दिवाळीत लागू होणाऱ्या Jio AI-Cloud Welcome Offer बद्दल जाणून घ्या

दिवाळीत लागू होणाऱ्या Jio AI-Cloud Welcome Offer बद्दल जाणून घ्या

Reliance aims to significantly expand its JioAirFiber service

महत्वाचे मुद्दे
  • Jio AI Cloud Welcome Offer वापरकर्त्यांना 100GB स्टोरेज देणार
  • JioTV+ ने 860 हून अधिक टीव्ही चॅनेल आणि OTT प्लॅटफॉर्म एकत्र आणले आहेत
  • JioBrain कार्ये आणि प्रक्रियांसाठी नवीन साधने आणि सेवा विकसित करणार
जाहिरात

गुरुवार दिनांक 29 ऑगस्ट 2024 रोजी Reliance Jio Industries च्या 47 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत JioTV+ मधील रोमांचक अपडेट्स सोबतच, JioTV OS आणि त्याची मालकी असणारे ऑपरेटिंग सिस्टम आणि सतत जोडून राहता येण्यासाठी चांगल्या अनुभवासाठी Jio Home सुध्दा लॉन्च केले आहे. कॉल रेकॉर्डिंग, ट्रान्सक्रिप्शन आणि भाषांतरासाठी JioPhoneCall हे AI सोबत जोडले जाण्याची घोषणा देखील या सभेत करण्यात आली. त्याच बरोबर JioTV OS ही Reliance Jio ची नवीनतम प्रणाली आहे, जी विशेषकरून Jio Set Top Box साठी डिझाइन केली आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम तुम्हाला जलद, नितळ आणि अधिक वैयक्तिकृत टिव्ही पाहण्याचा अनुभव देण्याचे महत्वपूर्ण काम करते.

मुकेश अंबानी आपल्या या सभेत कंपनीच्या काही महत्त्वपूर्ण धोरणांबद्दल भाष्य करताना म्हटले आहे की Reliance Jio टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रात तीन आवश्यक धोरणांवर काम करत होती. कंपनीची कार्यक्षमता सुधारण्यासाठी आणि भविष्यामध्ये अशाच रीतीने प्रगती करण्यासाठी सर्व क्षेत्रांमध्ये नवीन तंत्रज्ञान आणण्याचे काम केले जात होते. दुसरे धोरण म्हणजे कंपनी इतर कंपन्यांवर अवलंबून न राहता उत्पादन क्षमता सुधारण्यासाठी तांत्रिक नवकल्पनांनवर भर देण्याचे काम करत होती. तिसरे धोरण म्हणजे कंपनीने स्वतःची AI प्रणाली विकसित केली आहे. या सर्व प्रयत्नांना यश मिळून कंपनी लवकरच जगातील 30 कंपन्यांच्या यादीमध्ये समाविष्ट झालेली असेल. मुकेश अंबानी यांकडून RIL AGM या सभेत काही महत्वपूर्ण सेवांना लॉन्च करण्यात आले आहे, जाणून घेऊया या सेवांबद्दल.

Jio AirFiber आणि 5G

RIL AGM या सभेमध्ये Jio बद्दल बोलताना मुकेश अंबानी म्हणतात की कंपनी 5G आणि 6G तंत्रज्ञानासाठी 350 हून अधिक पेटंट मिळवण्यामध्ये यशस्वी झाले आहे. आतापर्यंत कंपनीने 130 दशलक्षापेक्षा जास्त ग्राहकांना 5G नेटवर्क प्रदान केले आहे. Reliance Jio कडून मागच्याच वर्षी सुरू करण्यात आलेल्या Jio Airfiber या ब्रॉडबँड सेवेला, आतापर्यंत 1 दशलक्ष ग्राहक मिळाले आहेत. आता कंपनी पुढे हीच सेवा घरे, लघु आणि मध्यम व्यवसाय, शाळा आणि महाविद्यालयांसोबतच रुग्णालयांमध्ये सुद्धा पोहोचविण्याचे लक्ष समोर आहे.

Jio Brain आणि Jio AI-Cloud Welcome Offer

Reliance Jio कडून नव्याने लॉन्च करण्यात आलेले AI तंत्रज्ञानावर आधारित असे प्लॅटफॉर्म आहे. ज्याचा मुख्य उपयोग हा नवीन साधने आणि उत्पादने तयार करण्यासाठी कमी लेटन्सी आणि मशीन लर्निग क्षमता एकत्रित करण्याचे काम करते. या सभेमध्ये Reliance Jio कडून 100 GB पर्यंत क्लाउड स्टोरेज प्रदान केले जाणार आहे. ही ऑफर या वर्षीच्या दिवाळी दरम्यान लॉन्च करण्यात येणार आहे.

