Photo Credit: Ather Energy
2025 Ather 450 series भारतामध्ये सोमवारी समोर आली आहे. बेंगलूरू च्या या electric scooter च्या स्टार्टअप ने 3 व्हेरिएंट्स बाजारात आणले आहेत. त्यामध्ये Ather 450, Ather 450X अणि Ather 450 Apex चा समावेश आहे. या तिन्ही मॉडेल्स मध्ये किंमतीत वाढ झाली आहे. सोबतच त्याच्या फीचर्स मध्येही वाढ झाली आहे. सार्या मॉडेल्स मध्ये ‘Magic Twist' regenerative braking असणार आहे.
2025 Ather 450 series ची भारतामध्ये किंमत एक्स शोरूम Rs. 1,29,999 पासून सुरू होत आहे. ही किंमत 450S model साठी आहे. दरम्यान 2025 Ather 450X मध्ये दोन बॅटरी पॅक्स आहेत. 2.9kWh आणि 3.7kWh असे ते उपलब्ध असून त्यांची किंमत एक्स शोरूम Rs. 1,46,999 आणि Rs. 1,56,999 असणार आहे. 2025 Ather 450 Apex ची आताची किंमत Rs. 1,99,999 आहे. इलेक्ट्रिक स्कूटर घेताना ग्राहकांनी Pro pack ची निवड करावी, त्याची किंमत मॉडेल्स नुसार 14,001 ते 20 हजारच्या दरम्यान आहे.
2025 Ather 450 series मधील सार्या मॉडेल्स मध्ये new multi-mode traction control system आहे. हे 3 torque intervention चा पर्याय देते. ज्यात rain, rally, आणि road चा पर्याय आहे. दरम्यान रेन मोड मध्ये अॅक्सिलरेशन वर मर्यादा असते. रस्ता ओला असतानाही सेफ राईड होऊ शकते. rally mode सर्वात सूक्ष्म बदल आणते, रायडरला खडबडीत किंवा असमान भूभाग ओलांडण्यास सक्षम करते. दरम्यान, रोड मोड हा दोन्ही प्रकारातील सर्वोत्कृष्ट पर्याय आहे, ज्यामुळे वेगवान अॅक्सिलरेशन आणि दैनंदिन राइड्ससाठी सुरक्षितता यामध्ये संतुलन निर्माण होते.
Ather त्याच्या 2025 450 मालिकेत Magic Twist regenerative braking आहे. हे रायडर्सना एका थ्रॉटलसह इलेक्ट्रिक स्कूटर नियंत्रित करण्यास परवानगी देते. अॅक्सिलरेशन सारखे असले तरी , ते मागे थ्रॉटलिंग करून वेग कमी करू शकतात, जे बॅटरी चार्ज करण्यासाठी प्रक्रियेत regenerative braking वापरते.
प्रो पॅकची निवड करणाऱ्यांना new Ather Stack मिळू शकतो. यात व्हॉट्सॲपवर डॅश, शेअर लाइव्ह लोकेशन, पिंग माय स्कूटर, अलेक्सा स्किल्स आणि सहा फंक्शन्स आहेत. कंपनी दोन नवीन कलरवे देखील ऑफर करते ज्यात स्टेल्थ ब्लू आणि हायपर सँड चा पर्याय आहे.
ces_story_below_text
जाहिरात
जाहिरात