काय आहेत OLA च्या नवीन OLA Electric Bike ची वैशिष्ट्ये

15 ऑगस्ट 2024 रोजी 'संकल्प भारत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि ह्या कार्यक्रमातच OLA Electric Bike लॉन्च केली जाणार आहे.

काय आहेत OLA च्या नवीन OLA Electric Bike ची वैशिष्ट्ये
महत्वाचे मुद्दे
  • OLA 15 ऑगस्ट रोजी आपली पहिली OLA Electric Bike लॉन्च करत आहे.
  • ह्याची बॅटरी ही OLA कंपनीच्या कारखान्यांमध्ये बनवली जात आहे.
  • OLA Electric Bike मध्ये ड्युअल-पॉड एलईडी हेडलॅम्प असू शकतो
जाहिरात
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांच्या दुनियेत सध्या जर कोणत्या कंपनीने धुमाकूळ घातला असेल तर ती आहे, OLA. इलेक्ट्रिक वाहनांमध्ये सर्वांत आधी ह्या कंपनीने स्कूटर आणली पण आता दिवसेंदिवस वाढत चाललेल्या स्पर्धेमध्ये बाइकची मागणी लक्षात घेता OLA ने इलेक्ट्रिक बाइक लॉन्च करण्याचा निर्णय घेतला आहे. ह्या बाइक बद्दल जाणून घेण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत. चला तर मग जाणून घेऊयात, ही OLA Electric Bike भारतात केव्हा लॉन्च होणार आहे आणि काय असणार आहेत OLA इलेक्ट्रिक बाइक ची वैशिष्ट्ये. 

केव्हा होणार लॉन्च OLA Electric Bike


तामिळनाडूमधील FutureFactory येथे स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून 15 ऑगस्ट 2024 रोजी 'संकल्प भारत' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे आणि ह्या कार्यक्रमातच OLA Electric Bike लॉन्च केली जाणार आहे. भाविष अगरवाल ह्यांच्या नेतृत्वाखाली लॉन्च होणारी OLA ची ही पहिली इलेक्ट्रिक बाइक असेल जी Ola S1X, S1 Air आणि S1 Pro ह्या मालिकेमध्ये समाविष्ट करण्यात येईल. OLA त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून ह्या OLA Electric Bike चे विविध फोटोज चाहत्यांसमोर आणत आहेत. 

जरी ही बाइक कंपनीद्वारे 15 ऑगस्ट रोजी लॉन्च होणार असली तरीही बाजारात ती त्याच दिवशी रिलीज होईल की नाही ह्यावर कोणतेही स्पष्टीकरण कंपनीने दिलेले नाही. पण जुलै 2024 मध्येच OLA चे सीईओ अगरवाल यांनी बाइकची विक्री जून 2025 पर्यंत सुरू करण्यात येईल असे स्पष्ट केले आहे.

OLA Electric Bike ची वैशिष्ट्ये


OLA च्या स्कूटर्सने यापूर्वीच बाजारात आपली जागा निर्माण केली आहे, त्यानंतर आता OLA Electric Bike ने ह्या बाजारात प्रवेश केल्यानंतर इतर बाइक्ससोबत चांगलीच स्पर्धा रंगणार आहे. कदाचित पहिलीच बाइक असल्यामुळे बाजारात आधीच उपलब्ध असलेल्या Tork Kratos R आणि Revolt RV400 अशा एन्ट्री लेवलच्या बाइकप्रमाणेही असू शकते किंवा उच्च कार्यक्षमता असलेल्या Ultraviolette F77 Mach 2 आणि Matter Aera ह्या बाइक्स सोबत प्रतिस्पर्धा देखील करू शकते. 

OlA ने आपल्या X म्हणजेच पूर्वीच्या ट्विटर अकाऊंट वरून OLA Electric Bike चे टिझर लॉन्च केले आहेत. ज्यामधून आपल्या लक्षात येते की ह्या बाइकच्या समोरील बाजूस S1 स्कूटर प्रमाणेच LED Headlamps असतील, ज्याच्या बाजूस दोन उभ्या पट्ट्या देखील असतील. अग्रवाल यांनी काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या बाइकच्या अस्पष्ट प्रतिमेमध्ये पुढील आणि मागील बाजूस पातळ KTM-शैली दिसून येते. ज्यामध्ये दिसून येते की यात उजव्या बाजूस टेलिस्कोपिक फोर्क सस्पेंशन असेल. सोबतच ह्यामध्ये डेव्हलपमेंट स्नॅप्समध्ये चेन फायनल ड्राइव्ह आणि ट्यूबलर फ्रेमने वेढलेली एक मोठी बॅटरी देखील दिसून येते. ही बॅटरी OLA च्या अंतर्गत कारखान्यांमध्ये बनवलेली असून त्यावरच OLA Electric Bike चालणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

जाहिरात

जाहिरात

#नवीनतम कथा
  1. iQOO 15 ची भारतातील किंमत लॉन्चपूर्वी लीक; 26 नोव्हेंबरला होणार पदार्पण
  2. Redmi K90 Ultra मध्ये मिळणार मेजर अपग्रेड्स; डिस्प्लेपासून बॅटरीपर्यंतचे पहा अपडेट्स
  3. लॉन्चच्या आधी Vivo X300 Series ची भारतातील किंमत समोर आली
  4. Wobble चा डेब्यू स्मार्टफोन भारतात लॉन्च; किंमत 22,000 रूपयांपासून पुढे
  5. AMOLED स्क्रीन आणि नवीन Dimensity 8350 सह Lava Agni 4 भारतात दाखल
  6. Qualcomm Snapdragon 8 Gen 5 लॉन्च डेट आउट; काय मिळणार नवे फीचर्स
  7. फसवणूक मेसेज रोखण्यासाठी TRAI ची नवी सक्ती; व्हेरिएबल प्री-टॅगिंग बंधनकारक
  8. iPhone यूजर्ससाठी खुशखबर! AppleCare+ मध्ये Theft व Loss Protection ची भर
  9. लाँचपूर्वी Amazon वर Realme 15 Lite 5Gचा खुलासा; Dimensity 8000 चिपसेटसह किंमत व स्पेसिफिकेशन्स पहा
  10. Reliance Jio देत आहे ₹35,100 चे Gemini AI 3 सब्सक्रिप्शन मोफत
© Copyright Red Pixels Ventures Limited 2025. All rights reserved.
Trending Products »
Latest Tech News »