चला पाहुयात काय आहेत Samsung Galaxy Tab S10 ची वैशिष्ट्ये

चला पाहुयात काय आहेत Samsung Galaxy Tab S10 ची वैशिष्ट्ये

Photo Credit: Samsung

महत्वाचे मुद्दे
  • Samsung Galaxy Tab S10 चा डिस्प्ले हा 12 आणि 14 इंचाचा असणार आहे.
  • Samsung Galaxy Tab S10 उत्पादन ऑगस्ट महिन्यापासून सुरू होईल.
  • भारतात ऑक्टोबर मध्ये लॉन्च होणार Samsung Galaxy Tab S10 चे दोन टॅब.
जाहिरात
नुकत्याच पार पडलेल्या Samsung Galaxy च्या एका कार्यक्रमात कंपनीने फोल्ड स्मार्टफोन्सच्या लॉन्च नंतर आता सॅमसंगच्या चाहत्यांना उत्सुकता लागली आहे, ती म्हणजे Samsung Galaxy Tab S10 ह्या सिरीज चे पुढचे टॅब केव्हा लॉन्च होणार ह्याची. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नवीन  टॅबचे उत्पादन हे ऑगस्ट 2024 मध्ये सुरू होणार आहे. पण अद्याप ह्याबाबत कंपनीकडून कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नसून फक्त सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पाहुयात, काय असतील Samsung Galaxy Tab S10 ची वैशिष्ट्ये आणि बरेच काही. 

सॅमसंगचे सीईओ रॉस यंग यांनी आपल्या X म्हणजेच आधीच्या ट्विटर अकाऊंट वरून एका पोस्ट द्वारे Samsung Galaxy Tab S10 च्या उत्पादनाची सुरुवात ऑगस्ट महिन्यापासून करण्यात येईल ह्याची पुष्टी केली आहे. ह्या पोस्ट मध्येच यंग असेही लिहतात की, 2024 मध्ये दोन महत्वाचे टॅब लॉन्च होऊ शकतात जे असतील Samsung Galaxy Tab S10 Plus आणि Samsung Galaxy Tab S10 Ultra. ह्या टॅबच्या लॉन्च पासूनच सॅमसंग बेस मॉडेलचा त्याग करणार असून आधुनिक टॅब बनविण्याकडे वळणार आहे.

Samsung Galaxy Tab S10 ची वैशिष्ट्ये आणि लॉन्च.


Samsung Galaxy Tab S10 ह्याचे उत्पादन जरी ऑगस्ट महिन्यात सुरू होणार असेल तरी सुद्धा ते भारतात केव्हा लॉन्च होणार ह्याची तारीख स्पष्ट करण्यात आलेली नाही आहे. पण रॉस यंग ह्यांच्या पोस्टनुसार हे टॅब भारतात ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत लॉन्च करण्यात येतील म्हणजेच दिवाळीच्या आधी किंव्हा दिवाळीच्या सुरुवातीला सुद्धा. 

हे दोन्ही टॅब राखाडी आणि सिल्व्हर अशा दोन रंगांमध्ये उपलब्ध असतील. ह्या पलीकडे कोणत्याही प्रकरची माहिती रॉसने दिलेली नाही आहे पण सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पाहुयात काय असतील Samsung Galaxy Tab S10 ची वैशिष्ट्ये. 

Samsung Galaxy Tab S10 Plus आणि Samsung Galaxy Tab S10 Ultra ह्या दोन्ही टॅबचा AMOLED डिस्प्ले हा किमान 12 इंचाचा असू शकतो. सॅमसंग S10 अल्ट्रा ह्या टॅबचा डिस्प्ले हा 14 इंचाचा ही असू शकतो. Media Tek Dimensity 9300+ ह्या चिपसेट सोबत दोन्ही टॅब अँड्रॉइड 14 वर चालतील अशी अपेक्षा कंपनीकडून करण्यात येत आहे. नवीन टॅब मध्ये S पेन अजूनही चुंबकाच्या मदतीने जोडून राहणार आहे. 

Samsung Galaxy Tab S10 चे दोन्ही टॅब भारतात कंपनीकडून केव्हा लॉन्च होणार आहेत, ह्याबाबत आवश्यक माहिती आम्ही आमच्या ब्लॉगमधून तुम्हाला देत राहणार आहोत.
 
Comments
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »