Apple चा स्टुडंट प्लॅन हा भारतात Apple Music स्ट्रीम करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग आहे, ज्याची किंमत 59 रुपये आहे. पण, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध विद्यार्थी ओळखपत्र आवश्यक आहे.
Photo Credit: Apple
ही ऑफर पूर्वी एअरटेलच्या वाय-फाय आणि पोस्टपेड ग्राहकांसाठी होती
Bharti Airtel ने डिजिटल सेवा पोर्टफोलिओचा विस्तार करत संपूर्ण भारतातील निवडक प्रीपेड ग्राहकांना सहा महिन्यांसाठी मोफत Apple Music subscription ऑफर वाढवली आहे. पूर्वी पोस्टपेड आणि ब्रॉडबँड यूजर्ससाठी असलेली ही सुविधा आता Airtel Thanks app द्वारे समोर आणली आहे, जी त्यांच्या prepaid offerings समृद्ध करण्यासाठी एक मोठे पाऊल समजले जात आहे. Airtel Thanks app मध्ये लॉग इन करणारे प्रीपेड यूजर्स 'Apple Music at no extra cost' असा प्रमोशनल बॅनर पाहू शकतात. सहा महिन्यांच्या मोफत कालावधीनंतर प्रति महिना 119 रुपयांच्या दराने आपोआप रिन्यू केली जाणार आहे. हा प्लॅन यूजर ने रद्द केल्यानंतरच बंद होणार आहे.
अहवालांनुसार, ही ऑफर केवळ जास्त खर्च करणाऱ्या किंवा अमर्यादित 5G प्लॅनपुरती मर्यादित नाही, काही यूजर्सना Standard Prepaid Recharges वर बॅनर दिसतो. हे नवं पाऊल कनेक्टिव्हिटीसोबत डिजिटल कंटेंट युजर्स पर्यंत पोहचवण्याच्या एअरटेलच्या व्यापक धोरणाशी सुसंगत आहे. गेल्या काही महिन्यांत, एअरटेलने Apple TV+, Perplexity AI Pro आणि त्यांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये 25 हून अधिक OTT सबस्क्रिप्शनसह बंडल ऑफर आणल्या आहेत, ज्यामध्ये नेटफ्लिक्स ते डिस्ने+ हॉटस्टारपर्यंतच्या सेवांचा समावेश आहे.
अॅपल म्युझिकचा विस्तार त्याच्या अधिक प्रीपेड यूजर्सपर्यंत करून, एअरटेल भारतातील तीव्र स्पर्धात्मक टेलिकॉम लँडस्केपमध्ये त्याचे प्रीमियम अपील मजबूत करत आहे, एकाच पॅकेजमध्ये मूल्य आणि भिन्नता देत आहे.
भारतात Apple Music च्या Individual plan ची किंमत दरमहा 99 रुपये आहे. अनेक यूजर्स फॅमिली योजनेच्या मदतीने single subscription courtesy देखील मिळवू शकतात, ज्याची किंमत दरमहा 149 रुपये आहे. सध्या, Apple चा स्टुडंट प्लॅन हा भारतात Apple Music स्ट्रीम करण्याचा सर्वात स्वस्त मार्ग आहे, ज्याची किंमत 59 रुपये आहे. पण, या योजनेचा लाभ घेण्यासाठी वैध विद्यार्थी ओळखपत्र आवश्यक आहे.
अॅपल म्युझिक प्लॅन यूजर्सना जाता जाता ऐकण्यासाठी ad-free music, उच्च-गुणवत्तेचे ऑडिओ, क्युरेटेड प्लेलिस्ट आणि ऑफलाइन डाउनलोडचा आनंद घेता येणार आहे. एअरटेलच्या या डीलमुळे यूजर्सना चाचणी कालावधीत सुमारे 600 रूपयांची बचत करता येणार आहे.
जाहिरात
जाहिरात