भारतात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.
भारतात दररोज लाखो प्रवासी ट्रेनने प्रवास करतात आणि हे प्रवासाचे सर्वात किफायतशीर साधन मानले जाते. आपण स्टेशनवर पोहोचतो पण काही वेळेस ट्रेनचा प्लॅटफॉर्म बदलले जाण्याची सूचना दिली जाते अशावेळी गोंधळ निर्माण होतो आणि या परिस्थितीत प्रवाशांना एका प्लॅटफॉर्मवरून दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर तातडीने धावावे लागते. यासाठी स्टेशनवर अनाउन्समेंट केली जाते, मात्र गोंगाटामुळे ती ऐकणेही कठीण होते. अशा परिस्थितीत तुम्ही टेक्नोलॉजीच्या मदतीने आधीच तपासू शकता की ट्रेन कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे आणि प्लॅटफॉर्म बदलला तरी त्याचे अपडेटही मिळवू शकता. यासोबतच ट्रेन कोणत्या स्टेशनवरून किती वाजता निघाली आहे आणि ती कधी पोहोचणार आहे, याची माहितीही मिळवता येते. चला तर मग, ट्रेनचे अपडेट मिळवण्यासाठी या ॲप्सचा वापर कसा करता येतो, हे सविस्तर जाणून घेऊया.
रेल्वेने तयार केलेली नॅशनल रेल इन्क्वायरी सिस्टीम (NTES) ट्रेनची संपूर्ण लाइव्ह माहिती उपलब्ध करून देते. यामध्ये ट्रेनचे रनिंग स्टेटस, कोणत्या स्टेशनवर किती वाजता पोहोचणार आहे आणि कोणत्या प्लॅटफॉर्मवर येणार आहे, यासारख्या माहितीचा समावेश आहे. यूजर्स Android आणि iOS दोन्ही डिव्हाइससाठी अधिकृत NTES ॲप डाउनलोड करू शकतात, ज्याच्या मदतीने ट्रेनचा लाइव्ह स्टेटस तपासता येतो. याशिवाय ही सुविधा वेबसाइटच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे.
सर्वप्रथम, तुमच्या फोनमध्ये NTES ॲप नसेल तर तुम्ही तुमच्या डिव्हाइसच्या आधारावर Google Play Store किंवा Apple App Store वरून NTES ॲप इन्स्टॉल करू शकता.
त्यानंतर तुमच्या फोनमध्ये NTES ॲप ओपन करून Spot Your Train वर क्लिक करावे लागेल.
त्यानंतर तुम्हाला तुमच्या ट्रेनचा नंबर किंवा नाव टाकून Show Instance वर टॅप करावे लागेल.
त्यानंतर तुमच्या ट्रेनची माहिती स्क्रीनवर दिसेल. आता तुम्हाला रूट मॅपची माहिती मिळवण्यासाठी त्यावर टॅप करावे लागेल.
नॅशनल रेल इन्क्वायरी सिस्टीम (NTES) पोर्टलच्या माध्यमातून ट्रेनचा लाइव्ह स्टेटस मिळवता येतो आणि प्रवासी रेल्वेशी संबंधित प्रश्नही विचारू शकतात.
तुम्हाला NTES च्या अधिकृत पोर्टल वेबसाइटवर जावे लागेल.
त्यानंतर डाव्या बाजूला दिसणाऱ्या पॅनेलमधील ऑप्शनच्या यादीतून Spot Your Train निवडावे लागेल.
त्यानंतर दिलेल्या स्पेसमध्ये ट्रेनचे नाव किंवा नंबर टाकावा लागेल आणि ड्रॉपडाउन लिस्टमधून संबंधित ऑप्शन निवडावा लागेल.
आता तुमच्या प्रवासाची सुरुवातीची तारीख निवडावी लागेल.
त्यानंतर ट्रेनचा लाइव्ह स्टेटस खाली दिसेल आणि त्यासोबत एक रूट मॅपही दिसेल.
जाहिरात
जाहिरात