Honor चा नवा टॅबलेट Pad X9a आला बाजारात; पहा फीचर्स काय?

Honor Pad X9 हा टॅबलेट Honor Malaysia website वर लिस्टेट आहे.

Honor चा नवा टॅबलेट  Pad X9a आला बाजारात; पहा फीचर्स काय?

Photo Credit: Honor

ऑनर पॅड X9a (चित्रात) एकाच राखाडी रंगात उपलब्ध आहे.

महत्वाचे मुद्दे
  • Honor Pad X9a मध्ये फोटोसाठी 8-megapixel rear camera
  • Pad X9a मध्ये quad speaker सेटअप
  • हा टॅबलेट केवळ Gray रंगामध्ये उपलब्ध होणार
जाहिरात

Honor Pad X9a आणि कंपनीचा 11.5-inch LCD screen, सोबत 120Hz refresh rate असलेला नवा टॅबलेट मलेशिया मध्ये लॉन्च झाला आहे. यामध्ये वायफाय आणि ब्लूटुथ कनेक्टिव्हिटी आहे. हा टॅब Snapdragon 685 chip वर चालतो. तर टॅबमध्ये 8,300mAh बॅटरी आहे. Honor Pad X9a हा Android 15 वर चालतो. यामध्ये 5-megapixel selfie camera आणि 8-megapixel rear camera आहे.

Honor Pad X9 च्या किंमतीबद्दल अद्याप कंपनीने माहिती दिलेली नाही. मात्र सध्या हा टॅबलेट Honor Malaysia website वर लिस्टेट आहे. हा टॅबलेट केवळ Gray रंगामध्ये उपलब्ध होणार आहे. Honor ने दिलेल्या माहितीनुसार, Pad X9a हा 8GB+128GB RAM या कॉन्फ्युगरेशन मध्ये विकला जाणार आहे.

Honor Pad X9a ची स्पेसिफिकेशन्स काय?

नवा Honor Pad X9a हा 11.5-inch 2.5K (1,504x2,508 pixels) LCD screen सह 120Hz refresh rate मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये octa core Snapdragon 685 chipset आहे. तर ती 8GB of RAM सोबत जोडलेली आहे. Honor ने 8GB unused storage हा virtual RAM म्हणून वापरण्यास देणार आहे.

Honor Pad X9a मध्ये फोटोसाठी 8-megapixel rear camera आहे. ज्यात autofocus आणि f/2.0 aperture आहे. सेल्फी आणि video chats साठी टॅबमध्ये पुढच्या बाजूला 5-megapixel front-facing camera आहे. ज्याला f/2.2 aperture आहे.

Honor Pad X9a मध्ये 128GB पर्यंत स्टोरेज आहे. हा टॅबलेट Wi-Fi आणि Bluetooth 5.1 connectivity देतो. यासोबत कंपनीचा wireless keyboard आणि stylus देखील चालतो. हा टॅबलेट Android 15-based MagicOS 9.0 वर चालतो.

Honor च्या Pad X9a मध्ये quad speaker setup आहे. त्यामध्ये 8,300mAh Li-ion battery आहे. जी 35W ने चार्ज होते. कंपनीच्या दाव्यानुसार, टॅबलेट ची 70 दिवसांची standby mode बॅटरी लाईफ आहे. टॅबलेटचा आकार 267.3x167x6.77mm आणि वजन 475 ग्राम आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. TENAA लिस्टिंगमध्ये समोर आले Moto G36 चे डिझाईन व स्पेसिफिकेशन्स
  2. Poco F7 5G ची किंमत फ्लिपकार्ट बिग बिलियन डेजमध्ये घसरली; पहा आता किंमत काय
  3. ॲमेझॉन ग्रेट इंडियन फेस्टिव्हल 2025 मध्ये इको डिव्हाइस वर मिळणार मोठी सूट
  4. Amazon Great Indian Festival Sale 2025 मध्ये सोनी, सॅमसंग, TCL स्मार्ट टीव्हीवर आकर्षक डील्स जाहीर
  5. ॲपलकडून iOS 26 अपडेटसह iPadOS 26 व macOS Tahoe लॉन्च; पहा पात्र डिव्हाईसची यादी
  6. : Oppo F31 Series मध्ये Pro+, Pro आणि F31 5G चा समावेश; पहा काय आहेत फीचर्स
  7. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये Nothing Phone 3 अवघ्या 34,999 रूपयांत विकत घेण्याची संधी
  8. Realme P3 Lite 5G भारतात लॉन्च; पहा किंमत, स्पेसिफिकेशन्स काय
  9. iQOO 15 मध्ये 2K Samsung AMOLED डिस्प्ले; समोर आली माहिती
  10. Realme चा नवा P-Series स्मार्टफोन P3 Lite 5G आला दमदार फीचर्स आणि किफायतशीर किंमतीमध्ये
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »