आता आला आहे Reliance Jio चा फक्त 198 रुपयांचा रिचार्ज

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनला 198 रुपयांच्या नवीन प्लॅनसह दोनदा रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 28 दिवसांकरिता दोन रिचार्जसाठी 398 रुपये मोजावे लागणार आहेत.

आता आला आहे Reliance Jio चा फक्त 198 रुपयांचा रिचार्ज
महत्वाचे मुद्दे
  • Reliance Jio ने आपला नवीन 5G प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केला आहे.
  • हे भारतातील Realiance Jio च्या वेबसाइटवर थेट उपलब्ध आहे.
  • या रिचार्ज प्लॅनमध्ये JioCinema, JioCloud आणि JioTV मध्ये प्रवेश मिळतो.
जाहिरात
Reliance Jio ने भारतातील आपल्या वापरकर्त्यांसाठी एक नवीन प्रीपेड मोबाइल रिचार्ज योजना लॉन्च केली आहे. ज्यामध्ये मात्र 198 रुपयांच्या रिचार्ज प्लॅनमध्ये अमर्यादित 5G डेटा प्लॅन देण्यात येत आहे . या व्यतिरिक्त, ग्राहकांना आणि वापरकर्त्यांना अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 संदेश सोबतच दररोज 2GB चा 4G डेटा देखील मिळणार आहे. Jio च्या या नवीन प्लॅनसाठी 14 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. Jio ने लॉन्च केलेल्या या प्लॅन बाबत अधिक माहिती पुढीलप्रमाणे. 

Reliance Jio च्या 198 रुपयांच्या प्लॅनचे फायदे


सर्वात महत्वाचे म्हणजे, Jio ने ऑफर केलेला अमर्यादित 5G डेटा हा सध्यातरी Jio च्या उपलब्ध प्लॅन्स मधील सर्वात स्वस्त प्रीपेड प्लॅन आहे. Jio एका महिन्यासाठी 5G डेटा प्रवेशासोबत 349 रुपयांचा प्लॅन देखील घेऊन आला आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसांच्या वैधतेसोबत दररोज 2GB चा 4G डेटा देखील मिळतो.

जर तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये 198 रुपयांच्या नवीन प्लॅनसह दोनदा रिचार्ज करण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला 28 दिवसांकरिता दोन रिचार्जसाठी 398 रुपये मोजावे लागणार आहेत. सध्याच्या 349 रुपयांच्या प्लॅनपेक्षा फक्त 49 रुपये जास्त. त्याऐवजी तुम्ही 349 रुपयांचा प्लॅन खरेदी करण्यातच समजूतदारपणा आहे. तथापि, जर तुम्ही केवळ तात्पुरत्या आधारावर डेटा बूस्ट करण्यासाठी एखादा प्लॅन शोधत असाल, तर नव्याने लॉन्च केलेल्या 198 रुपयांच्या प्लॅनचा लाभ तुम्ही नक्कीच घेऊ शकता.

सध्या सुरू असलेल्या दूरसंचार माध्यमांच्या स्पर्धेबद्दल बोलायचे म्हटले तर, 30 दिवसांची वैधता आणि अमर्यादित 5G डेटा प्रवेशासोबत Jio ची प्रतिस्पर्धी कंपनी एअरटेल सर्वात स्वस्त किंमत असणारा प्लॅन भारतात प्रदान करत आहे ज्याची किंमत 379 रुपये आहे. त्याची किंमत Jio पेक्षा 30 रुपयांनी जास्त असून तुम्हाला दोन अधिक दिवसांची अतिरिक्त वैधता प्रदान करण्यात येते.

काही महिन्यांपूर्वी Jio ने भारतातील प्रीपेड आणि पोस्टपेड प्लॅनसाठी किंमतीत वाढ करण्याची घोषणा केली होती, जे नियम 3 जुलै 2024 पासून लागू झाले होते. 30GB डेटा प्रदान करणाऱ्या 299 रुपयांच्या प्लॅनची किंमत बदलून आता 349 रुपये करण्यात आली आहे. 75GB डेटासोबतच 399 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनची किंमत आता 449 रुपये करण्यात आली आहे.

Jio ने दोन नवीन सेवा देखील लॉन्च केल्या आहेत. ज्यामध्ये JioSafe, कॉलिंग, मेसेजिंग आणि फाइल ट्रान्सफर करण्यासाठी क्वांटम सुरक्षित कम्युनिकेशन ॲप उपलब्ध आहे ज्याची किंमत प्रति महिना 199 रुपये आहे. JioTranslate, व्हॉईस कॉल, संदेश अनुवादित करण्यासाठी AI प्रणालीवर चालणारे विविध भाषांचे ॲप, मजकूर आणि प्रतिमा दरमहा 99 रुपयांमध्ये Jio वापरकर्त्यांसाठी एका वर्षासाठी मोफत उपलब्ध असणार आहे.

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. Vivo S50, S50 Pro Mini स्मार्टफोनचे रंग आणि लॉन्च टाइमलाइन पहा
  2. Nothing OS 4.0 अपडेट तात्पुरता थांबवला; ‘Urgent’ बग फिक्ससाठी निर्णय
  3. Samsung Galaxy Buds 4 सिरीज लीक: बेस मॉडेलमध्ये बॅटरी घट, Pro मध्ये सुधारणा शक्य
  4. iPhone च्या ‘Liquid Glass’ UI डिझायनर अ‍ॅलन डाई यांचा Apple ला निरोप, Meta मध्ये Chief Design Officer म्हणून नियुक्ती
  5. Xiaomi Mix ट्राय-फोल्ड स्मार्टफोनला प्रमाणपत्र मिळाले, लाँचची शक्यता वाढली
  6. Motorola Edge 70 ला मिळाले Swarovski Special Edition, Pantone 2026 रंगात सादर
  7. 2025 App Store Awards: Apple ने घोषित केले सर्वोत्तम ॲप्स
  8. ग्राहकांना दिलासा; Sanchar Saathi अॅप प्री-इन्स्टॉल सक्ती हटवली
  9. Poco C85 5G भारतात येणार; महत्वाच्या वैशिष्ट्यांसह फीचर्सही ठरले
  10. Redmi 15C 5G भारतात लॉन्च; 5G सपोर्ट, Dimensity 6300 आणि 50MP कॅमेरा हायलाइट
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »