केव्हा होणार भारतात लॉन्च Infinix चा पहिला टॅबलेट Infinix XPad

Infinix चा पहिला टॅबलेट म्हणजेच Infinix XPad हा लवकरच लॉन्च होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे

केव्हा होणार भारतात लॉन्च Infinix चा पहिला टॅबलेट Infinix XPad
महत्वाचे मुद्दे
  • Infinix XPad मध्ये 11 इंचाची LCD स्क्रीन आणि FHD+ रेजोल्यूशनचा डिस्प्ले
  • Infinix XPad मध्ये 7,000mAh ची बॅटरी 18 वॅटच्या जलद चार्जिंगचे समर्थन
  • Infinix XPad टॅबलेट Helio G99 Ultimate या प्रोसेसरने समर्थित
जाहिरात

Infinix या स्मार्टफोन कंपनीने नुकताच त्यांचा पहिला वहिला टॅबलेट लॉन्च करत असल्याच्या अनेक अफवांना उधाण आले होते. परंतु आता या अफवा खऱ्या ठरत आहेत आणि Infinix चा पहिला टॅबलेट म्हणजेच Infinix XPad हा लवकरच लॉन्च होत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. चला तर मग बघूया केव्हा होणार आहे टॅबलेट लॉन्च आणि काय आहेत त्याची वैशिष्ट्ये.

Infinix XPad लॉन्च तारीख आणि किंमत

Infinix XPad हा टॅबलेट भारतात अधिकृतपणे 13 सप्टेंबर 2024 रोजी लॉन्च करण्यात येणार आहे. परंतु हा टॅबलेट कुठे खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे आणि त्याची किंमत काय असेल हे जाणून घेण्यासाठी आपल्याला 13 सप्टेंबर ची वाट पाहावी लागणार आहे, कारण अजूनही कंपनीने याबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. पण अंदाजे या टॅबलेटची किंमत ही 15,000 रुपयांच्या आसपास असू शकते. तसेच हा टॅबलेट राखाडी, सोनेरी आणि निळा अशा तीन रंगांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे.

Infinix XPad ची वैशिष्ट्ये

Infinix XPad हा Infinix चा पहिलाच टॅबलेट असल्याने फार विशेष आहे. सर्वप्रथम आपण पाहूया, याचा डिस्प्ले जी 11 इंचाची LCD स्क्रीन असून, 1920 × 1200 पिक्सेल च्या FHD+ रेसोल्युषन सोबतच, 90Hz चा रिफ्रेश दर असलेला डिस्प्ले बसविण्यात आला आहे, ज्याचा स्क्रीन तो बॉडी हा रेशो 83% इतका आहे. या टॅबलेटचे आश्चर्य जनक वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तुम्हाला चार स्पीकर्स देखील मिळतात.

गेल्या महिन्याच्या जागतिक सुचीमध्ये Infinix XPad हा टॅबलेट MediaTek Helio G99 SoC Ultimate या चीपद्वारे समर्थित असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या टॅबलेट मध्ये रॅमचे दोन पर्याय उपलब्ध आहेत ते म्हणजे 4 GB आणि 8 GB रॅम क्षमता. त्यासोबतच जर या टॅबलेटच्या अंतर्गत स्टोरेज क्षमतेमध्ये 128 GB आणि 256 GB असे दोन पर्याय उपलब्ध आहेत. या टॅबलेटच्या कॅमेऱ्याबद्दल पाहायचे तर मागील प्राथमिक कॅमेरा आणि सेल्फी कॅमेरा दोन्ही देखील 8 मेगापिक्सलचे देण्यात आले आहेत.

त्यासोबतच Infinix XPad ची बॅटरी ही 7000 mAh ची असून ती 18 वॅटच्या रॅपिड चार्जिंगचे समर्थन करते. यामध्ये ChatGPT ने प्रस्तुत असलेला व्हॉईस असिस्टंट देखील बसविण्यात आला आहे.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. BSNL चा नवा पोर्टल सुरु; सिम कार्ड आता थेट घरपोच मिळणार
  2. Honor X9c भारतात होणार लॉन्च; 108MP कॅमेरा, कर्व्ह डिस्प्ले आणि दमदार फीचर्ससह
  3. दमदार बॅटरी आणि प्रोसेसरसह Poco F7 5G भारतात सादर
  4. फक्त ₹10,000 मध्ये Vivo T4 Lite 5G, 6000mAh बॅटरीची हमी
  5. Samsung चा Galaxy Unpacked 2025 होणार 9 जुलैला; Foldables येणार ग्राहकांसमोर
  6. Vivo Unveils X200 FE मध्ये काय आहेत खास फीचर्स? भारतात लॉन्च कधी? घ्या जाणून अपडेट्स
  7. Nothing Phone 3 मध्ये पहा कॅमेरा बद्दलचे अपडेट्स; 50MP Triple Camera System असणार
  8. Oppo Reno 14 5G स्मार्टफोन लवकरच Amazon, Flipkart द्वारा भारतातही येणार; झलक आली समोर
  9. OnePlus चा नवा नेकबँड भारतात लाँच; एका चार्ज मध्ये तब्बल 36 तास चालणार, विक्री 24 जूनपासून
  10. Samsung Galaxy M36 5G ची भारतातील लॉन्च डेट जाहीर; डिझाइन लीक आधीच समोर
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »