Photo Credit: Poco
Poco या चिनी स्मार्टफोन कंपनीने 23 ऑगस्ट 2024 रोजी आपला पहिला टॅबलेट म्हणजेच Poco Pad 5G भारतात लॉन्च केला आहे. हा टॅबलेट कंपनीकडून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मे महिन्यात लॉन्च करण्यात आला होता परंतु Poco च्या वापरकर्त्यांसाठी तो अजूनही भारतात उपलब्ध करण्यात आला नव्हता. पण अलीकडील शुक्रवारीच त्याचे अनावरण झाले आहे. चला तर मग बघूया Poco Pad 5G या टॅबलेटची वैशिष्ट्ये, किंमत आणि उपलब्धता.
Poco Pad 5G या टॅबलेट मध्ये बसविण्यात आलेला 120Hz च्या Adaptive Sync रिफ्रेश रेटसह 12.1 इंचाचा डिस्प्ले ज्याचे रीसोल्यूशन 2560 x 1600 पिक्सेल इतके आहे. या टॅबलेटच्या डिस्प्लेमध्ये डॉल्बी व्हिजन आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास च्या संरक्षणासोबतच TÜV राइनलँड ट्रिपल प्रमाणपत्र देखील मिळाले आहे. हा टॅबलेट Snapdragon 7s Gen 2 चिपसेटद्वारे समर्थित आहे. या टॅबलेटची रॅम 8GB पासून सुरू होत असून स्टोरेजच्या आधारावर या टॅबलेटचे दोन प्रकार पडतात. यामध्ये 128 GB आणि 256 GB असे दोन प्रकार पडतात.
त्याशिवाय Poco Pad 5G या टॅबलेटची स्टोरेज क्षमता मायक्रोएसडी कार्ड स्लॉटद्वारे 1.5 TB पर्यंत वाढवता येऊ शकते. जर आपण ऑप्टिक्सबद्दल बोलायचे म्हंटले तर, Poco Pad 5G मध्ये LED फ्लॅशसोबत एकच 8 मेगापिक्सलचा प्राथमिक कॅमेरा बसविण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉल करण्यासाठी यात 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. यात क्वाड स्पीकर सिस्टम, दोन मायक्रोफोन आणि 3.5 मिमी हेडफोन जॅक सुध्दा बसविण्यात आले आहेत.
Poco Pad 5G या टॅबलेट मध्ये 10000 mAh ची बॅटरी बसविण्यात आलेली असून ती 33 वॅट च्या चार्जिंगचे समर्थन करते.
Poco Pad 5G या टॅबलेटची किंमत 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या प्रकारासाठी 23,999 रुपये इतकी आहे. तर 8GB रॅम आणि 256GB स्टोरेज या प्रकाराची किंमत 25,999 रुपये इतकी आहे. हा टॅबलेट कोबाल्ट ब्लू आणि पिस्ता ग्रीन कलर या दोन रंगांमध्ये खरेदी करता येऊ शकतो. त्यासोबतच या टॅबलेटची पहिली विक्री 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजता फ्लिपकार्ट या वेबसाईट द्वारे सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे Poco चा हा पहिला टॅबलेट विकत घेण्यासाठी तुम्हाला अजून काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
जर तुमच्याकडे HDFC, SBI आणि ICICI या तीनही बँकांपैकी कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर त्याद्वारे Poco Pad 5G हा टॅबलेट खरेदी करताना तुम्हाला 3000 रुपयांची सूट देण्यात येत आहे. सोबतच जर तुम्ही एक विद्यार्थी असाल तर तुमच्यासाठी या टॅबलेटच्या किंमतीवर हजार रुपयांची सूट देण्यात येणार आहे.
जाहिरात
जाहिरात