Vu Glo QLED TV 2025 Dolby Edition मधील टीव्ही 12 ऑगस्ट 2025 पासून Amazon, Flipkart आणि भारतातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध झाले आहेत.
Photo Credit: Vu
कनेक्टिव्हिटी समस्या सोडवण्यासाठी टीव्हीमध्ये इन्स्टंट नेटवर्क रिमोट आहे असे वू म्हणतात
भारतात आता सणासुदीचा काळ सुरू झाला आहे यामध्ये Vu Televisions कडून Vu Glo QLED TV 2025 (Dolby Edition) हा प्रिमियम टेलिव्हिजन्सचा नवा लाईन अप बाजारात आणला आहे. या सीरीज मध्ये स्पर्धात्मक किंमतीसह उच्च-स्तरीय फीचर्ससह, जे त्यांच्या घरातील मनोरंजन सेटअप अपग्रेड करू इच्छिणाऱ्यांसाठी एक आकर्षक पर्याय बनवते. 43 -इंच मॉडेलसाठी किंमत 24,990 रुपयांपासून टीव्ही सेट्सची रेंज सुरू होते आणि टॉप-एंड 75-इंच व्हेरिएंटसाठी 64,990 रुपयांपर्यंत जाते, Vu Glo QLED टीव्हीची किंमत, उपलब्धता आणि फीचर्सबद्दल इथे जाणून घ्या सारे महत्त्वाचे अपडेट्स .
Vu Glo QLED TV 2025 Dolby Edition चे टीव्ही A+ grade Glo QLED panel सह आहेत. हे 400 nits brightness, 92% NTSC colour coverage देतात आणि Dolby Vision, HDR10,तसेच HLG ला सपोर्ट करतात. त्यामुळे टीव्ही वर व्हायब्रंट कलर्स आणि उत्तम कॉन्ट्रास्ट तुम्हांला सिनेमे आणि स्पोर्ट्स मध्ये पाहता येणार आहेत. या टीव्ही मध्ये साऊंड built-in 24W Dolby Atmos system वर आहे तर या टीव्ही च्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या थिएटर सारखा अनुभव मिळणार आहे. या टीव्हीमध्ये 1.5 GHz VuOn AI प्रोसेसर, 2GB रॅम आणि 16 GB स्टोरेज आहे. हे टीव्ही गुगल टीव्ही ऑपरेटिंग सिस्टमवर चालतात, ज्यामुळे नेटफ्लिक्स, प्राइम व्हिडिओ, यूट्यूब आणि इतर गोष्टींवर सहज प्रवेश मिळतो, तसेच पर्सनलाईज्ड कंटेंट सूचना देखील मिळतात. कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये Apple AirPlay, HomeKit, Google Chromecast, Bluetooth 5.3 आणि ड्युअल-बँड वाय-फाय यांचा समावेश आहे.
गेमर्सना VRR, ALLM आणि लॅग कमी करण्यासाठी क्रॉसहेअर फंक्शनसह विशेष ट्रीटमेंट देखील मिळते. शिवाय, Vu ने कनेक्टिव्हिटीतील अडचणी त्वरित दूर करण्यासाठी वाय-फाय हॉटकीसह इन्स्टंट नेटवर्क रिमोट जोडला आहे.
43-inch – Rs 24,990
50-inch – Rs 30,990
55-inch – Rs 35,990
65-inch – Rs 50,990
75-inch – Rs 64,990
Vu Glo QLED TV 2025 Dolby Edition मधील टीव्ही 12 ऑगस्ट 2025 पासून Amazon, Flipkart आणि भारतातील प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध झाले आहेत. सर्व मॉडेल्स एक वर्षाची वॉरंटीसह येतात.
जाहिरात
जाहिरात