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये HyperCore technology आहे. ज्यामुळे कार्यक्षमता, ग्राफिक्स, नेटवर्क आणि सेफ्टी सुधारणार आहे. यामध्ये आर्टिफिशिअल इंटेलिजंस देखील समाविष्ट आहे. ज्यामुळे वॉलपेपर बनवले जाऊ शकतात. रफ स्केचेस ही फोटो मध्ये रूपांतरित केली जाऊ शकतात. रिअल टाईम मध्ये भाषांतर केले जाऊ शकते.
Xiaomi च्या माहिती नुसार, HyperOS 2 हे त्यांच्या नव्या फोनमध्ये,डिव्हाईज मध्ये म्हणजे Xiaomi 15 series,Pad 7 series, Watch S4 lineup, Xiaomi TV S Pro Mini LED 2025 Series, Redmi Smart TV X 2025 Series, आणि Mi Band 9 Pro मध्ये वापरली जाणार आहे. ही ऑपरेटिंग सिस्टीम Xiaomi 14 series आणि जुन्या स्मार्टफोन्स मध्ये, स्मार्ट टीव्ही मध्ये आणि वेअरेबल्स डिव्हाईज मध्ये येत्या आठवड्यात दिसू शकते.
नोव्हेंबर मध्ये अपडेट्स हे Xiaomi 14 series, Xiaomi Mix Fold 4, Xiaomi Mix Flip, Redmi K70 lineup, आणि Xiaomi Pad 6S Pro 12.4 मध्ये दिसेल. तर डिसेंबर मध्ये Xiaomi 13 series, Xiaomi Mix Fold 3, Xiaomi Civi 4 Pro, Redmi K60 series, Redmi Turbo 3, Redmi Note 14 series, Xiaomi Pad 6 Max 14, Pad 6 Pro, आणि the Redmi Pad Pro मध्ये दिसणार आहे.
नव्या वर्षामध्ये अपडेट्स हे Xiaomi 12S and Xiaomi 12 series, Xiaomi Mix Fold 2, Xiaomi Civi 3, Civi 2, Redmi K50 lineup, Redmi Note 13 series, Redmi Note 12 series, Redmi 14R 5G, 14C, Redmi 13R 5G, 13C 5G, Redmi 12 5G, 12R, Xiaomi Pad 6, आणि Xiaomi Pad 5 Pro 12.4.मध्ये दिसणार आहे.
Xiaomi च्या माहितीनुसार, HyperOS 2 मध्ये HyperCore, HyperConnect,आणि HyperAI चा समावेश आहे. यामध्ये नवीन डायनॅमिक मेमरी आणि स्टोरेज 2.0 आहे. कंपनी म्हणते की त्यात एक प्रोप्रायटरी मायक्रोआर्किटेक्चर शेड्यूलर आहे जे CPU चा idle time 19 टक्क्यांनी कमी करू शकते. स्मार्टफोन्सवर, कंपनीच्या म्हणण्यानुसार, याचा परिणाम 54.9 टक्के जलद ॲप लॉन्च स्पीडमध्ये होतो.
नव्या ओएस मुळे व्हिज्युअल चेंज दिसणार आहे. डेस्कटॉप लेआऊट मध्येही ते जाणवेल. यात कस्टमायझेशन चा पर्याय असेल. ट्रान्झिशन अधिक सुरळीत होतील आणि डायनॅमिक इफेक्ट असेल. याव्यतिरिक्त, अपडेटमध्ये Xiaomi इंटरकनेक्टिव्हिटी सर्व्हिसेस सादर केल्या आहेत ज्याचा Apple युजर्स Xiaomi डिव्हाइसेसवरील फाइल्स, फोटो आणि इतर कंटेट चा अॅक्सेस मिळवण्यासाठी फायदा घेऊ शकतात.
जाहिरात
जाहिरात