एअरटेल नेटवर्क पुन्हा ठप्प, देशभरात लाखो ग्राहक हैराण

DownDetector Map नुसार, बेंगळुरू व्यतिरिक्त, दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, सुरत, अहमदाबाद आणि इतर काही शहरांमधील यूजर्सनी एअरटेलची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती दिली.

एअरटेल नेटवर्क पुन्हा ठप्प, देशभरात लाखो ग्राहक हैराण

Photo Credit: Reuters

एअरटेलचा नवीनतम आउटेज काही तासांतच दूर झाला

महत्वाचे मुद्दे
  • कॉल, इंटरनेट सेवा विस्कळीत झाल्याने एअरटेलवर ग्राहकांच्या संतापाचा उद्रेक
  • एअरटेल ची सेवा एकाच आठवडाभरामध्ये दोनदा विस्कळीत झाल्याचं चित्र बघायला मि
  • एअरटेलच्या माहितीनुसार, नेटवर्क खंडित होणे हा तात्पुरता व्यत्यय होता आणि
जाहिरात

एअरटेल ची सुविधा भारतात पुन्हा विस्कळीत झाल्याची बाब समोर आली आहे. यावेळेस बेंगळुरू आणि इतर अनेक प्रमुख शहरांमधील यूजर्सना याचा फटका बसला आहे. DownDetector Map नुसार, बेंगळुरू व्यतिरिक्त, दिल्ली, चेन्नई, मुंबई, हैदराबाद, कोलकाता, सुरत, अहमदाबाद आणि इतर काही शहरांमधील यूजर्सनी एअरटेलची सेवा विस्कळीत झाल्याची माहिती दिली आहे. एअरटेल केअर्सच्या माहितीनुसार, ही समस्या तात्पुरत्या कनेक्टिव्हिटी बिघाडामुळे असल्याचे समोर आले आहे. कंपनीच्या माहितीनुसार, ही समस्या एका तासात सोडवली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.एअरटेल केअर्सच्या मेसेजमध्ये दिल्यानुसार, "गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. तुम्हाला येत असलेली समस्या तात्पुरत्या कनेक्टिव्हिटी व्यत्ययामुळे असल्याचे दिसते आणि ती एका तासाच्या आत सोडवली जाईल अशी अपेक्षा आहे. तो वेळ निघून गेल्यावर, सेवा पुन्हा रिस्टोर करण्यासाठी कृपया तुमचा मोबाइल फोन रीस्टार्ट करा. धन्यवाद,"

दुपारी 1 वाजल्यानंतर DownDetector ने आउटेजच्या अहवालांमध्ये सुधारणा दाखवली होती. पण, दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास यूजर्सकडून आउटेजच्या दीडशे पेक्षा अधिक तक्रारी आल्या. या सेवा खंडित झालेल्या यूजर्सपैकी 51टक्के यूजर्सनी सिग्नल मध्ये बिघाड असल्याच्या समस्या नोंदवल्या, तर 32 टक्के यूजर्सनी मोबाईल इंटरनेटमध्ये समस्या नोंदवल्या. DownDetector च्या मते, 17 टक्के यूजर्सना संपूर्ण ब्लॅकआउटचा सामना करावा लागला.

सोशल मीडियावरही सेवा बंद झाल्यानंतर अनेक यूजर्सनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या, काहींनी म्हटले की कंपनीने किमान त्यांच्या यूजर्सना या व्यत्ययाबद्दल सूचित करावे. प्लॅटफॉर्मवरील डेटावरून असे दिसून आले की प्रभावित यूजर्सपैकी अर्ध्याहून अधिक यूजर्सना कॉलिंग समस्यांचा सामना करावा लागला, जवळजवळ एक तृतीयांश यूजर्सना इंटरनेट वापरण्यात अडचण आली आणि उर्वरित यूजर्सना पूर्णपणे नेटवर्क बिघाड झाला.अनेक यूजर्सनी सोशल मीडियावर तक्रार केली की सेवा व्यत्ययांमुळे त्यांना OTP मिळू शकले नाहीत, आउटेज दरम्यान अ‍ॅप्स आणि इतर वेब सेवांमध्ये लॉग इन करणे कठीण झाले होते.

एअरटेल च्या सेवेमधील यापूर्वी झालेले बिघाड

सोमवार, 18 ऑगस्ट रोजी भारतातील मोबाइल नेटवर्कवरील यूजर्सना बराच वेळ एअरटेल आउटेजचा अनुभव आला, ज्याची सुरुवात प्रामुख्याने एअरटेलने केली आणि नंतर काही प्रमाणात जिओ आणि व्होडाफोन-आयडियाने केली. तंत्रज्ञानातील त्रुटींवर लक्ष ठेवणाऱ्या पोर्टल DownDetector ने सोमवारी संध्याकाळी 4.30 वाजता एअरटेल आउटेजच्या 3600 हून अधिक तक्रारी पाहिल्या, ज्याची बेसलाइन 15% पेक्षा कमी होती. रात्री 10.30 पर्यंत हळूहळू घट होऊन 150 पेक्षा कमी तक्रारी झाल्या. एअरटेलसाठी आठवड्याभरात हा दुसरा मोठा व्यत्यय आहे. 18 ऑगस्ट रोजी, याच समस्येमुळे संपूर्ण भारतातील 3500 हून अधिक यूजर्सवर परिणाम झाला होता.

Comments
Gadgets 360 Staff
 ...अधिक
        
    
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Oppo F31, F31 Pro, F31 Pro+ च्या डिझाईनची चर्चा; 7,000mAh बॅटरी च्या समावेशाचा अंदाज
  2. एअरटेल नेटवर्क पुन्हा ठप्प, देशभरात लाखो ग्राहक हैराण
  3. Honor Magic V Flip 2 मध्ये 200MP कॅमेरा आणि 5500mAh बॅटरी, पहा अन्य स्पेसिफिकेशन्स काय?
  4. 2 सप्टेंबरला बेंगळुरूमध्ये उघडणार ॲपलचे पहिले शोरूम
  5. Google Pixel 10 Pro Fold 5G मध्ये नवा टेन्सर G5 प्रोसेसर, 8-इंच फोल्डेबल डिस्प्ले
  6. Tensor G5 चिप, AI कॅमेरा टेक्नॉलॉजीसह Google Pixel 10 Series भारतामध्ये लाँच
  7. एअरटेलने हटवला 249 चा रिचार्ज प्लॅन; 24 दिवसांची वैधतेचा होता हा प्लॅन
  8. भारतात Redmi 15 5G प्रिमियर फीचर्स सह लॉन्च; किंमत 14,999 पासून सुरू
  9. Honor X7c 5G भारतात अधिकृतपणे लॉन्च; पहा या पॉवरपॅक्ट फोन मधील दमदार फीचर्स
  10. Airtel ची ग्राहकांना खास भेट! 6 महिन्यांसाठी Apple Music Subscription मिळणार अगदी मोफत
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »