Photo Credit: Reuters
प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह 15GB हाय स्पीड इंटरनेट आणते
Reliance Jio कडून प्रिपेड मोबाईल युजर्सना नवा रिचार्ज प्लॅन आणला आहे. ICC Men's Champions Trophy ला लक्ष्य करत चाहत्यांना अधिक फायदे मिळवून देण्यासाठी हा रिचार्ज प्लॅन आहे. या प्लॅनमध्ये युजर्सना JioHotstar चं सब्सस्क्रिप्शन हे कॉम्प्लिमेंटरी म्हणून मिळणार आहे. JioCinema आणि Disney+ Hotstar यांनी एकत्र येऊन JioHotstar हा स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म बनवला आहे. यावर क्रिकेटचे सामने, सिनेमे, शोज, अॅनिमेशन, डॉक्युमेंटरीज, अन्य लाईव्ह स्पोर्टिंग इव्हेंट्स पाहता येणार आहेत.
JioHotstar कडून मासिक आणि वार्षिक प्लॅन्स आहेत. ज्याच्या द्वारा ग्राहकांना streaming content चं सब्सस्क्रिप्शन घेता येणार आहे. Reliance Jio subscribers ना complimentary access मिळवण्यासाठी 195 रूपयांचा prepaid recharge करावा लागणार आहे. या प्लॅन मध्ये complimentary ad-supported subscription हे 90 दिवसांसाठी मिळणार आहे.
90 दिवसांच्या प्लॅन व्हॅलेडिटी मध्ये केवळ डेटा बेनिफिट्स मिळणार आहेत. ग्राहकांना 15 जीबी हाय स्पीड इंटरनेट मिळणार आहे. प्लॅन नुसार data allowance संपल्यानंतर डाऊनलोड स्पीड हा 64kbps होणार आहे.
दरम्यान हा अॅड ऑन पॅक आहे ज्यामध्ये JioHotstar's ad-supported plan हे दरमहा 149 रूपयांपासून सुरू होतात. यामध्ये content streaming हे एका मोबाईल वर 720p resolution चे आहे. top-end JioHotstar Premium plan हा 299 प्रति महिना आणि 1400 वार्षिक आहे.
ग्राहकांना अधिकचा डेटा हवा असल्यास टेलिकॉम कंपनीने 949 चा प्रिपेड रिचार्ज प्लॅन देखील आहे. यामध्ये 195 च्या प्लॅनप्रमाणे ad-supported subscription दिले आहे. 195 च्या प्लॅनमध्ये डेटासाठी एकूण कोटा आहे, हा प्लॅन दररोज 2GB हाय स्पीड 5G डेटा ऑफर करतो. याशिवाय, या प्लॅनमध्ये अमर्यादित व्हॉइस कॉल आणि दररोज 100 एसएमएस सारखे फायदे मिळतात. याव्यतिरिक्त, प्रीपेड रिचार्ज प्लॅन JioCloud आणि JioTV सारख्या इतर Jio ॲप्समध्ये प्रवेश देखील देतो.
जाहिरात
जाहिरात