बीएसएनएल कडून त्यांच्या लोकप्रिय 485 आणि 1999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर बीएसएनएल सेल्फ-केअर अॅप किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे रिचार्ज केल्यास 5% फेस्टिव्ह बेनिफिट देखील दिला जाणार आहे.
Photo Credit: BSNL
सन्मान प्लॅनमध्ये दिवसाला 2GB डेटा, 100 SMS, अनलिमिटेड कॉल, नव्या ग्राहकांसाठी मोफत सिम
BSNL कडून ज्येष्ठ नागरिकांसाठी खास Samman Plan जाहीर करण्यात आला आहे. हा प्लॅन वयाची साठी पार केलेल्या यूजर्ससाठी आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बीएसएनएल कडून देण्यात आलेल्या या प्लॅनमध्ये 1812 रूपयांमध्ये ज्येष्ठ नागरिकांना वर्षभरासाठीची कनेक्टिव्हिटी मिळणार आहे. या प्लॅन मध्ये दिवसाला 2 जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि अन्य सेवा मिळणार आहेत. ही खास ऑफर ग्राहकांना मर्यादित काळासाठी उपलब्ध असनार आहे. ग्राहकांना ही सेवा आणि त्याची माहिती बीएसएनएल च्या अधिकृत वेबसाईट वर, सेल्फ केअर अॅप वर आणि अधिकृत रिटेअर्स कडे मिळणार आहे. सन्मान प्लॅन हा लिमिटेड टाईमची ऑफर असल्याने त्याचा फायदा घेण्यासाठी यूजर्सनी तो 18 नोव्हेंबरपर्यंत अॅक्टिव्हेट करून घेणं आवश्यक आहे.
सन्मान प्लॅन सोबतच बीएसएनएल कडून दिवाळी बोनांझा प्लॅन देखील जाहीर करण्यात आला आहे. यामध्ये प्लॅनची किंमत नवीन ग्राहकांसाठी अवघ्या 1 रूपयामध्ये 4जी प्लॅन अशी आहे. काही प्रिपेड रिचार्ज वर फेस्टिव्ह डिस्काऊंट्स देखील जाहीर करण्यात आले आहेत.
BSNL च्या नव्या सन्मान प्लॅन मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी 1812 रूपयांमध्ये 365 दिवसांच्या व्हॅलिडिटीचा प्लॅन मिळणार आहे. या प्लॅनमध्ये दिवसाला 2 जीबी डेटा मिळतो. प्रतिदिन 100 एसएमएस, अनलिमिटेड व्हॉईस कॉल आणि नव्या ग्राहकांना मोफत सीम कार्ड मिळणार आहे. याव्यतिरिक्त, 60 वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या ग्राहकांना कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय सहा महिन्यांचे BiTV सबस्क्रिप्शन मिळेल. या दिवाळीत बीएसएनएल नवीन ग्राहकांसाठी फक्त 1 रुपयांत ४जी प्लॅन देत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी 4जी डेटा, 100 एसएमएस दररोज आणि मोफत सिम अॅक्टिव्हेशन (केवायसीनंतर) मिळते. 30 दिवसांच्या वैधतेसह, ही प्रमोशनल ऑफर यूजर्सना एक महिना मोफत मोबाइल सेवा देते, ज्यामुळे नवीन ग्राहकांना बीएसएनएलच्या अपग्रेडेड 4जी नेटवर्कचा अनुभव घेता येतो. हा प्लॅन 15 नोव्हेंबरपर्यंत वैध आहे.
सोबतच बीएसएनएल त्यांच्या लोकप्रिय 485 आणि 1999 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनवर बीएसएनएल सेल्फ-केअर अॅप किंवा अधिकृत वेबसाइटद्वारे रिचार्ज केल्यास 5% फेस्टिव्ह बेनिफिट देत आहे. यूजर्सना तात्काळ 2.5% सूट मिळेल, तर उर्वरित 2.5% रिचार्ज रक्कम सामाजिक सेवा उपक्रमांना दान केली जाईल. शिवाय, जे कोणी दुसऱ्याला रिचार्ज गिफ्ट करतील त्यांना अतिरिक्त 2.5% सूट मिळेल.
जाहिरात
जाहिरात
Samsung's One UI 8.5 Beta Update Rolls Out to Galaxy S25 Series in Multiple Regions
Elon Musk Says Grok 4.20 AI Model Could Be Released in a Month