Photo Credit: Qualcomm
Maruti Suzuki या भारतामधील मोठ्या ऑटोमेटिव्ह मॅन्युफ्रॅक्चर कंपनीने आपल्या भविष्यातील वाहनांच्या ताफ्यात नवीन Snapdragon Elite automotive chips वापरण्यासाठी Qualcomm सोबत भागीदारी करत आहे, असे एका अहवालात म्हटले आहे. दरम्यान या पार्टनरशीप मागील कारण समोर आलेले नाही. असा अंदाज आहे की Snapdragon च्या नव्या automotive chips भविष्यातील मारुती सुझुकीच्या स्मार्ट कार्समध्ये प्रगत safety systems, connected car technologies आणि इतर फीचर्स देऊ शकतात.
विशेष म्हणजे, ही अपडेट टाटा मोटर्स आणि महिंद्रा अँड महिंद्रासह इतर भारतीय वाहन निर्मात्यांसोबत आधीच पार्टनरशीप झाल्यानंतर समोर आली आहे.
Hawaii मध्ये मागील महिन्यात झालेल्या Snapdragon Summit मध्ये Qualcomm कडून 2 नव्या चिपसेट्स ची घोषणा केली होती. ते automotive industry साठी असतील. Snapdragon Cockpit Elite आणि Snapdragon Ride Elite या चीपसेट आहेत. हे Snapdragon Digital Chassis Solution portfolio चा पार्ट आहे. SmartPrix च्या रिपोर्ट अनुसार, मारुती सुझुकीच्या कारमध्ये यापैकी एक स्नॅपड्रॅगन चिप वापरली जाऊ शकते.
Snapdragon Cockpit Elite chip प्रगत डिजिटल अनुभव देऊ शकते तर Ride Elite chip हे automated driving capabilities ला समर्थन देते. Qualcomm च्या माहितीनुसार, ऑटोमेकर्स एका flexible architecture च्या मदतीने या दोन्ही कार्यशीलता एकाच SoC वर एकत्र करू शकतात. चिप्स infotainment systems, advanced driver assistance systems (ADAS), रिअल-टाइम ड्रायव्हर मॉनिटरिंग आणि लेन आणि वाहनांमध्ये पार्किंग सहाय्य यांसारख्या फीचर्सना मदत देऊ शकते.
दोन्ही चिप्स मध्ये Oryon CPU,Adreno GPU आणि Hexagon NPU आहे. या प्रोसेसरचा वापर करून प्लॅटफॉर्म तीनपट वेगवान CPU आणि 12 पट जलद आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) in-vehicle experiences तील अनुभवांसाठी मागील फ्लॅगशिप जनरेशनच्या तुलनेत लक्ष्य करू शकतात. चिप्स 360-degree coverage साठी 20 high-resolution कॅमेऱ्यांसह 40 मल्टीमोडल सेन्सर्सना सपोर्ट करतील. ते ऑप्टिमाइझ केलेल्या प्रतिमा डिलिव्हर करण्यासाठी AI-enhanced imaging tools वापरतात आणि नव्या येणार्या ऑटोमोटिव्ह सेन्सर आणि स्वरूपांशी compatible आहेत.
जाहिरात
जाहिरात