JioTV+

RIL AGM या सभेत आकाश अंबानी यांनी JioTV+ साठी नवीन ऑफर सादर केल्या आहेत ज्यामध्ये सबस्क्रिप्शन सेवा HD रिझोल्यूशनमध्ये 860 हून अधिक थेट टीव्ही चॅनेल इतर OTT प्लॅटफॉर्मवर प्रवेश प्रदान करते. महत्वाचे म्हणजे, वापरकर्ते एकाच लॉगिनसोबत JioTV+ द्वारे विविध OTT ॲप्समध्ये प्रवेश करण्यास सक्षम असतील. JioTV+ मध्ये एक शिफारस इंजिन देखील देण्यात आले आहे जे वापरकर्त्याच्या पाहण्याच्या सवयींवर आधारित वैयक्तिकृत सूचना देण्याचे काम करेल.

JioTV OS आणि Hello Jio

JioTV OS हे Reliance Jio ची नवीनतम प्रणाली आहे, जी विशेषत करून Jio सेट-टॉप बॉक्ससाठी डिझाइन करण्यात आली आहे. ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम जलद, नितळ आणि अधिक वैयक्तिकृत टीव्ही पाहण्याचा अनुभव देते. ज्यामध्ये ॲप्स, लाइव्ह टीव्ही आणि ऑन-डिमांड शो एकाच, नेव्हिगेट करण्यास सोप्या प्लॅटफॉर्मवर एकत्र आणले जाऊ शकतात. ही प्रणाली अल्ट्रा HD 4K व्हिडिओ, डॉल्बी व्हिजन आणि डॉल्बी ॲटमॉसचे समर्थन करते, ज्यामुळे घरामध्ये अत्याधुनिक मनोरंजनाचा अनुभव मिळण्यास मदत होते.

Hello Jio व्हॉईस असिस्टंटला एक महत्त्वपूर्ण अपग्रेड देण्यात आले आहे, जे आता प्रगत जनरेटिव्ह AI तंत्रज्ञानाद्वारे समर्थित आहे. ही सुधारणा वापरकर्त्यांना सोप्या व्हॉइस आज्ञां सोबत विविध ॲप्सवर सामग्री शोधण्याची परवानगी देते. कंटेंट सर्च व्यतिरिक्त, Hello Jio आता जिओ सेट-टॉप बॉक्स नियंत्रित करण्याचे काम देखील करत आहे.

Jio Home App

Jio ने एक नवीन JioHome ॲप देखील लॉन्च केले आहे, जे JioTV OS सोबत कंपनीचे इंटरनेट ऑफ थिंग्ज चे समाधान समाकलित करते. या ॲप वर सर्व इंटरनेट ऑफ थिंग्ज च्या वैशिष्ट्यांसाठी वैयक्तिक नियंत्रण केंद्र म्हणून काम करेल आणि वापरकर्त्यांना बरेच काही व्यवस्थापित करण्याची अनुमती देण्यात येईल.

Jio PhoneCall AI

या सभेमध्ये लॉन्च केलेल्या अजून एक ॲप म्हणजे Jio PhoneCall AI. ज्याच्या मदतीने वापरकर्ते AI सहाय्याने कॉल रेकॉर्ड करून ते क्लाउड स्टोरेज मध्ये जतन देखील करून ठेवण्यात येतील. हे ॲप रेकॉर्डेड कॉल्सना सारांशामध्ये बदलण्यापासून त्यास इतर भाषांमध्ये अनुवादित करण्याचे काम देखील करते. यामध्ये तुम्ही फोन कॉल्स जितक्या सहजपणे शोधू शकता तितक्याच सहजपणे शेयर सुध्दा करू शकता.

Jio Cinema

RIL AGM या सभेत अंबानी यांनी JioCinema आणि Jio च्या इतर OTT प्लॅटफॉर्मच्या विस्ताराबाबत देखील सांगितले आहे. ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट केले की इंडियन प्रीमियर लीग चा 2024 या वर्षीचा सीझन भारतातील एकूण 62 कोटी वापरकर्त्यांनी पाहिला होत. ज्यामध्ये मागील सीझनच्या तुलनेत 38 टक्क्यांनी वाढ झाली आहे. JioCinema ने केवळ 100 दिवसांत 15 दशलक्ष पेइंग सब्सक्राइबर्सची नोंदणी केली आहे.

Comments
पुढील वाचा: Reliance, Reliance AGM, RIL, JioBrain
फेसबुक वर शेअर करा Gadgets360 Twitter Shareट्विट शेयर Snapchat रेडीट टिप्पणी
 
 

जाहिरात

जाहिरात

© Copyright Red Pixels Ventures Limited 2024. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »