गायक सोनू निगमने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथे २५८.३३ चौरस फुटांचे कमर्शियल ऑफिस तब्बल १ कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
सोनू निगमची कोट्यवधींची रिअल इस्टेट गुंतवणूक; अंधेरीत १ कोटींचे ऑफिस, भाड्यातून कोट्यवधींची कमाई
प्रसिद्ध गायक Sonu Nigam पुन्हा एकदा आपल्या रिअल इस्टेट गुंतवणुकीमुळे चर्चेत आला आहे. सोनू निगमने मुंबईतील अंधेरी पश्चिम येथील पॉश भागात तब्बल १ कोटी रुपयांना २५८.३३ चौरस फुटांचे कमर्शियल ऑफिस खरेदी केले आहे. ‘सीआरई मॅट्रिक्स'ने मिळवलेल्या मालमत्ता नोंदणीच्या कागदपत्रांनुसार, या व्यवहाराची नोंदणी ६ ऑगस्ट २०२६ रोजी झाली. या खरेदीसाठी सोनू निगमने ६ लाख रुपये मुद्रांक शुल्क आणि ३० हजार रुपये नोंदणी शुल्क भरले आहे. त्यामुळे या व्यवहाराची एकूण घोषित किंमत सुमारे १.०६ कोटी रुपये होते. अंधेरी पश्चिमेतील सुंदरवन कॉम्प्लेक्समधील या ऑफिससाठी सोनू निगमने प्रति चौरस फुट सुमारे ३८,७१० रुपये मोजले आहेत.
विशेष म्हणजे, सोनू निगमची रिअल इस्टेटमधील ही गुंतवणूक केवळ मुंबईपुरती मर्यादित नाही. कर्जत येथे त्याने मोठ्या प्रमाणावर जमीन व्यवहार केले आहेत. एप्रिल २०२६मध्ये १.९ हेक्टरपेक्षा अधिक जमीन १.९५ कोटी रुपयांना, तर त्यानंतर सुमारे १.०६७ हेक्टर जमीन ९५ लाख रुपयांना विकल्याची नोंद आहे. म्हणजेच कर्जतमधील या व्यवहारांतून त्याने जवळपास २.९ कोटी रुपयांची मालमत्ता विक्री केली आहे.
दरम्यान, मुंबईतील सांताक्रूझ पूर्व भागातील सोनू निगमच्या कमर्शियल प्रॉपर्टीतून होणारे उत्पन्नही विशेष लक्षवेधी आहे. सुमारे ४,२५७ चौरस फुटांची ही जागा पाच वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आली असून, पहिल्या वर्षी त्याला दरमहा १९ लाख रुपये भाडे मिळणार आहे. दुसऱ्या वर्षी हे भाडे २० लाख रुपये, त्यानंतर दरवर्षी सुमारे ५ टक्के वाढीसह चौथ्या वर्षी २२.०५ लाख आणि पाचव्या वर्षी २३.१५ लाख रुपयांपर्यंत पोहोचणार आहे. या पाच वर्षांच्या करारातून सोनू निगमला एकूण १२.६२ कोटी रुपयांचे भाडे उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे.
सोनू निगमच्या या व्यवहारांमधून मुंबईच्या कमर्शियल रिअल इस्टेटचे वाढते आकर्षणही अधोरेखित होते. अंधेरी, वांद्रे, सांताक्रूझ आणि बीकेसीसारख्या भागांमध्ये मजबूत कनेक्टिव्हिटी, व्यावसायिक केंद्रांची जवळीक आणि मर्यादित जागेमुळे कमर्शियल प्रॉपर्टीला मोठी मागणी आहे. त्यामुळे सोनू निगमने केवळ सेलिब्रिटी म्हणून नव्हे, तर भाडे उत्पन्न आणि मालमत्तेच्या मूल्यवाढीवर लक्ष केंद्रित करणारा गुंतवणूकदार म्हणूनही आपली रणनीती स्पष्ट केली आहे.
जाहिरात
जाहिरात
Samsung Galaxy Watch 9 (44mm, LTE)
Starts from ₹44,652
Samsung Galaxy Watch 9 (40mm, LTE)
Starts from ₹37,999
Samsung Galaxy Watch 9 (40mm)
Starts from ₹37,999
Haier M70 Mini LED 65-inch
Starts from ₹74,990
CMF Buds Neo True Wireless Stereo (TWS) Earphones
Starts from ₹2,199
Xiaomi TV FX Mini LED 65
Starts from ₹64,999