Oppo K13 Turbo Pro 5G प्रो ५जी फोनवर मोठी डिस्काउंट मिळत आहे.
Oppo K13 Turbo Pro 5G Sale बँक ऑफर
Oppo K13 Turbo Pro 5G वर बँक ऑफरही उपलब्ध आहे. निवडक बँकांच्या क्रेडिट कार्डद्वारे फोन खरेदी केल्यास 1,500 पर्यंत अतिरिक्त बचत करता येते. त्यामुळे फोनची किंमत 29,499 इतकी होते. म्हणजेच हा स्मार्टफोन एकूण MRP पेक्षा 12,000 पेक्षा जास्त सवलतीत खरेदी करता येतो. अधिक माहितीसाठी ऑफर पेजला भेट देऊ शकता.
Oppo K13 Turbo Pro फीचर, स्पेसीफिकेशन
Oppo K13 Turbo Pro मध्ये 6.80 इंचाचा LTPS AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1,600 निट्सपर्यंत ग्लोबल पीक ब्राइटनेस मिळतो. K13 Turbo Pro मध्ये Qualcomm Snapdragon 8s Gen 4 प्रोसेसर आहे. हा स्मार्टफोन Android 15 आधारित ColorOS 15 वर चालतो. धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी फोनला वॉटर आणि डस्ट रेझिस्टन्स फीचर देण्यात आले आहे.
Oppo K13 Turbo Pro च्या मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा सेकंडरी कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh क्षमतेची बॅटरी असून ती 80W वायर्ड फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिव्हिटीसाठी 5G, 4G, Wi-Fi 7, Bluetooth 5.4, GPS, NFC आणि USB Type-C पोर्टचा समावेश करण्यात आला आहे.
जाहिरात
जाहिरात