झाकीर खानने गोपाल दत्त यांच्या ‘पहला पहला’ या नव्या पॉडकास्टमध्ये आयुष्यातील अनेक खास ‘पहिल्या’ अनुभवांचा उलगडा केला.
Zakir Khan Opens Up About the ‘Firsts’ That Shaped His Life on Gopal Datt’s New Podcast ‘Pehla Pehla’
भारतातील आघाडीच्या पॉडकास्ट नेटवर्कपैकी एक असलेल्या IVM Podcastsने ‘पहला पहला' या नव्या साप्ताहिक व्हिडिओ आणि ऑडिओ पॉडकास्टची सुरुवात केली आहे. अभिनेता, लेखक आणि कॉमेडियन गोपाल दत्त या पॉडकास्टचे सूत्रसंचालन करत आहेत. ‘Delhi Crime', ‘TVF Pitchers', ‘The Office (India)', ‘Filmistaan' आणि ‘Mujhse Fraaandship Karoge' यांसारख्या प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या लक्षात राहिलेल्या गोपाल दत्त यांनी या पॉडकास्टच्या माध्यमातून सेलिब्रिटींच्या आयुष्यातील यशापेक्षा त्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या आठवणी आणि अनुभव जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. या पॉडकास्टच्या पहिल्याच भागासाठी भारतातील लोकप्रिय स्टोरीटेलर आणि कॉमेडियन झाकीर खान सहभागी झाला आहे. गोपाल दत्त आणि झाकीर खान यांच्यातील हा संवाद केवळ विनोदी नाही, तर भावनिक आणि अत्यंत वैयक्तिकही आहे. आयुष्यातील पहिली नोकरी, पहिलं अपयश, पहिलं प्रेम, पहिला मोठा ब्रेक आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या व्यक्ती अशा अनेक ‘पहिल्या' अनुभवांमधून झाकीरच्या प्रवासाचा वेगळाच पैलू या संवादातून समोर येतो.
‘पहला पहला' या पॉडकास्टची संकल्पना याच विचारावर आधारित आहे की, प्रत्येक मोठ्या प्रवासामागे काही अविस्मरणीय ‘पहिले' क्षण असतात. यश मिळाल्यानंतरची कहाणी आपण अनेकदा ऐकतो; मात्र त्या यशाच्या आधी आलेले संघर्ष, चुका, अपयश आणि छोट्या-छोट्या आठवणी व्यक्तीला खऱ्या अर्थाने घडवत असतात. याच आठवणींना या पॉडकास्टमध्ये केंद्रस्थानी ठेवण्यात आले आहे. झाकीर खानने आपल्या घराशी संबंधित एक खास आठवण सांगताना म्हटले की, त्याचे घर तयार होत असतानाच तो तिथे राहत होता. हे घर केवळ प्रेमाने नाही, तर त्यांच्या कष्टानेही उभे राहिले. घराच्या कामासाठी चार मजुरांची गरज होती; मात्र तीनच मजूर ठेवण्यात आले आणि उरलेले काम त्याने स्वतः केले. त्यामुळे घर बांधण्यासाठी लागणारे साहित्य कसे मिसळायचे, याचीही आपल्याला माहिती असल्याचे झाकीरने मजेशीरपणे सांगितले.
झाकीरच्या आयुष्यात संगीताचे स्थान किती खोलवर आहे, याची झलकही या पॉडकास्टमध्ये पाहायला मिळते. मुंबईतील बॉम्बे बाजार परिसरातील आपल्या घरातील संगीताच्या आठवणी सांगताना झाकीरने सांगितले की, त्याचे बालपणच संगीताने वेढलेले होते. पहाटे पाच-सहा वाजल्यापासून त्यांच्या घरात संगीताचे सूर ऐकू येत. एका ज्येष्ठ सारंगीवादकाकडून अनेक तरुण मुलांना संगीताचे प्रशिक्षण दिले जात असे. कधी तबला, कधी सितार तर कधी सारंगीचे तासन्तास सूर त्यांच्या घरात घुमत असत. आकाशवाणीच्या रेकॉर्डिंगसाठीही आठवड्यातून एक-दोनदा जाण्याची संधी मिळत असे. त्या काळात अनेक दिग्गज कलाकार आणि गझल गायक त्यांच्या संपर्कात येत असत. उस्ताद मोईनुद्दीन खान यांचा संगीतविश्वात मोठा आदर असल्याने अनेक कलाकार त्यांच्या घरीही येत असत. त्यामुळे घरात पाहुण्यांची वर्दळ आणि संगीताचे वातावरण हे झाकीरच्या बालपणाचा अविभाज्य भाग होते. या वातावरणानेच त्याच्या व्यक्तिमत्त्वावर आणि कलाकार म्हणूनच्या प्रवासावर मोठा प्रभाव टाकला.
या नव्या पॉडकास्टबद्दल बोलताना गोपाल दत्त यांनी सांगितले की, प्रत्येक व्यक्तीची स्वतःची एक कथा असते; मात्र आयुष्यातील पहिले अनुभव कायमस्वरूपी मनात राहतात. ‘पहला पहला'च्या माध्यमातून याच क्षणांकडे पुन्हा एकदा पाहण्याचा प्रयत्न केला जात आहे. झाकीर खान हा या प्रवासाची सुरुवात करण्यासाठी योग्य पाहुणा असल्याचेही त्यांनी सांगितले. झाकीरसोबतचा संवाद मजेशीर, प्रामाणिक आणि मानवी भावनांनी भरलेला असल्याचे गोपाल दत्त यांनी नमूद केले. IVM Podcastsचे प्रमुख अमित दोशी यांनी सांगितले की, प्रेक्षकांच्या मनात दीर्घकाळ राहतील असे संवाद निर्माण करण्यावर त्यांचा भर आहे. ‘पहला पहला'च्या माध्यमातून वैयक्तिक अनुभव, दीर्घ संवाद आणि प्रेक्षकांना स्वतःच्या आयुष्याशी जोडून घेता येतील अशा कथा सादर करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
IVM Podcastsच्या सहसंस्थापक कविता राजवाडे यांनीही ‘पहला पहला'ची संकल्पना प्रत्येकाच्या आयुष्यातील पहिल्या अनुभवांभोवती असल्याचे सांगितले. यश आणि उपलब्धींपलीकडे जाऊन त्या व्यक्तीमागची खरी कहाणी प्रेक्षकांसमोर आणणे हा या पॉडकास्टचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ‘पहला पहला'मध्ये मनोरंजन क्षेत्रासोबतच क्रीडा, उद्योजकता, साहित्य आणि लोकप्रिय संस्कृतीतील विविध क्षेत्रांतील मान्यवर सहभागी होणार आहेत. प्रत्येक पाहुणा आपल्या आयुष्यातील खास आठवणी, संघर्ष आणि यापूर्वी फारशा न सांगितलेल्या गोष्टी प्रेक्षकांसमोर मांडणार आहे.
जाहिरात
जाहिरात
Apple Watch Series 12
Starts from ₹56,900
Samsung Galaxy Watch Ultra 2
Starts from ₹59,909
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹41,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹38,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (44mm)
Starts from ₹40,999