Photo Credit: Reliance
रिलायंस जिओ (Reliance Jio)कडून जिओ एअर फायबर (JioAirFiber) वर दिवाळी धमाका ऑफर जाहीर केली आहे. आता नव्या आणि जुन्या ग्राहकांना एका वर्षासाठी जिओ एअर फायबर चं सब्सस्क्रिप्शन मोफत मिळणार आहे. दरम्यान या ऑफरचा फायदा घेण्यासाठी नवीन ग्राहकांना Reliance Digital stores मध्ये विशिष्ट रक्कमेवर प्रोडक्टची खरेदी करावी लागणार आहे. तर सध्याच्या युजर्सना तीन महिन्यांसाठी JioAirFiber plan रिचार्ज करावा लागणार आहे. याच्या अंतर्गत त्यांना हा फायदा घेता येणार आहे. दरम्यान रिलायंस कंपनीकडून नुकताच नवा आणि स्पेशल रिचार्ज प्लॅन त्यांच्या 8 व्या वर्धापन दिनानिमित्त लॉन्च केल्या आहेत. जिओ ची ही ऑफर 18 सप्टेंबर ते 3 नोव्हेंबर या कालावधी पुरतीच मर्यादित आहे. मग आता जाणून घ्या कसा मिळवाल वर्षभरासाठी मोफत इंटरनेट?
जर कोणता युजर नवा फायबर प्लान घेणार असेल तर त्याला वर्षभर मोफत इंटरनेट मिळवता येऊ शकतो. या प्लानची किंमत 7188 रूपये आहे. जसा तुम्ही हा प्लान घेणार तसा तुम्हांला प्लान सोबत पहिल्या वर्षासाठी मोफत इंटरनेट दिला जाणार आहे. पण या ऑफर साठी अट ठेवण्यात आली आहे.
जिओ ची ही ऑफर नव्या, जुन्या दोन्ही ग्राहकांसाठी असणार आहे जर तुम्ही तुमच्या घरासाठी कोणता डिजिटल प्रोडक्ट खरेदी करू इच्छित असाल तर तुम्ही या ऑफरचा फायदा घेऊ शकाल. तुम्हांला किमान 20 हजार रूपयांची खरेदी करावी लागणार आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ही खरेदी जिओ च्या रिलायंस डिजिटल किंवा Myjio स्टोअर मधूनही केली जाऊ शकते. या शॉपिंगच्या अंतर्गत तुम्हांला 12 महिन्यांसाठी मोफत इंटरनेट मिळणार आहे. त्यासाठी जिओ कडून 12 महिन्यांचे रिचार्ज कूपन दिले जाणार आहेत. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही किंवा डिजिटल गॅजेट अशी कोणत्याही गोष्टीची खरेदी केली जाऊ शकते.
जिओ च्या जुन्या कस्टमर्सना 2222 रूपयांचा स्पेशल दिवाळी रिचार्ज करावा लागणार आहे. याच्या अंतर्गत त्यांना वर्षभर मोफत इंटरनेट मिळणार आहे. यासोबत त्यांनाही 12 महिन्यांचा रिचार्ज कूपन मोफत मिळणार आहे. जुन्या युजर्सना मिळणार्या या मोफत रिचार्जची वैधता नोव्हेंबर 2024 ते ऑक्टोबर 2025 असणार आहे.
जिओ फायबर प्लान मध्ये युजर्सना 800 लाईव्ह टीव्ही चॅनल्स मिळतात. 12 ओटीटी प्लॅटफॉर्म चं सब्सक्रिप्शन मोफत मिळते. जिओ चा एअरफायबर कोठेही लावता येऊ शकतो. एअरफायबरला लोकेशनची निगडीत कोणतेही लिमिट नाही.
Reliance Jio च्या माहितीनुसार, प्रत्येक कूपन 30 दिवसांच्या आत जवळच्या Reliance Digital, My Jio स्टोअर, JioPoint स्टोअर किंवा JioMart Digital exclusive store वर रिडीम केले जाऊ शकते. 15,000 रुपयांवरील इलेक्ट्रॉनिक्स खरेदीवर याचा लाभ घेता येईल.
जाहिरात
जाहिरात