पॅनासोनिकच्या ShinobiPro MiniLED व P-Series Smart TVs ने घरबसल्या मिळणार थिएटरचा अनुभव; पहा काय खास?

Panasonic ShinobiPro MiniLED TVs मध्ये डॉल्बी अ‍ॅटमॉससह 66 वॅटचे स्पीकर्स, वूफर्स देखील आहेत.

पॅनासोनिकच्या ShinobiPro MiniLED व P-Series Smart TVs ने घरबसल्या मिळणार थिएटरचा अनुभव; पहा काय खास?

Photo Credit: Panasonic

पॅनासोनिक शिनोबीप्रो मिनीएलईडी टीव्ही बेझल-लेस डिझाइन देतात

महत्वाचे मुद्दे
  • नासोनिक P-Series, ShinobiPro MiniLED TVs किंमत ₹17,990 ते ₹3,99,990
  • Panasonic ShinobiPro MiniLED TVs हे Google TV वर चालणार आहेत
  • पॅनासोनिकने P-Series टीव्हीसोबत साउंडबार लाइनअप देखील बाजारात आणले आहेत
जाहिरात

Panasonic Life Solutions India कडून देशात टेलिव्हिजन च्या पोर्टफोलिओ मध्ये वाढ करण्यात आली आहे. यामध्ये कंपनीने आता P-Series ची घोषणा केली आहे. यामध्ये 21 नवे एलईडी टीव्ही मॉडेल्स आहेत. यामध्ये ShinobiPro MiniLED range पुन्हा आणला आहे. 7 ऑगस्ट 2025 दिवशी या नव्या लाईनअपची घोषणा झाली आहे. यामध्ये विविध प्रकारांचा समावेश आहे. टेलिव्हिजन स्क्रीन 32 ते 75 इंचांचा त्यामध्ये समावेश असून किंमती 17,990 पासून पुढे आहेत.नवीन टीव्हीमध्ये ShinobiPro MiniLEDs, premium 4K Google TVs, तसेच Full HD आणि HD-ready चा समावेश आहे. या श्रेणीत 75 इंचाचा ShinobiPro MiniLEDs टीव्ही आहे, ज्याची किंमत 3,99,990 रूपयांपर्यंत आहे, ज्यामध्ये quantum dot technology, Pixel dimming, a 4K Studio Colour Engine, Hexa Chroma Drive, Dolby Vision, HDR10+, आणि Accuview Display यांचा समावेश आहे. टेलिव्हिजनच्या सीरीज मध्ये सर्वात लहान डिझाईन (8.13 cm Flat Fit) आहे. Dolby Atmos support via 66W speakers आणि woofers, तसेच built-in home theatre with tweeters यांचा देखील समावेश आहे.

गेमर्सना ऑटो लो लेटन्सी मोड (ALLM) आणि स्मूथ मोशन हँडलिंगसाठी MEMC सह 120Hz रिफ्रेश रेट सारख्या फीचर्सचा फायदा होणार आहे. स्मार्ट फीचर्स Google TV आणि Chromecast इंटिग्रेशनद्वारे सपोर्ट असणारे आहे.

टेलिव्हिजन च्या या लाँचबद्दल बोलताना, पॅनासोनिक मार्केटिंग इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक Fumiyasu Fujimori म्हणाले, “नवीन पी सिरीजसह, आम्ही प्रत्येक कुटुंबासाठी personalised entertainment म्हणून आणत आहोत, ज्यामध्ये मोठ्या स्क्रीनच्या चमकदारपणापासून ते स्मार्ट टीव्हीच्या sleek versatilityचा समावेश आहे.”

पॅनासोनिकचे P-Series टेलिव्हिजन सेट्स कुठे कराल खरेदी?

नव्याने लॉन्च झालेली ही संपूर्ण P-Series पॅनासोनिक ब्रँड स्टोअर्स, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म्स आणि पॅनासोनिकच्या D2C साइटवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. पॅनासोनिकने सिनेमॅटिक अनुभवाला पूरक म्हणून 12,990 रूपयां पासून सुरू होणारे 160W ते 600W पर्यंतचे नवीन साउंडबार देखील बाजारात स्मार्ट टीव्हींच्या रेंज सोबत लॉन्च केले आहेत.

पॅनासोनिकचे P-Series टेलिव्हिजनच्या किंमती काय?

पॅनासोनिकची P-Series स्मार्ट टीव्हींची किंमत 17990 रूपयां पासून सुरू होते आणि 3, 99,990 पर्यंत जाते. तर साऊंडबार 12,990 रूपयांचे आहेत.

ShinobiPro series ही मुख्यतः visual clarity, motion handling, आणि integrated audio features असलेल्या संकल्पनेवर आधारित आहे. व्हिडिओ प्रोसेसिंगसाठी 4K स्टुडिओ कलर इंजिन आणि हेक्सा क्रोमा ड्राइव्ह, मोशन कंट्रोलसाठी MEMC सपोर्टसह 120Hz रिफ्रेश रेट आणि साऊंड आउटपुटसाठी डॉल्बी अ‍ॅटमॉस वापरते. टीव्हीमध्ये किमान बेझल डिझाइन आहे.

Gadgets 360 Staff रेसिडेंट बॉट. जर तुम्ही मला ईमेल केलात तर एक माणूस प्रतिसाद देईल. अधिक

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. ग्राहकांना दिलासा; Sanchar Saathi अॅप प्री-इन्स्टॉल सक्ती हटवली
  2. Poco C85 5G भारतात येणार; महत्वाच्या वैशिष्ट्यांसह फीचर्सही ठरले
  3. Redmi 15C 5G भारतात लॉन्च; 5G सपोर्ट, Dimensity 6300 आणि 50MP कॅमेरा हायलाइट
  4. Apple iPhone 17e ला अल्ट्रा-स्लिम बेझल्स आणि डायनॅमिक आयलंड मिळणार?
  5. डेटा प्रायव्हसीचा मुद्दा? Sanchar Saathi अ‍ॅप प्री-इन्स्टॉल आदेशाला Apple चा विरोध
  6. Samsung Galaxy Z TriFold ची किंमत लीक; भारतातील संभाव्य किंमत समोर
  7. Croma वर iPhone 16 ची किंमत Rs. 63,000 च्या खाली; बँक डिस्काउंटसह मोठी सूट
  8. GSMA लिस्टिंगनुसार Samsung Galaxy Z Fold 8 बरोबरच Wider मॉडेलचीही एन्ट्री
  9. Vivo X300 Pro भारतात लॉन्च झाला! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
  10. Vivo X300 Pro भारतात लॉन्च झाला! जाणून घ्या किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »