Redmi Turbo 5 ची भारतात एंट्री; 120Hz डिस्प्ले, Dimensity 8500 Ultra प्रोसेसरची ताकद
Redmi ने भारतीय बाजारपेठेत Redmi Turbo 5 हा त्यांच्या Turbo सीरीज मधील पहिला स्मार्टफोन लॉन्च केला आहे. हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8500 Ultra प्रोसेसर आणि 7540mAh बॅटरीसह येतो, जो 100W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करतो. फोनमध्ये 6.59 इंच 1.5K फ्लुइड डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि गोरिल्ला ग्लास 7i संरक्षण आहे. फोटोग्राफीसाठी, यात 50MP OIS कॅमेरा आणि 20MP सेल्फी कॅमेरा आहे. Redmi Turbo 5 IP66, IP68, IP69 आणि IP69K रेटिंगसह सादर करण्यात आला आहे.